पान:महाभारत.pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७ अध्याय] महाभारत. १३७ प्रीतीकरूनी । पाठी थापटी स्वहस्ते. ॥ १०४ ॥ परमानंदें वस्त्राभरणें । सांवरूनी वाजी सोडिले प्रवीणें । कुरवाळुनी श्रीकरें पूणें । शर आंगींचे उपडिले. ॥ १०५ ॥ जैसा सुषेण औषधी । उपचारीत सुमित्रयुद्धीं। तैसे हुय जाले बळसमृद्धी । पाणिलाघवें हरीच्या. ॥ १०६ ॥ प्रवेश करुनी सरोवरीं । जळ प्राशवी घेणीवरी । भक्तवत्सल श्रीकृष्ण शौरी । पूज्य पुरारिविधींतें. ॥ १०७ ॥ आराध्यमूर्ती त्रिभुवनाची । तो सेवा करी पार्थहयाची । भक्तभावना आवडीची । प्रेमा हरी भुकेला. ॥ १०८ ॥ धन्य पार्थाचा भक्तिमहिमा । सहस्रमुखाते नेपवे सीमो । थकित मुनींद्र, देव, ब्रह्मा । विस्मयानंदें लक्षिती. ॥ १०९ ॥ ज्या करीं अमरी मघवा । वोपोनी, स्थापिलें अक्षयी ध्रुवा । भवार्णवाचा दूर करूनियां गोवाँ । वर्धवी दासा मुक्तते. ॥ ११० ॥ रंमाकुचाग्रीं जे का पाणी । स्पर्शतां निवे जगत्स्वामिणी । तयाकरें कैवल्यदानी । क्षाळी हृय पार्थाचे. ॥ १११ ॥ ज्याचे शासन त्रिभुवना । शिक्षा कॅरी जो जंळजासना । तो हया चाबूक खोवोनी माना । मुगुटावरी आवडी. ॥ ११२ ॥ सुरस दंत रमाअधरीं । क्षते विलास रतिसमरीं । तया रदनीं वाजींची दोरी। धरुनी क्षाळी चहूं भुजीं. ॥ ११३ ॥ चरणपासाव उद्भव गंगा । अहिल्याशिळा उद्धरे सुभगा । ते पादे चुरुनी हय अंगा । पाहे मळ गेला कीं.॥११४॥ राजित तनू केशरउटी । लाळ माखिली निबिड पृष्ठी । प्रेम वसे मुखसंतुष्टी। | पाहोनी कडे काढिले. ॥ ११५ ॥ अमृतकर लागतां सहजीं । श्रमातीत थर कती वाजी । ‘बाप ! बापा !' म्हणे ‘हो !' जी! । मायबाप विश्वाचा. ॥११६॥ रमा रमणी मंगळसूत्रे । वरी, त्या करीं हयाची सूत्रे । योजोनी यंदनीं प्रीतिपात्रे । धरी उजू ओवडी. ॥ ११७ ॥ यंदनारूढ धनंजय । जाणों माध्याही प्रदीप्त सूर्य । विगत मानसे नृपवर्य । म्हणती, ‘अंत पुरला. ॥ ११८ ॥ १. ज्यांत लक्ष्मणास शक्ती लागली होती, त्या युद्धांत, २. हस्तकुशलतेने. ३. तृप्ति होईपर्यंत. ४. शेषाते. ५. अंत लागत नाहीं. ६. अमरावती पुरी. ७. गुंता. ८. वर्णनसादृश्यः-तों झालें मध्यान्ह । वारू रथींचे तृषित जाणून । तेव्हां कुरुक्षेत्रींचे जीवन । पाजवी जगजीवन ते काळीं । हयकंडू खाजवी नखेकरून । ओंजळी भरुनी उडवी जीवन । तें देखोनी देवर्षिगण । आश्चर्य करिती मानसीं. ।। जे हस्त इच्छीत रमा उरीं । देव इच्छिती मस्तकावरी । सदाशिव ध्यान धरी । न थारती तरी मानसी. ।। ब्रह्मा जन्मलासे [ज्या] उदरीं । तो दृढ आकळी हयदोरी । तुरंग ध, वोनी झडकरी। रथास जुपी लगबगे. ॥ (शुभानंदी भीष्मपर्व ३२।३२-३५). ९. उपदेशी. १०. कमलासनास, ब्रह्मदेवास. ११. परिहार झाला आहे ज्यांच्या श्रमांचा असे. १२. ओं ९-१७ नरहरीने आपल्या प्रतिभाकौशल्याने निर्माण केलेल्या आहेत. २० न० द्रो०