पान:महाभारत.pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३२ नरहरिकृत [द्रोणपर्व चोज प्रतापें. ॥ १८ ॥ सबीज मंत्र सिंचनी उदका । स्वहस्ते बांधले नरनायका ! । याचा भेद करिता देखा । वीर नाहीं जगत्रीं. ॥ १९ ॥ पूर्वी वृत्रासुराच्या युद्धीं । विकळ पुरंदर होतां संधी । शरण जावोनी ऐश्वर्यनिधी । शुळपाणी प्रार्थला. ॥ २० ॥ तेणे करूनियां कृपा । कवचधारण सुराधिपा । वोपितां निवारूनी तापा । अभेद जाला वृत्रातें. ॥ २१ ॥ तेची शिक्षा अंगिराऋषी । पावता जाला शांभवतोषीं । तेणे उपदेशोनी गरसी । तेणें अग्निवेशा अर्पिली. ॥ २२ ॥ तयापासाव लाधली मज । चमत्कारी अद्भुत तेज । तुज म्यां अर्पिली संग्रामपैज । घालोनी भिडे पार्थासी. ॥ २३ ॥ ऐसें वदोनी द्रोणाचार्या । स्वस्तिवचन केलें तया । ‘स्वस्ति, रक्षो' म्हणे ‘काया। देव, ऋषी, नृप, सिद्ध'. ॥ २४ ॥ आज्ञा देवोनी संतोपें । पार्थयुद्धा निघाले हर्षे । सवें सेना बळी रोपें । कडकडाटी लोटले. ॥२५॥ सहस्र रथ, रथी श्रेष्ठ । सहस्र दंती, बळ उद्भट । नव आजी सुभट। नावाजिक धनुर्वाडा. ॥ २६ ॥ येवोनी थडकले पार्था पाही । अनेक वाद्य लागले घायी । जैसा वैरोचन विजयी बाही । तंगटे इंद्रा प्रतापें. ॥ २७ ॥ तव पांडवसेना कडकडाटी । अर्णवलोटें लोटली हटी । द्रोण पर्वताचळसृष्टी । वीरलहरी ॐ वाहे? ॥ २८ ॥ अग्रता पांचाळ धृष्टद्युम्न । वीरवेष्टित प्रभिन्न घन । थडकोनी वर्षांनी तीव्र बाण । कौरवसेना ताडिली. ॥ २९॥ द्रोणाचार्य लोटला पुढां । रणभूमिका प्रयागहुडा । उभय सैन्या पडला वेढा । गंगायमुनांसारिखा. ॥ ३० ॥ धृष्टद्युम्न त्रासितां सैन्या । अत्यंत क्रोध पातला द्रोणा । शर वर्षांनी विचित्र नाना । वीर वीर भंगिले. ॥ ३१ ॥ जैसा वसंतीं वना वन्ही । धडकतां भ्रष्ट पादपश्रेणी । तैसी देखोनी गुरूची करणी । त्रिधा भार लोटले. ॥ ३२ ॥ पुढारतां विराट नृपती । विंदानुविंद अवंतिनृपती । धांवोनी वर्षले शरांच्या पंक्ती । परस्परें निघते. ॥ ३३ ॥ महायुद्ध घोरांदेर । उभय गात्री प्रहार रुधिर । जैसे सिंहगजाचे चेपेट घोर । वनांतरीं ज्यापरी. ॥ ३४॥ बाल्हिक आणि यज्ञसेन । युद्धा मिनले महात्राणे । द्रौपदेये सोडुनी प्रभिन्न बाण । बाल्हिक हृदयीं ताडिला. ॥ ३५ ॥ येरें १. द्रोणाचार्यांनी दुर्योधनास दिलेल्या कवचाचा. २. कवचधारण विद्येचे शिक्षण, ३. अगस्त्य ऋषीचा शिष्य व द्रोणाचार्याचा गुरू. ४. आशीर्वाद. ५. पुष्कळ, भयंकर. ६. नामांकित, मोठमोठे. ७. विरोचनपुत्र (बळि). ह्याने इंद्राचे राज्य घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु विष्णूनें. वामनाचे रूप घेऊन त्यास फसविल्यामुळे, तो त्याचा बेत सिद्धीस गेला नाहीं. ८. तुटून पडणे, भिडणे. ९. झाडांच्या रांगा. १०. आवेशानें, जोराने. ११. घनघोर, तुंबळ, १२, चापट्या, थडका.