पान:महाभारत.pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७ अध्याय] महाभारत. १३३ प्रज्वळोनी क्रोधानळीं । नतपर्वणी नव भाळी । अर्पण केल्या ध्रुवमंडळीं । भयंकर भ्याडाते. ॥ ३६॥ सात्यकी लोटतां पुढारा । केलें दुःशासने आडवारा । तेणे सायक तीक्ष्णधारा । नव हृदयीं अर्पिले. ॥ ३७॥ परस्परें ज्वलित शर । ताडिती, वळिती महावीर । घायीं शरीर रक्तांबर । जाणों किंशुक वसंतीं. ॥ ३८ ॥ सौबळ शकुनी येतां रागें । सहदेवं भेदली त्याची आंगें । युद्ध जाहलें वीरश्रीरंगें । निकै दोघां तयाते. ॥ ३९ ॥ सहदेवप्रतापाच्या राशी । घायीं जर्जर केले त्यासी । रणीं विन्मुख सेना, शेषी । द्रोणानीका पातला. ॥ ४० ॥ मद्राधिप लोटतां रणीं । धर्मे विधिला पांच शत बाणीं । त्यांवरी आणीक काळमानी । सात अप निघाते. ॥ ४१ ॥ तुंबळ युद्ध दोघांजणां । जालें, अमित आटली सेना । जेवीं तारकासुरषडानना । पूर्वी युद्ध ज्यापरी. ॥ ४२ ॥ बंधु बंधु विविंशती भीम । करिते जाले रौद्रकर्म । द्वंद्वयुद्धाचा संभ्रम । येरयेरां ताडिती. ॥ ४३ ॥ पार्षद वीर सेनापती । क्रोधे शिरकला चमूप्रती । प्रभिन्न सोडुनी शरांच्या पंक्ती । वीर वीर त्रासिले. । ४४ ॥ सरसराट शरौघमाळा । शिरकोनी शिरें पाडिती तळा । हस्त पाद खंडुनी हेळीं । भूमी तनू आपटतो. ॥ ४५ ॥ गजाश्व होवोनियां दुधडे । धडधडाट पडती मुंडें । जैसा कृषीवैल छेदितां झाडें । तळीं शाखा रिचवती. ॥ १६ ॥ कवच, शस्त्रे, पताक, ध्वज । धरे ग्रंपात तेज:पुंज । रुधिरमय निस्तेजतेज । दाटलीं शवे चौफेरी. ॥ ४७ ॥ रौद्ररण कर्कश पाहीं । उठोनी कबंधे नाचती मही । भूतगणांची पडली सायी । झोंबोनी रक्त प्राशिती. ॥ १८ ॥ कंक, गीध, वायस, ३येन, । वैकेजंबुकादि श्वापदगण । मांसें भक्षिती हर्षवर्धन । रुचे ज्यातें जैसें. ॥ ४९ ॥ ऐसा देखतां सेनाक्षय । क्रोधवर्धन द्रोणाचार्य । शर वर्षांनी अँप्रमेय । वीरमिठी भंगिली. ॥ ५० ॥ । १. बाण. २. पळसाचे झाड. पळसाची फुले लाल असतात ह्मणून क्षतांकित योद्भयास पळसाची उपमा देण्याचा कविसांप्रदाय आहे. पुष्पवर्ण नटला पळसाचा, पार्थ सावध नसे पळ साचा ।।' ही वामनोक्ति प्रसिद्धच आहे. ३. अटीतटीनें. ४. तारकासुर हा वज्रांग दैत्याचा पुत्र. ह्यास लहान मुलाखेरीज इतरांच्या हातून मृत्यु येणार नाही,' असा ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन वर दिला होता. ह्यामुळे हा सर्व प्राणिमात्रास फार त्रास देऊ लागला. तेव्हां कार्तिकेयाचा (षडाननाचा) अवतार झाला व याने तारकासुरास सातव्याच दिवशीं मारिलें-अशी कथा आहे ५. पृषतपुत्र, धृष्टद्युम्न. ६. सहज, अनायासेकरून. ७. शेतकरी. ८. खाली पडणे. ९. दाटी, थवा, १०, पक्षिविशेष. ह्याच्या पिसान्याचे बाण करितात. ११. ससाणा, १२, लांडगे, कोल्हे वगैरे. १३. अज्ञेय, फार उत्तम,