पान:महाभारत.pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६ अध्याय महाभारत. १३५ धनू । द्रोणचरणा वंदिले. ॥ ४५ ॥ क्षात्रधर्म स्मरुनी मनीं । क्रोधारूढ पाकशासनी । नव बाण दुर्धर काढुनी । गुरुवर्या आपले. ॥ ४६॥ खडतरुनी गात्रस्थानीं । रुधिर प्राशिले तिहीं बाणीं । पुनः संधान करुनी झणी । धनु हातींचे खंडिलें. ॥ ४७ ॥ असंभ्रांत भारद्वाज । शर सोडुनी तेजःपुंज । धनुष्य छेदोनी खंडिलें बीज । शरवृद्धीचे प्रतापें. ॥ ४८ ॥ विस्मय पावोनी सुभद्रावर । सज्जोनी गांडीव, सोडिले शर । सर्वांग भेदुनी सत्वर । भूमीमाजी विझाले. ॥ ४९ ॥ पार्थविद्येचे लाघव पूर्ण । तूणीरांतुनी एक बाण । सज्जित धनुषी घड्गुएँ । सोडितां शेत सात पैं. ॥५०॥ सरकतां पुढे सहस्र जाणा । लागतां अयुताची गणना । ऐसिया वृद्धी आचार्यसेना । भ्रष्ट केली क्षणार्धे. ॥ ५१ ॥ मत्त Kातंग गिरिप्राय । गडगर्जना घनसमुदाय । विचित्र अश्व भूमि पाय । न लाविती विक्रमें. ॥५२॥ रथी, विरथी, पदाती । पडती, जळती बाणघातीं । जिकडे तिकडे शरांच्या पंक्ती । लखलखिती सुसाटें. ॥ ५३ ॥ पद्मतडाग हेमंतकाळीं । पुढे हंसाची जेवीं साउली । तैशा भाली झळकती कीळीं । कीं मेघधारा सोज्वळ. ॥ ५४ ॥ हस्ती, वाजी, पदाती, रथी । सहस्र मिनले मृत्युपंथीं । पार्थप्रतापाची दुर्धर शक्ती । चोज मानिती, महींद्रा ! ॥ ५५ ॥ विगत करूनी सेना पाहीं । द्रोणाचार्य भेदिला हृदयीं । विव्हळ होवोनी तये समयीं । अद्रिप्राय डोलला. ॥ ५६ ॥ धैर्यवसना धरुनी रोष । शर कर्कश काळविष । पांच सोडुनी हृषीकेश । हृदयवर्मी ताडिला. ।। ५७ ॥ दोन दशक एक आगळा । पार्थ ताडिला उतावेळा । तीन अर्पिले वन्हिज्वाळा । ध्वजालागीं निघाते. ॥ ५८ ॥ द्रोणशिष्य धनंजय । त्याचा महिमा वर्णिजे काय ? । क्षोभायमान गुरुवर्य । जाणों सूर्य ग्रीष्मीचा. ॥ ५९॥ मंडळाकार गरगराटी । धनुष्य फिरे अलक्ष्य दृष्टी । बाणी आच्छादिला किरीटी । गमे विस्मय हरीतें. ॥ ६० ॥ सायकामागे सायकवृष्टी । कंकपत्री निबिड थाटी । कार्य जाणोनी जगजेठी । खुणावी बोटें पार्थाते. ॥ ६१ ॥ ‘पुढां चतुरा ! महत्कार्य । करणे असे सैंधवजय । येथे गुंततां द्रोणाचार्य । वश्य नोहे प्रतापी.' ॥ ६२ ॥ ऐकोनी हरीची वाणी । पार्थ समजे आपुले मनीं । गांडीव स्थिरावोनी रणीं । नमी आवडी गुरूते. ॥ ६३ ।। प्रदक्षिणा करुनी भावें । सव्यसाची शिरके सेनेत हवें । द्रोण वदे, ‘शत्रु जिंकित जावें । योग्य मिळे धर्माते. ॥ ६४ ॥ अर्जुन वदे, ‘महाराजा ! । पुत्रतैसा शिष्य मी | १. इंद्रपुत्र (अर्जुन). २. कौशल्य. ३. भात्यांतून. ४. सहापट. (अध्याय ९१ श्लोक १५. ५. सातशें. ६. हत्ती. ७. भल्लनामक बाण. ८. मोठ्या त्वेषाने. (?)