पान:महाभारत.pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

u १३४ नरहरिकृत [द्रोणपर्व जैसा आमीषा ससाण झडा । घाली, तैसा पार्षद पुढां । लोटोनी, सायक काळदाढा । गुरुवर्या समर्प. ॥ ५१ ॥ द्रोण प्रज्वळोनी क्रोधानळीं । चाप खंडुनी पाडिलें तळीं । पार्षदा विधिलें चौसष्ट भाळीं । छत्रध्वज छेदिला. ॥५२॥ येरें सचंद्र प्रभिन्न चैर्म । असिलता दामिनीसम । घेवोनी धांवला वीर विभ्रम, ।। जेवीं सिंह गजाते. ।। ५३ ।। प्रज्वळोनी द्रोण क्रोधानळीं । चर्म छेदिलें शत बाणीं । खङ्ग छेदोनी उडविलें गगनीं । दश सायकीं निघाते. ॥ ५४ ॥ करावया पार्षदाचा घात । शर प्रेरिला अंतकदूत । तेजें दिशा पूर्ण भरित ।। स्फुलिंग गगना विखुरले. ॥ ५५ ॥ येतां देखोनी शिनिप्रवीरें । चौदा शर सोडुनी निकरें । छेदोनी करी चकनाचुरे । धरणीवरी पाडिला. ॥ ५६ ॥ धन्य धन्य वीरमांदी । स्तविती जाहली सोज्वळबुद्धी । द्रोण क्षोभला प्रतापउदधी । बाणकोटी मोकळिल्या. ॥ ५७ । सात्यकी वीर धनुर्बाडा । बाणीं बाण केले रगडा । गुरु कोपोनी वेगाडा । शरांच्या माळा लाविल्या. ॥५८॥ उभयतां वीर महारथी । शरमय केली अवघी क्षिती । अवकाश आकाशीं नसे रिती । सूर्यकिरणे लोपली. ॥ ५९ ॥ विमानयानीं वृंदारक । पाहती दोघांचे कौतुक । तुकोनी मान म्हणती, ‘देख । धन्य जननी पुत्रत्वें'. । ६० ।। रक्तपीत शरौघमाळा । सरसराट वन्हिज्वाळा । रिघोनी गात्रीं भेदिती तळा । जेवीं वारुळी काद्रवेय. ॥ ६१ ॥ सिंहाऐसा फोडिती रव । उसळोनी शर सोडिती हैव । उभयतांचे हस्तलाघव । पाहती वीर सर्वही. ॥६२॥ विशाळ [धनू] गरगराटे । निघती शर सरसराटें । तळत्राणे फरफराटें । घोष सिंहांचे उसळती. ॥ ६३ ।। वीरश्रीभरें उभयवीर । सोडुनी बाण खंडी शर । गात्रस्थानी स्रवे रुधिर । गेरुपर्वतासारिखें. ॥ ६४ ॥ अस्त्रलाघव हस्तकळा । इंडेपाडे ताडिती सकळां । जैसे वृषभ थडकती बळा । येरयेरां निघाते. ॥ ६५ ॥ तयापरी अनन्य युद्ध । माजलें तुंबळ घोर विशद । द्रोण वर्षांनी शरांचे वृंद। दिल्हा खेद यादवां. ॥ ६६ ॥ तेणे अत्यंत क्रोधप्राप्ती । अत्र स्मरता जाला अंतीं । जेणें भार्गवें केली शांती । अर्जुनाची संग्राम. ॥ ६७ ॥ भीष्मपासाव सर्व विद्या । सात्यकी लाधला होता आद्या । तेची स्मरोनियां सध्या । सोडिले शर निघाते. ॥ ६८ ॥ बाणवृष्टी करूनी दुणी । छेदोनी चाप पाडिलें धरणी । अन्य सजितां त्वरेंकरूनी । तेही हातींचे खंडिलें. ॥ ६९ ॥ जे * १• मांसाकरितां. २. ढाल, ३. वीजेप्रमाणे तेजस्वी. ४. विस्तवाच्या ठिणग्या. ५. रिकामी जागा• ६• देव, ७. पृथ्वीतळाला. ८. स. ९. त्वेषाने. १०. वीरांच्या सिंहनादाचे भयंकर शब्द, ११. ईष्येनें.