पान:महाभारत.pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८ अध्याय] । महाभारते. १४१ सत्याहत्तर चिरंजीविया । द्रोणपुत्रा वोपिले. ॥ १९ ॥ भूरिश्रवा क्रोधावर्ती । रोषे ताडी कमळापती । प्रेतोद हातींचा छेदोनी निगुती । पृथ्वीवरी पाडिला. ॥ २० ॥ सत्याहत्तर धनंजया । अर्पण करी महाराया ! । पार्थे प्रतापें पिटोनी बाह्या । शत बाण समर्प. ॥ २१ ॥ घोर संग्राम अतिदारुण । माजला रामरिवणप्रमाण । ईंडेपाडे वर्षती बाण । उँसण्या वायीं निघाते. ॥ २२ ॥ धरा आकाश तिहीं बाणीं । व्यापिली, न दिसे वासरमणी । वीर उत्साहे रणांगणीं । जयालागीं तळपती. ॥ २३ ॥ हर्षनिर्भर चक्रपाणी । पांचजन्य स्फुरी वदनीं । घोषं दाटली पूर्ण अवनी । बैसली टोळी काळाची. ॥ २४ ॥ येरीकडे धर्मराजा । युद्धा पातला भारद्वाजा । समागमीं वीर, तेजा । मार्तडातें लोपती. ॥ २५ ॥ वरवाळतां येरयेरां । आड रिघोनी वर्षती शरा।। इंद्रयुद्धाचा उभारा । थोर निकर माजला. ॥ २६ ॥ घोर संग्राम कडकडाटी । रोपें मिठ्या घालिती कंठीं । आसडोनी भूतळवटीं । एकमेकां पाडिती. ॥ २७ ॥ वीरश्रीभरें दाटले वीर । झोडिती वीर महानिकरें । छिन्नगात्री गळती रुधिरें । न गणोनी पुढां लोटती. ॥ २८ ॥ धर्मराज वीरश्रीरंगें । द्रोणाप्रती थडकला अंगें । नव्वद सायक महारागें । गुरुवर्या अर्पिले. ॥ २९ ॥ भारद्वाज अग्निप्रतिमा । पंचवीस शर ताडिले धर्मा । येरू क्षोभोनी, जसत्तमा ! । वीस द्रोणा अर्पिले. ॥ ३० ॥ तेणें गुरुवर्य क्रोधावर्ती। चाप छेदोनी पाडिलें क्षिती । सहस्र शर महापूर्ती । सोडुनी धर्म दिले. ॥ ३१ ॥ ‘आहा' शब्द सेनावदनीं । म्हणती ‘राजा मारिला रणीं । येरू सावध अंतःकरणीं । अन्य धनु वाहिलें. ॥ ३२ ॥ सहस्रशः वर्षतां शर । द्रोण खंडी वरच्या वर । अद्भुत चोज विस्मयाकर । वीर चक्षीं लक्षिती. ॥ ३३ ॥ द्रोण विद्येचा मरँगळा । कार्मुक खंडुनी पाडिला तळा । आरक्त नेत्र अग्निज्वाळा । 'वैमी गरळा विशाळा. ॥ ३४ ॥ धर्म संतप्त रोषआयनी ।। शक्ती योजिली काळभगिनी । हेमदंड अष्टघंटा किरणी । ब्रह्मदंडासारिखी. १. अश्वत्थामा चिरंजीव आहे अशी समजूत आहे. २. चाबूक. ३. त्वरित किंवा खरोखर ४. भुजा, बाहु, दंड. ५. मूळांतही हाच दाखला आहे (अध्याय १०६।१७). ६. ईध्ये. चढाओढीनें. ७. स्पर्धेने व ताबडतोब. ८. पृथ्वी. ९. कानटाळीं बसली, कान किटले, कान हरे झाले. १०. तेजानें, प्रतापाने. ११. वरवाळणे=चढाई करणे, आंगावर धावणे. हा शब्द मुक्तेश्वराच्या कवितेत वारंवार आढळतो. [ आदिपर्व-अध्याय २३।११७; सौप्तिकपर्व-अ० २।७६ पहा.] १२. गर्दी, धुमाकुळ. १३. हे राजश्रेष्ठा (धृतराष्ट्रा !). १४. (वाणांनी) आच्छादिले. १५. डोळ्यांनी. १६. मूर्ति, प्रतिमा, अवतार. १७• ओके. १८. रागाचा सांठा किंवा रागाचा चेन