पान:महाभारत.pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७ अध्याय] महाभारत. १३५ जे धनुष्य द्रोणाचार्य । घे, तें तोडी यादववीर । सल्याण्णव चापें तेजमय । शिनिप्रवीरें छेदिली. ॥ ७० ॥ तोषवोनी गुरुस्वमुखें । स्तवोनी त्यांतें पूजी हैरिखें । हस्तलाघव विद्यादिकें । जाणों वासव दुसरा. ॥७१॥ ऐसें वदोनी आचार्यराणा । शर सजिला प्राणहरणा । तेजें अग्नीच्या लोपल्या माना । जाणों सूर्य प्रळयींचा. ॥७२॥ ‘हा हा' कार सव वदनीं । म्हणती निमाला सात्यकी गुणी । धर्मराजादि वीरश्रेणी । लोटोनी अस्वा वारिलें. ॥ ७३ ।। उभयदळींचे दाटले वीर । वर्षते जाहले शरांचे पूर । युद्ध जाहलें घोरांदर । शुभेनिशुंभांसारिखें. ॥७४॥ येरीकडे वीर अर्जुन । महाप्रतापी बळवर्धन। [रथीं सारथी यदुनंदन] । अँडैश्वर्यसुखमूर्ती. ॥ ७५ । शिरकोनियां सेनाभारीं । फिरवी स्पंदन चक्राकारी। वरी फाल्गुन घनापरी । वर्षाव करी शस्त्रांचा. ॥ ७६ ॥ जिकडे जिकडे लोटे रथ । तिकडे मोकळा होय पंथ । जैसा हस्ती मैदद्रावित । येतां सेना द्विभागे; ॥७७॥ तयापरी पार्थवीरा । जातां सैनिकीं आडवारा । करुनी, युद्धा लोटले सैरा । अवंतिधिप प्रतापें. ॥ ७८ ॥ विंदानुविंद उभयबंधु । महाप्रतापी शौर्यसिंधु । पार्थ ऐश्वर्याचा इंदु । चौसष्ट बाणीं ताडिला. ॥ ७९ ॥ सत्याहत्तर शर हृषीकेशी । अर्पण केले महारोषीं । शत सायके वारुर्वीसी । वर्मस्थळीं भेदिले. ॥ ८० ॥ तया अर्जुने क्रोधावर्ती । नव सायक ज्वलितशक्ती । अर्पण करितां काळघाती । अधिकाधिक क्षोभले. ॥ ८१ ॥ तैलघृततीक्ष्ण धारा । देहुंड्या लावल्या पार्थवीरा । आच्छादुनी पांडुकुमरा । सिंहनाद फोडिले. ॥ ८२ ॥ महाप्रतापी कपिध्वज । चापें छेदोनी खंडिले ध्वज । येरू आवरोनी रोषबीज । भुकुटी शर ताडिले. ॥ ८३ ॥ तेणे फाल्गुन क्रोधायमान । ताडिला फैणी उसळे त्राणे । कीं तडागलोटे फुटे जीवन । तेवीं पार्थ क्षोभला. ॥ ८४ ॥ गांडीव कषेनी आकर्ण । शिळाशित तीक्ष्ण बाण । सुवर्णपुखी अतिदारुण । महारोडें सोडिले. ॥ ८५ ॥ अश्वांसहित सारथी पाहीं । पृष्ठरक्षक मर्दिले तेही । ज्येष्ठशिर पाडिलें मही । जेवीं पादप मारुतें. ॥ ८६ ॥ अनुविंद पडिला रणीं । देखोनी उसळला जैसा फणी । १. हर्षाने. २. हे दोघे भाऊ होते. ह्यांस कालीदेवीने मारिलें. ३. ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, यश, कीर्ति व औदार्य या सहांचे अधिष्ठान असा कृष्ण. ४. ज्याच्या गंडस्थळांतून मदोदकाचा स्राव होत आहे असा हत्ती. ५. दुभंग होई. ६. प्रतिबंध. ७. वस्तुतः ‘अवंत्यधिप' असा शब्द हवा होता. ८. घोड्यास. ९. चौक्या. १०. सर्प. ११. जोराने. १२. पाठराख्ये. १३. वडील बंधूचे (विंदाचें).