पान:महाभारत.pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३६ नरहरिकृत [द्रोणपर्व गदा घेवोनी प्रभिन्नपाणी । टाकोनी उडी धांविला. ॥ ८७ ॥ गंदामंडळे विगती गती । दावोनी भाळीं रुक्मिणीपती । ताडितां, डोलती मौळाप्रती । जेवीं मैनाक सुवजें. ॥ ८८ ॥ तेणे फाल्गुना क्रोधभरितें । दाटोनी सोडी षट् शरांतें । पाद, भुजा, ग्रीवा, खंडुनी धूर्ती । शिर व्योमा उडविलें. ॥८९॥ जैसा पर्वत खचे धरणी । तैसें कलेवर पडे रणीं । सेना मर्दानी केली वुणी। जेवीं दावाग्नी वनाते. ॥ ९०॥ अर्जुन ह्मणे, ‘माधवा! । अच्युता ! अनंता ! केशवा! । अपार पार विधी, भवा, । संकर्षणा नेणवे. ॥ ९१ ॥ नरहरी ! नरसिंहा ! सामराजा ! । मुकुंदा ! मुरारी ! गरुडध्वजा ! । कृष्णा ! वामना ! अधोक्षजा! । नारायणा ! श्रीपती ! ॥ ९२ ॥ वरवाळले कौरवभार । जयद्रथातें बहु अंतर । श्रांत वाजी, इतस्ततः वीर । शरांचीं क्षते सर्वांगीं. ॥ ९३ ॥ यामाजी प्राप्त माध्यान्ह समय । तप्तरश्मी वर्षे सूर्य । आज्ञेनुसार करीन सोय । तारक अर्णवीं शत्रूच्या.' ॥ ९४ ॥ श्रीहरी वदे, “हेरी आधीं । तोषोनी प्रवर्तिजे युद्धी । दूर सारूनी वीरमांदी । उदकपाना निर्मिजे. ॥ ९५ ॥ ऐकोनी कृष्णाच्या वचना । पार्थ प्रतापाचा राणा । शरीं रोधोनी कौरवसेना | सारी परा निघाते. ॥ ९६ ॥ जैसी प्रदीप्त हुताशनी । माघां सरे जनांची भरणी । स्थिर स्पंदन रंथांगपाणी । करुनी, उतरे तळाते. ॥९७॥ फाल्गुन विद्येचा मंगळा । हस्तलाघव विचित्रकळा । वर्षांनी शरीघ अग्निमाळा । भूमी आकाश छादिले. ॥ ९८ ॥ उभय कृष्ण धरणी स्थिर । संधी पाहोनी लोटले वीर । ‘ध्या घ्या' शब्दा फोडुनी क्रूर । बाणजाळीं वर्षती. ॥ ९९ ॥ पाथै विगत करूनी सर्वं । आँरावर्त घातला बरवा । वातही स्पर्शे न शके हवा । अभेद वज्र ज्यापरी. ॥ १०० ॥ वरुणास्त्र जपोनी बीजमंत्रे । शर सोडिले पाताळयंत्रे । भेदोनी उसळतां चक्रे । जळकल्लोळ दाटले. ॥ १०१ ॥ रम्य सरोवर बहळ जळे । विकाशमान प्रफुल्ल कमळे । हंसकारंडकाचे मेळे । चक्रवाकादि शोभले. ॥ १०२ ॥ मच्छ, कच्छ, जळचर सैरा । तळपती, उसळती भिन्नाकारा । मंद, सुगंध, शीतळ, वारा । वृद्धी श्रांता तोषाते. ॥ १०३ ॥ हर्ष पावोनी चक्रपाणी । अर्जुना स्तवी सुधावचनीं । आलिंगोनी १. बाणांनी. २. पर्वतविशेष. पूर्वी पर्वतांस पंख होते, यामुळे ते वाटेल तिकडे उडून जात असत व तेणेकरून लोकांस फार त्रास होत असे. यास्तव इंद्राने आपल्या वज्राने त्याच पक्ष ताडिल-अशी कथा आहे. ३. मान. ४. आगटी, शेकोटी. ५. घोडे. ६. होळी. ७. चप, गदा: ८. चक्रपाणी (कृष्ण). ९. प्रतिमा, मूर्ति, अवतार. १०. बाणांचा गराडा. ११. विपुल जलाने युक्त. १२. कारंडक=बदक.