पान:महाभारत.pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६ अध्याय] महाभारत. १२९ दडाडा । शिरें व्योमा उडविलीं. ॥ ११५ ॥ जैसी तडाग घनाची वृष्टी । तैसीं शिरें रिचवती सृष्टी । महा खळबळ, वीरांच्या कोटी। कासावीस मानसें. ॥ ११६ ॥ पार्थस्पर्धी शतायु वीर । बाहुशाली विजयी शूर । पुढारुनी सुभद्रावर । अमित बाणीं ताडिले. ॥ ११७ ॥ पार्थे सोडुनी शरौघमाळा । बुजोनी काढिला श्रुतायु हेळा । येरें वमोनी क्रोधाग्निज्वाळा । प्रदीप्त तोमर प्रेरिला. ॥ ११८ ॥ उसळोनी काळदंडमानें । पार्थमौळीं बैसला त्राणे । जाणों वज्रधडक पर्वतीं घन । विझे जेवीं प्रतापें. ॥ ११९ ॥ त्यांवरी शूळ ज्वलितधारा । कर्पोनी बाहीं ताडिला सैरा । तंव घोर दाटोनी धनुर्धरा ।। ध्वज पृष्ठिका स्पर्शली. ॥ १२० ॥ मोहो पावला रमारमण । कौरवसेना हर्षवर्धन । सिंहनाद करुनी त्राणे । सरसावले चौफेरी. ॥ १२१ ॥ पुरारीध्येय, पुरुषोत्तम । पुराणपुरुष, सौख्यसद्म । पूरितकाम, पुनीतनाम । स्फुरे तेजें पार्थाते. ॥ १२२ ॥ म्हणे, ‘बापा! प्रतापसूर्या! । काय केश्मल धरिलें हृदया। तुझिया यशा सुरेंद्र बाह्या । पिटी सर्वदा संतोपें. ॥ १२३ ॥ तो पराक्रम नराधिपा ! । स्फुरित करी कुरुकुळदीपा ! । कौरव वोपोनियां तापा । वर्षी यश प्रतापे.' ॥ १२४ ॥ स्पर्शतां श्रीकृष्णवाक्यामृत । पार्थविक्रम वैधै बहुत । गांडीव स्फुरोनी रोषाद्भुत । बाणकोटी सोडिल्या. ॥ १२५॥ कौरव वीरीं रैंकवळा । करुनी लोटिले फोडुनी कीळा । शस्त्रे वर्षले अग्निज्वाळा। जाणों वृष्टी घनाची. ॥१२६॥ पर्वतदरीं पंचानन । वेढोनी वर्षती शस्त्रे घन । तैसें अर्जुना आवरणे शखें घालोनी शस्त्रे ताडिती. ॥ १२७ । भूमी अंतरिक्ष न दिसे कांहीं । निबिड शस्त्रांची पडली सायी । ‘घ्या घ्या' शब्द एकची घायी । सर्वं वदनीं माजली. ॥ १२८ ॥ फाल्गुन प्रतापी महाशूर । सर्वास्त्रभेदी जाणता चतुर । इंद्रास्त्र जपोनी सोडिला शर । बीजयुक्त सक्रोध. ॥ १२९ ॥ सरसराट वन्हिज्वाळा । जाणों विजांचा पातला मेळा । कोटींच्या कोटी फांकती कीळा । तेजें नभा उजळिलें. ॥ १३० ॥ थटथटा वीरशिसाळे । तुटोनी पडती भूमी अचळे । जाणों विखुरलीं रुक्मकमळे । किंवा बिंबे चंद्राचीं. ॥ १३१ ॥ सांगद भुजा करमंडित । मेवाळ अंगोळिया मुद्रांकित । उसळोनी पडती लखलखीत । फणिवृंदासारिख्या. ॥ १३२ ॥ नांगतनु विराजमान । करचरणरहित भिने । धरणीं पडती महात्राणे । कूष्मांडफळे ज्यापरी. ॥ १३३ ॥ अवरोह, १. प्रचंड भुजदंडांनीं मंडित. २. विषाद, उदासीनता. ३. वाढे. ४. जमाव, समुदाय. ५. गजैना, आरडाओरड. ६. सिंह. ७. मंत्रासह, मंत्राने अभिमंचून. ८. अंगदां (बाहुभूषणां) सह. ९. कोमल, मृदु. १०. सापांच्या समुदायाप्रमाणे. ११. हत्तीचे शरीर. १२. तुटलेलीं. १९ २० द्रो०