पान:महाभारत.pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२८ नरहरिकृत [द्रोणपर्व भूमी अचळू । जेवीं पदप मारुतें. ॥ ९८ ॥ ना ते मूठ टाकितां वैरियावरी । अंपूर्ण शिक्षा फिरे माघारी । त्याचीच रंक्षा करी पुरी । तेवीं गती नृपाची. ॥ ९९ ॥ ‘आहा !' शब्द सेनामेळीं । भूप निघाला अतुर्बळी । कृष्ण माउली पार्थसाउली । अरिष्ट केवीं स्पर्शे पां? ॥ १०० ॥ मृत्यु पावला श्रुतायुध ।। कांबोजपुत्र दाटला मदें । सुदक्षण करावया युद्ध । अर्जुनाप्रती धांवला. ॥ १०१ ॥ चंक्षीं लक्षोनी रायते । शर सात सोडिले वीर पार्थे । येरें खंडुनी कुशळ हस्ते । धरेवरी पाडिले. ॥ १०२ ॥ दश बाण ज्वलित कंकपत्री । फाल्गुन ताडिला वर्मगात्रीं । तीन शरीं भेदोनी अब्जनेत्री । पांच पाथ अर्पिले. ॥ १०३ ॥ अर्जुने सोडुनी शराचे पुंज । चाप खंडुनी, छेदिले ध्वज । भुकुटीमाजी ज्वलिततेज । बाणत्रय शिरकलें. ॥ १०४ ॥ सुदक्षण तप्त क्रोधानळीं । शक्ती प्रेरिली अग्निज्वाळी । रुक्मघंटा प्रदीप्त हेळी । वमी स्फुलिंग मुखाने. ॥ १०५ ॥ येतां सुसाट पार्थाकडे । येरें भेदोनी टाकिले तुकडे । सुदक्षण पाहे चहूंकडे । विस्मयमान मानसें. ॥ १०६ । पार्थे कसोनी सोडिला शर । काळविखारी सुसाट घोर । मुगुटसहित उडविलें शिर। नभोमंडळीं प्रतापें. ॥ १०७ ।। रुचिर तनु भूषणयुक्त । भूमी पाडिलीं बीभत्स प्रेतें । कैर्णिकार वृक्ष जैसा वाते । स्पर्शी धरा ज्यापरी. ॥ १०८ ॥ कांभोजपुत्र सुदर्शनी । कर्णी नास (?) ताम्राक्ष गुणी। विषादें लोटला रणांगणीं । पार्थाप्रती प्रतापें. ॥ १०९ ॥ शर वर्षोनी, अग्निशिखा । हृदयीं ताडिला अग्निसखा । हसत हसत कार्मुका । कषेनी, बाण सोडिले. ॥ ११० ॥ तिल करुनी तीन वाटा । धरणी पाडिलें नृपश्रेष्ठा ! । जैसा सुरेंद्र गिरिकूटा । भेट पाडी तळाते. ॥ १११ ॥ ‘आहा!' भूत समस्त सेना । इतस्ततः जाहली कुरुभूषणा! । धीर, शूर, प्रतापी, रणा । पार्थाप्रती तगटले. ॥ ११२ ॥ अभीशाह आणि शूरसेन । शिवयो, वसाती, श्रुतायु, जाण । सर्वे शत वीर प्रवीण । शस्त्रधारी वर्षले. ॥ ११३ ॥ पळतां वीर पळनी । शस्त्रे वर्षती महारागें । सांगळोनी वीर वीरश्रीभागें । एकमांडी ॥ ११४ ॥ सव्यसाची धनुर्वाडा । शर वर्षांनी काळदाढा। वीर व १. निश्चेष्ट, निश्चळ. २. झाडे, वृक्ष. ३. वा-याने. ४. मूठ मारणें-हा जादूचा एट आहे. ५. पूर्ण ज्ञान नसेल तर. ६. जादू करणान्याची. ७. राख, नाश, भस्म, ९. डोळ्यांनी, १०. कमलनेत्र (कृष्ण). ११. अस्त्रविशेष. १२. पांगायाचे झाड. डोळ्यांचा. १४, सांगुळणे=घट्ट होणे, एकत्र जमणे, सांकणे. २५. एकदम.