पान:महाभारत.pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६ अध्याय] महाभारत. १२७ ॥ ८० ॥ गांडीव स्फुरोनी पार्थे । सोडिलीं शरांची अमित शते । चतुरंग सेना मर्दानी, प्रेतें । धरादेवी ढेसँली. ॥ ८१ ॥ क्रोधारूढ मैहींद्रमांदी । श्रुतायु गतायु लोटला संधीं । ज्वलित चाप झाडोनी युद्धीं । शितीं शर सज्जिले. ॥ ८२ ॥ वोढ काढोनी क्रोधानळीं । त्रिशरीं भेदिला किरीटमाळी । सत्याहत्तरीं वनमाळी । ताडुनी करी शब्दाते. ॥ ८३ ॥ फाल्गुन वमोनी क्रोधउल्का । नव्वद सायक अग्निशिखा । ताडिलें हृदयीं नरनायका । गजा जेवीं अंकुश. ॥ ८४ ॥ श्रुतायु क्रोधआयनी । ताडिला रोपें गांडीवपाणी । सत्याहत्तर बाण काळमानी । रक्तस्राव भूमी जाला. ।। ८५ ॥ लत्ताप्रहारें फुपाटे अही । कीं व्याघ्र उसळे शस्त्रघायीं । दारूमाजी स्फुलिंर्गकणयी । स्पर्श, अनर्था विलंबू ? ॥ ८६ ॥ तयापरी गांडीवधन्वा । रोषे संतप्त जेवीं मघवा ।। शर सोडुनी वन्हिप्रभवा । चाप हातींचे खंडिलें. ॥ ८७ ॥ नूतपर्वणी सात शरीं । नृप ताडिला स्तनांतरीं । येरें अन्य धनुष्य सज्जोनी शरीं । पार्थ हृदय भेदिला. ॥ ८८॥ विस्मयमान गुडाकेश । सहस्रशः शर काळविष । सोडुनी अश्वसारथिशीस । व्योममार्गे लाविली. ।। ८९॥ पंचाहत्तर प्रभिन्न शर । गात्रस्थान ताडिले सैर । हत सामादि राजेश्वर । घोर गदा पडताळी. ॥ ९० ॥ जे वैरदी दुर्धर महागदा । अमराधिपा करी चेंदा । ते वरुणें निर्मिली खेदा । पावावया भूतांतें. ॥ ९१ ॥ सलिलराज मकरध्वज । पर्णाशानदी तयाची भाज। पुत्र जन्मला ऐश्वर्यबीज । श्रुतायुध प्रतापी. ॥ ९२ ॥ मोहें झळंबोनी माता । प्रार्थिती झाली सलिलनाथा । ‘जगीं अवध्य करिजे सुंता । लोकेश्वरा! मजप्रती'. ॥ ९३ ॥ तनयस्लेहें हर्षगात्रीं । गदा वोपिली सहित मंत्रीं । म्हणे, ‘हा अवध्य सर्व धात्री । गदाश्रये जाण पां. ॥ ९४ ॥ समरीं दुर्धर समरवीरा । संकट गदा वोपिजे निकरा । रोजें करितां अविचारा । मृत्यु तेणें पाविजे.' ॥ ९५ ॥ असो; पुरतां आयुष्यअवधी । तैसीच विपरीत जाली बुद्धी । लक्ष अर्जुना करुनी संधी। गदा वोपी हरीतें. ॥ ९६ ॥ जैसी वीज तडके तळा । भेदोनी उसळे नभःस्थळा । तैसा दणका तमालनीळा । ताडोनी, उसळे माघारी. ॥ ९७ ॥ सुसाट वन्हीचा कल्लोळू । धडकोनी नृपाची फोडिली टाळू । श्रुतायु पडला | १. खचून भरली. २. राजमंडळ. ३. शित=धनुष्याची दोरी. ४. सर्प. ५. स्फुलिंगकणी, विस्तवाची ठिणगी. ६. बाकदार. ७• वरयुक्त, वरप्रसादानें प्राप्त झालेली. ८. जलाधिपति (वरुण).९. भाय. स्त्री. १०. झळबंणे=निमग्न होणे, गुंडाळले जाणे, घेरले जाणे. ११. श्रुतायूस. १२. (वरुणानें। दिली. १३. अर्जुनाचे लक्ष्य नाहीं अशी वेळ पाहून, अर्जुनाचा डोळा चुकवून मूच्छित, बेशुद्ध,