पान:महाभारत.pdf/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४० नरहरिकृत [द्रोणपर्व ळले रणांगणा । विचित्रवाहने प्रदीप्त गगना । पूर्ण करिती स्वतेजें. ॥ २ ॥ हेमस्पंदन सैक्माभरणी । ध्वजपताका प्रदीप्त किरणी । कुलीन वाजी विचित्रवर्णी । सदृढ वेगें आगळे. ॥ ३ ॥ वीरवीरांच्या दिव्य पंक्ती । जाणों ग्रह ज्वलनकांती । चतुरंगसेना प्रभिन्नशक्ती । गंगापुरासारिख्या. ॥ ४ ॥ भूरिअवा, शल, वृषसेन, । कृपाचार्य, जयद्रथ, कर्ण, । अश्वत्थामा, शल्य आठवा जाण । दिग्गजमान लोटले. ॥ ५ ॥ रुक्मकार्मुकें प्रभिन्न हातीं । क्मपुंखे शेर शिळाशिती । रुक्माभरणे प्रदीप्तकांती । मुक्तमाळा साजिन्या. ॥ ६ ॥ सहित वीर दुर्योधन । लोटले जैसे वृटीं घन । नाना अर्णव दाटले भरणे । इंदूदयीं ज्यापरी. ॥ ७ ॥ सिंहनाद करुनी वीरीं । शंख वाहिले प्रभिन्न स्वरीं । अनेक वाद्ये सुखकारी । नादें दिशा व्यापिल्या. ॥ ८ ॥ दृष्टीभेटी येकमेकां । रोपें अग्नीच्या प्रदीप्त शिखा । ताडी द्रौणीयं यदुनायका । त्रिसप्त बाण निघाते. ॥ ९ ॥ प्रभिन्न बाण विधिले पार्था । पांच पांच अश्वांसही तथा । ध्वजास्तंभीं अंजनीसुता । शरें एकें ताडिलें. ॥ १० ॥ रोषावर्ती गांडीवपाणी । कर्ण बिंधिला दाहा बाणीं । वृषसेन वीर महामानी । शरत्रयें ताडिला. ॥ ११ ॥ शरासहित शरासन । छेदोनी शल्य महान । येरें अन्य धनुष्य घेवोनी पूर्ण । बाण पार्था वोपिले. ॥ १२ ॥ शिळाशित सुवर्णपुंख । अर्षी त्रया भूरिश्रवा देख । कर्ण विधी शाहत्तर सायक । विषोपम साजिरे. ॥ १३ ॥ वृषसेन ताडी सात शर । जयद्रथ अप सत्याहत्तर । कृप, मद्रेश, दाहा दाहा क्रूर । वोपी पार्था निघाते. ॥ १४ ॥ अश्वत्थामा चौसष्टी बाणीं । ताडी नरसिंह गांडीवपाणी । वीस अर्पोनी चक्रपाणी । पांच पार्था समप. ॥ १५ ॥ न गणोनी तयाचे तीव्र बाण । उभय कृष्ण हर्षवर्धन । फाल्गुन वीरपंचानन । सोडी शर निघाते. ॥ १६ ॥ कर्ण विधिला बारा बाणीं । वृषसेन तीन काळमानी । शल्यधनुष्य छेदोनी गुणीं । धरेवरी पाडिलें. ॥ १७ ॥ तीस शरीं ताडिला सोमदत्त । शल्यासी अर्पिले दाहा त्वरित । वन्हीसमान धगधगीत । द्रौणीते आठ ताडिले. ॥ १८ ॥ पंच शर गौतमतनया । शत अर्पिले सैधवराया। १. सोन्याने शृंगारिलेले. २. उत्तम, जातिवंत. ३. दिग्गजांसारखे. हे दिग्गज आटा दिशांस उभे राहून जगाचे संरक्षण करीत असतात. ह्यांची नांवें:-‘ऐरावतः पुण्डरीको वामन कुमुदोंऽजनः । पुष्पदंतः सार्वभौम: सुप्रतीकश्च दिग्गजाः ॥'. ४. सोन्याचे पिसारे ज्यांना आहेत असे. ५. साहाणेवर पाजविलेले, ६. पावसाळ्यांत. ७. भरती आल्यामुळे. ८. नजरानजर. ९. द्रोणपुत्र (अश्वत्थामा). १०. कृष्णाला. ११. वीरश्रेष्ठ. १२. गुण=धनुष्याची दोरी.