पान:महाभारत.pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७ अध्याय) महाभारत. १३१ ॥ २॥ खवळोनी सेनाउदधी । विगतमानस फेणदधी । व्यापिली तेणें उसाळ बुद्धी । क्षीण जाली; नरवर्या ! ॥ ३ ॥ कासावीस सुयोधन । पाबला जेथे प्रतापी द्रोण । भाळीं वंदोनी श्रीचरण । बोले म्लान वचनीं गुरुवर्या. ॥ ४ ॥ ‘पार्थ प्रतापनरकेसरी । चमूगजबूंदें भेदुनी समरीं । सैंधवहनना पातला वैरी । जेवीं राहू चंद्राते. ॥ ५ ॥ अमित वीर मारिले रणीं । जे काळातें सारिती कदनीं । श्रुतायु तेजिष्ट तरणी । विचित्रकरणी मर्दिला. ॥६॥ श्रुतायु, च्युतायु, सुदक्षिण, । अंबिष्ट राजा रणप्रवीण । म्लेंच्छभूप प्रतापवान। अयुतसंख्या मारिले. ॥ ७ ॥ कृतवर्मा भोजपती । विगत केला सहनृपती । दुर्धर पाथाची महाशक्ती । सारी पैरा इंद्रातें. ॥ ८॥ तुमचा जाणोनी भरंवसा । जयद्रथासी दिधला धिवेसा । तेतों वृथा होवों पाहे आशा । नेणों करणी तुमची ! ॥ ९ ॥ पांडवजयीं अक्षय बुद्धी । तरी कां मातें प्रेरिलें युद्धीं? । द्वैतवासना स्वधर्मविधीं । योग्य नव्हे गुरुवर्या !’ ॥ १० ॥ द्रोण बोले स्मितवाचा । तैसाच विक्रम अर्जुनाचा । ज्याचा सारथी त्रैलोक्याची । प्रतिपाळक अनंतू. ॥ ११ ॥ भक्तवत्सल, भक्ताभिमानी, । भजकतारक भवनिर्वाणीं । शांभवनिर्वाणीं मर्मरध्वनी । सर्व काळीं जयाचे. ॥ १२॥ तो समक्ष फाल्गुनरथीं । असतां अजय केतुली प्राप्ती ? । अग्निदत्ते यंदन महाद्युती । अभंग वाजी जाण पां. ॥ १३ ॥ अक्षय, गांडीव, तूणीर, शर, ।। युव तरस्वी प्रतापशूर । धनुर्विद्येचे लाघव थोर । सज्जोनी शर सोडिता. ॥१४॥ एक्या बाणाचे सहस्रशः बाण । होवोनी दिशा रोधिती पूर्ण । अंग्रता धांवे कोस दोन । पृष्ठी तदर्थ, नरेंद्रा ! ॥ १५ ॥ वाम सव्य एकेक कोस । वावरोनी शर खंडिती शीस । तो तरुण, शक्तीचा नाश । माझ्या जाला वॉर्धक्यें. ॥ १६ ॥ मज गुंततां सेना संधी । निघोनी गेला कुशलबुद्धी । सैंधवरक्षण वीरमांदी । द्रौणी प्रतापी मजतुल्य. ॥ १७ ॥ तूही राजिया वीरांच्या कोटी । घेवोनी मी निघे तुमचे पाठी । पार्थप्रतापाची कायसी गोष्टी ? । दावीन | १. सैन्य व हत्तींचे समुदाय. २. अद्भुत पराक्रमी. ३. दहा हजार. ४. पलीकडे, दूर, ५. धीर. ६. भेदभाव, कपटबुद्धि. ७. अध्याय ९४।२० पहा. ८. संसारांतील संकटसमयीं. ९. खांडववंनदहनकालीं अग्नीने अर्जुनास एक दिव्यरथ व घोडे दिले होते. (मुक्तेश्वर-आदिपर्व-अध्याय ४९ पहा.) १०. घोडे. ११. तरणा, नव्या दमाचा. १२. अर्जुनाने सोडिलेल्या एका बाणापासून अनेक बाण उत्पन्न होत असत व ते पुढे दोन कोस व पाठीमागे व बाजूस एक एक कोस व्यापीत असत-असा भावार्थ, १३. म्हातारपणामुळे. येथे वामनकृत ‘भीष्मप्रतिज्ञा' काव्यांतील पुढील ओळीची आठवण झाल्यावांचून राहात नाहीं:-‘स्वयें गतवयस्क मी सरस वीर तू रे! नना,