पान:महाभारत.pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३० नरहरिकृत (द्रोणपर्व गजरोह, पदाती, । सहित वाहने लोळती क्षिती । अमित शवांच्या दाटल्या पंक्ती । यमराष्ट्रघोरवर्धन. ॥ १३४ ।। सेनाक्षय पाहोनी नयनीं । म्लेंच्छराज लोटले रणीं । यवन, पारद, दरद, गोयनी, । बाल्हिक काळदर्वाती. ॥ १३५ ॥ दरद्र, पौंडू आणि तगण । अभिशाह वीर दारुण । सहस्रशः वीर लोटून । केले प्रहार पार्थाते. ॥ १३६ ॥ येरू प्रदीप्त क्रोधानळीं । जैसा सूर्य वसंतकाळीं । शरांमागें शरांची जाळी । मोकळी प्रौढी संतोपें. ॥१३७॥ गजाश्वरथी पदाती । खंडविखंड पाडिले क्षिती । शरमय अवघी वैसुमती ।। भयांच्या कोटी वीरांतें. ॥ १३८ ॥ पांच शत वीर महाप्रवीर । सहस्र हस्ती प्रभिन्न थोर । अश्वसादि पदाती वीर । असंख्यात मर्दिले. ॥ १३९ ।। रुधिरनदी खळखळाटी । गजकलेवरे वाहती लोटीं । चतुरंगशवांच्या दाटल्या थाटी । पाहतां दृष्टी कंटाळे. ॥ १४० ॥ रौद्ररण भयंकर पाहीं ।। वीरक्षय पातला घोर मही । अंबीजैराज विजयी बाहीं । तुळोनी गदा धाविला. ॥ १४१ ।। बाणीं सडकितां धनंजय । न गणोनी, ताडिला यदुवर्य । दुःसह मानोनी कुरुवर्य । तीक्ष्ण बाणीं झोडिलें. ॥ १४२ ॥ अति अद्भुत नृपशार्दूळा ! । म्यां पाहिलें आपुल्या डोळां । अवमानोनी शरांचा झोला। गदा पार्था वोपिली. ॥ १४३॥ पुनः पुनः उभय कृष्णा । गदा ताडी महात्राणा। पार्थ प्रतापाचा राणा । छेदी बहुप्रतापें. ॥ १४४ ॥ शर सोडुनी ज्वलित क्रूर । वरीच्या वरी उडविले शिर । बाणी त्रासोनी सेनाभार । विमुख केले सैनिकां. ॥ १४५ ॥ अर्जुनयुद्धाचे लाघव । स्वर्गी सुर बानिती सर्व । पुढील युद्धाचे गौरव । श्रोते सज्जनीं ऐकिजे. ॥ १४६ ॥ श्रीगुरु भीमराज मेघ सधर । कृपाजळ वोळंतां स्थिर । मयूर नरहर मोरेश्वर । टाहो करी हरिनामें. ॥ १४७ ॥ अध्याय सतरावा. संजय वदे, ‘नरनायका ! । द्रोणानीका भेदूनी, भोजानीका । भ्रष्टोनियां, कांबोजानीका । पुढे पार्थ शिरकला. ॥ १ ॥ जैसा योगींद्र योगमार्गे । वैज्रचक्र भेदी करितां आंगें । तैसा फाल्गुन वीरश्रीरंगें । चतुर्थ पौळी पातला. १. पृथ्वी. २. हत्तींचीं प्रेते. ३. मूळांत अंबल' असे नांव आहे. (अध्याय ९३ श्लोक ६६.) ४• गुच्छ, समुदाय. ५. कृष्णार्जुनांस. ६. मोठ्या आवेशाने. ७. वळतां, येतो. ८. ह्या अध्यायांत मूळांतील ९४-१०३ अध्यायांतील कथानक आहे. ९. हटयोगांतील सप्तचक्रांपैकी एक. १०. सेनेची रांग.