पान:महाभारत.pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८ अध्याय] महाभारत. १३९ वोनी पडले । तृणांकुरांसारिखे. ॥ १३७ ॥ तुझा प्रताप प्रफुल्ल स्वर्गी । धरणी वाणिजे भूपवर्गी । ते विडंबण संग्रामसंगीं । विचित्र डोळां देखिलें.' ॥१३८॥ अर्जुन वदे, ‘अंबुजानना ! । अंबुधिशयना! नारायणा ! । अंबुजोद्भवप्रियकरणा! । विदित चरणा सर्वही. ॥ १३९ ॥ कवच मंत्रोनी विधियुक्ते । द्रोणे बांधिलें यातें होतें । जें अभेद्य कुलिशातें; । मज ही विद्या ठाउकी. ॥ १४० ॥ तयानिमित्त बाणचलथा । वृथा जाहली जगन्नाथा ! । तरी मी भ्रष्ट करीन आतां । पाहें अच्युता ! नेवलाहो.' ।। १४१ ॥ ऐसें वदोनी गांडीवधन्वा । शर सोडिले अग्निप्रभवा । द्रोणपुत्रे लक्षुनी बरवा । छेदोनी धरे पाडिले. ॥ १४२ ॥ विस्मयमान उभय कृष्ण । तें विषोपम नव बाण । जनार्दनाते दुर्योधनें । महोत्राणे अर्पिले. ॥ १४३ ॥ विचित्र वर्षांनी बाणजाळीं । पार्थ बुजिला शरातळीं । कौरववीर रैणगोंधळी । पिटोनी टाळी नाचती. ॥ १४४ ॥ क्रोधयुक्त श्वेतवाहन । अधर चावोनी सोडिले बाण । प्राणघाती महाज्वलीन । यमदंडासारिखे. ॥ १४५ ॥ सुसाट उतरूनियां क्षिती । सहित अश्व उभय सारथी । छेदोनी चाप प्रभिन्नकांती । हातींचा हस्तावाप खंडिला. ॥ १४६ ॥ रथांगाचीं अष्ट शकलें । करुनी भ्रष्टिला यंदन सैळे । मही वरितां कौरवपाळे । सेना दृष्टी विलोकी. ॥ १४७ ॥ “आहा!' शब्द लोटोनी वीर । पाठीसी सुदला कौरवेश्वर । तोष पावोनी रमावर । स्फुरी शंख उत्साहे. ॥ १४८ ॥ असो पुढां संग्राम थोर । झोर्टधरणीं भिडती वीर । श्रोतेसजनी प्रेमादरें । कथामृत सेविजे. ॥ १४९ ॥ श्रीभीमराजकृपोतुषार । धारणा महीसमान उखर । दवणा नरहर मोरेश्वर । मघमघीत हरिगुण. ॥ १५० ॥ अध्याय अठरावा. संजय, वदे ‘नरनायका ! । कृष्णार्जुने स्फुरिलें शंखा । तेणें उतटली धरा देखा । घोषं दिशा व्यापिल्या. ॥ १ ॥ खळबळोनी कौरवसेना । वीर उस १. इंद्राच्या वज्राने भेद करण्यासही अशक्य. २. नवल, कौतुक. ३. युद्धास गोंधळाची उपमा देण्याचा प्रघात मुक्तेश्वराच्या काव्यांतही आढळतो. ४. ज्याघातवारण; धनुष्याच्या दोरीचा झटका बोटांना लागू नये म्हणून बोटांना जे आच्छादन घालतात तें. ५. त्वेषाने. ६. केशाकेशि युद्ध झालें-हा इत्यर्थ. झोट-झोंटी=लांव केश. ७. नापीक, खडकाळ, ८. ह्या अध्यायांत मळांतील १०४-१०९ अध्यायाचा सारांश आला आहे. ९. उफळली, तडली.