पान:महाभारत.pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१३८ नरहरिकृत [द्रोणपर्व खळ कुटिल दुर्योधन । दुराविले कुरुनंदन । सर्वं क्षत्रियां आणिले मरण । भूतगणा आल्हादू. ॥ ११९ ॥ पार्थविद्येचे लाघव थोर । श्रांत हयांतें पाजिलें नीर । अद्भुतं. करणी, वांचतां वीर । सैंधव आजी दिसेना. ॥ १२० ॥ क्षात्रधर्म क्षत्रियां आप्त । माघां सरतां अधःपात' । ऐसे वदोनी नृपनाथ । सेनाभारी मिनले. ॥ १२१ ॥ पार्थ प्रतापी वीर गाढा । रथ लोटोनी जाहला पुढां । स्फुरुनी गांडीव, वाहोनी मेढौं । बाण कोटी सोडिल्या. ॥ १२२ ॥ जाणों अग्नीच्या प्रळयधारा । तैसे शर सुसाटती सैरा । विगत मानसे माघारा। पंथ लक्षिती निघावया. ॥ १२३ ॥ तंव दुर्योधन पिटोनी बाह्या । लोटला समरीं धनंजया । कौरवीं मानले महाभया । न ये आतां परतोनी. ॥ १२४॥ ‘पार्थासन्मुख जो जो वीर । गेला, तेणे कृतांतघर । वसविले, त्याचा समाचार । नाहीं कोणी आणिला. ॥ १२५ ॥ धांबा, रक्षा नरपार्थिव' ।। ऐसे वदोनी लोटे सर्व । वीरश्रीभरें लघुलाघव । शरपंजरीं वर्षती. ॥ १२६ ॥ पुढे पाहोनी दुर्योधन । पार्थ तुकोनी बोले मान । म्हणे ‘भला! भला! वीर प्रवीण! । दाविलें मुख रणरंगीं. ॥ १२७ ॥ वस्त्रहरणीं प्रफुलवाणी । करुनी छळिली याज्ञसेनी । त्याचे उसणे आजी रणीं । घंई बाणी, पापिष्ठा ! ॥ १२८ ॥ येरू वदे रोषावर्ती । ‘कृष्णाश्रयें बोलसी शक्ती । तरी मी आजी उभयांप्रती । काळसदनीं वसवीन.' ॥ १२९ ॥ ऐसें वदोनी दुयोधन । वर्माग भेदी तीक्ष्ण बाण । शरासनीं कर्पोनी पूर्ण । तीन पार्था अपिल. ॥ १३०. ।। चारी चहूं वारुवासीं । ताडिले दाहा हृषीकेशी । प्रेतोद तोडुनी स्वरेंसी । धरणीवरी पाडिले. ॥ १३१ ॥ चित्रविचित्र शिळाशित । वर्मभेदी महाज्वलित । चौदा बाणीं सुभद्राकांत । ताडिलें हटें निघाते. ॥ १३२ ॥ त्यांवरी आणीक पांच नव । वर्म भेदोनी शिरकले हवे । त्याँवरी आठ शत। तीक्ष्ण सर्व । गात्रस्थानी ताडिले. ॥ १३३ ॥ तेणे विकळ केला पार्थ । विस्मयमान गोपीनाथ । म्हणे, ‘फाल्गुना ! विपरीतार्थ । आजी कैसा वर्तला ? ॥ १३४ ॥ पश्चिमे उगवला दिनकर । गंगावोघ चढे शिखर । वन्हीस बाधी शीतज्वर । वश्य तापा चंद्रमा. ॥ १३५ ॥ वडवाग्नीसी मोडैशी । तृषेने पीडित जळराशी । गरुड आहाळला सर्पविषीं । धुळीं आकाश बुडालें. ॥ १३६ ॥ तैसा विपर्यय आजी घडला । तव बाण भेदिती पर्वतमाळा । ते विफळ हो १. धनुष्याची दोरी. २. चाबूक. ३. अतिसार. मागे अ० ३, ओं० १९ पहा. ४. समुद्र, ५. भाजला. ६. ओंवी १३५:१३६ यांत असंभवालंकार आहे. ७. उलटा प्रकार,