पान:महाभारत.pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२६ नरहरिकृत [द्रोणपर्व तुझा । विक्रमी भाव न करीं दुजा । कृपे रक्षीं बाळका. ॥ ६५ ॥ साट देवोनी वारुवाते । लंघोनी द्वार शिरकला पंथे । रथरक्षक पांचाळसुतें । जातां । परा सारिले. ॥ ६६ ॥ तंव पुढां सात्वत कृतवर्मा । महाप्रतापी शक्तिगरिमा । कांबोज, श्रुतायु, दीर्घतमा । सेना निबिड नृपाची. ॥ ६७ ॥ दोहा सहस्र रथवर श्रेष्ठ । शूरसेन, अभिशाह बळिछ । शिवयो, वशातय मालव पुष्ट । कैकय, मद्रक भूपादी. ॥ ६८ ॥ नारायण गोपाळसेना । अर्जुनद्वेषी मिनले रणा । जैसा सूर्य लंधितां रात्रिमाना । आडवी सेना दैत्यांची. ॥६९ ॥ तयापरी महाराजा ! । वीर अस्फोटोनियां औँजा । लोटोनी रोपें कपिध्वजा । बुजोनी बाणीं काढिलें. ७० ॥ जैसी सकुमार अबळा बळा । कुचमर्दन । विगतकळा । की हिंमवंतीं अग्निज्वाळा । सरे पैरा ज्यापरी. ॥ ७१ ॥ क्रोधारूढ हार्दिक्य थोर । दश नाराच ज्वलित खर । वर्मी ताडितां सुभद्रावर । क्रोधारूढ धडकला. ॥ ७२ ॥ कंकपत्री तीक्ष्ण धारा । बाणीं ताडिलें वीरवीरा । त्यावरी आणी तीव्रधारा । इषुत्रय अर्पिले. ॥ ७३ ॥ न गणोनी रोखें । भोजपती । पंचवीस शर काळघाती । एकेकासी ताडुनी शक्ती । हास्य करी विनोदें. ॥ ७४ ॥ दांडाइतासी दांडईत । दावोनी भेद, वळिती हस्त । तैसे उभय वीर समर्थ । दाविती चोज विद्येचें. ॥ ७५ ॥ गांडीव वोढोनी । कानाडी । शर सोडिले महाप्रौढी । चाप छेदोनी लवडसवडी । एकवीस गात्रीं निवाले. ॥ ७६ ॥ अन्य चाप छेदोनी नेटें । पंचसायक अग्निपुटें । फालयाने ताडिले महाहटें । त्यांवर पांच अर्पिले. ॥ ७७ ॥ पार्थ धनुर्धरांचा राव ।। शस्त्रसाधनी परम जव । नव बाण सोडुनी प्रभिन्न हव । स्तनांतर भेदिले. ॥ ७८ ॥ तेणें दाटली मूच्र्छा त्यांसी । काळवेळा भाविती मानसीं । विगत करुनी हृषीकेशी । लोटी यंदन पुढारा. ॥७९॥ तंव कांबोजराजा महाबळी । आडवा उभा सेनामेळीं । येतां देखोनी किरीटमाळी। बावरला संग्रामा. भळा । १. चाबूक. २. मूळांत मावेलक' असे नांव आहे (अध्याय ९१ श्लोक ३९), ३. जमले ४. रात्रिमाना सूर्य लंधितां=प्रातःकाळीं. ५. मंदेह नांवाचे साडे तीन कोटी राक्षस सूर्योदयाच्या व सूर्यास्ताचे वेळेस सूर्याचा ग्रास करण्याकरितां उत्पन्न होत असतात–अशी कथा आहे. ह्यांचा नाश करण्याकरितां गायत्री मंत्राने तयार केलेल्या वज्ररूपी पाण्याने सूर्यास अध्ये देण्याचा प्रघात आहे. सूर्यास अध्यें देतांच ह्या मंदेह राक्षसांचा नाश होतो, अशी समजूत आहे.. ६. दंड थोपटून.७. हिमालयपर्वतावर. ८. दूर, पलीकडे. ९. बाण. १०. योद्धा. (दांडाईत =दांडगा). ११. घाईने, लवकर. [हा शब्द मुक्तेश्वराच्या कवितेत आढळतो. आदिपर्व-अध्याय ३४।५१ पहा]. १२. छाती, ऊर्.