पान:महाभारत.pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४२ नरहरिकृत [द्रोणपर्व ॥ ३५ ॥ मुखें पाहुनी भैरव शब्द । फांकिली रोपें महा विशद । तेजें दिग्गज पावले खेद । येतां द्रोणे लैक्षिली. ॥ ३६ ॥ परमास्त्र जाणतां द्रोणाचार्य । अस्वप्रयोग करुनी वर्य । जाळोनी शक्तीचा पुसिलो ठाय । शैक्षा करुनी टाकिली. ॥ ३७॥ कोपोनी धमैं प्रेरिली गदा । उसळतां वीर पावले खेदा । सावध गुरुवर्य सर्वदा । गदा रोपें फेंकिली. ॥ ३८ ॥ येरयेरां आदळोनी पूर्ण । भूमी पडल्या आदळोनी छिन । द्रोणाचार्य क्रोधायमान । फणीपरी फुफाटे. ॥ ३९ ॥ निशित शर सोडुनी निगुती । च्याही वारू पाडिले क्षिती । कार्मुक खंडून हातोहातीं । छेदोनी ध्वज पाडिला. ॥ ४० ॥ तीन शर कॅाळविखारी । अर्पण केले क्षणांतरीं । विगतसामादि धरेवरी । कुरुवर्य आतला. ॥ ४१ ॥ “आहा !' शब्द् पृतनामांदीं । म्हणती राजा मारिला युद्धी' । उड्या घालोनी वीर संधी । धर्मराज वेष्टिला. ॥ ४२ ॥ सहदेवें प्रेरुनी रथोत्तम । वरी घेतला राजा धर्म । वीर लोटले तीव्रविक्रम । येरवेरां निघालें. ॥ ४३ ॥ बृहत्क्षत्र कैकयराज । वीरांमाजी वीरश्रीतेज । लोटतां क्षेममूर्ती वीर पैज । घालोनी मार्गण मोकली. ॥ ४४ ॥ बृहत्क्षत्र धानळीं । नतपर्वणी नव्वद भाळी । अर्पण करुनी हृदयकमळीं । चाप हातींचे खंडिलें. ॥ ४५ ॥ क्षेममूर्ती अति आवेशें । अन्य कार्मुक वाहिलें रोजें। शर सोडुनी काळविष । वर्म संधी भेदिलें. ॥ ४६॥ येरू हांसत हांसत पाही । सायक सोडिले जैसे अही । अश्वसारथी पाडिले मही । रथासहित एकदा. ॥ ४७ ॥ त्वरा करुनी शरसंधानीं । शिर खंडुनी उडविलें गगनीं । मुगुटकुंडले प्रकाशकिरणीं । दिशा दाही डवरल्या. ॥ ४८॥ बृहत्क्षत्र पावतां जया । धृष्टकेतु लोटला राया ! । वीरधन्वा आडवा तया । होवोनी वर्षे शरांतें. ॥४९॥ परस्परें रणधुमाळी । वीर मिनले क्रोधानळीं । उभय शरांची साउली ।। तरेणिकिरण लोपले. ॥५०॥ जैसे वनांतरीं मदोत्कट । हस्ती हस्तींसी भिडती नेटें । कीं सिंहासिंहांचे चपेटे । एकमेकां ताडिती. ॥ ५१ ॥ तयापरी उभय, वीर । निकरें भिडती, वर्षती शर। वीरधन्वा प्रतापशूर । लघुलाघवविक्रमी. । ५२ । नतपर्वणी तीक्ष्ण बाणीं । चाप खंडुनी पाडिलें धरणी । धृष्टकेतु क्रोधआयनी । मोकळी शक्ती सरोजें. ॥ ५३॥ कडकडुनी दमिनीमानें । १. ह्या क्रियापदाचा कर्ता 'शक्ति'. २. ठाय पुसिला=मागमूस देखील नाहींसा केला. ३. भस्म, ४. काळसर्प. ५. सेनेच्या पथकांत. ६. अत्यंत पराक्रमी. ७. मूळांत क्षेमधूर्ति' असे नांव आहे. हा पांडवांच्या पक्षाकडे होता. ८. बाण सोडिता झाला. ९. बाण. १०. एकदम. ११. भरल्या, शोभू लागल्या. १२. सूर्यकिरण. १३. विजेप्रमाणे.