पान:महाभारत.pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२४ नरहरिकृत। [द्रोणपर्व पाहावया दृष्टी । कोण्हा सामर्थ्य नाहीं पोटीं । कासावीस होवोनी पाठी । पळाया मार्ग लक्षिती. ॥ २७ ॥ फाल्गुन प्रतापाचा लोटा । दुर्मर्षणसेना भ्रष्टुनी, वाटा । लीवोनी, शिरकला गज(घ) । दुःशासन जे ठाई. ॥२८॥ तंव तो गजानीकाचे भारीं । भूषण भूषित, चाप करीं । अनेक वाद्य पिटोनी समरीं । पार्थाप्रती धडकला. ॥ २९ ॥ अंकुश स्पर्शेनियां मौळीं । गज प्रेरिले प्रभिन्नबळी । केली शस्त्रांची साउली । अर्जुनावरी प्रतापें. ॥ ३० ॥ येरू कुशळ धनुर्वाडा । शर वर्षांनी तवक गाढा । सहित वीर धडधडा । रुंडे धरे पाडिली. ॥ ३१ ॥ जैसी ताडद्माची पक्व फळे । भूमी पडती वैतमेळे । तैसीं गजानीकाचीं दॐ । बीभत्समान पाडिली. ॥ ३२ ॥ खंडविखंड गात्रे पाहीं । रुधिरमय जाली मही । जर्जर होवोनी पार्थघायीं । वांचले वीर निघाले. ॥ ३३ ॥ कामुक, शर, अंगुळित्राणे, । चित्रायुधे, विविधवणें । नाना भूषणे विराजमान । धरादेवी देसली. ॥ ३४ ॥ दुःशासनसेना करुनी भ्रष्ट । द्रोणानीका पातला सुभट । तंव तो व्यूहद्वारीं सेनासुभट । मारुतीप्राय देखिला. ॥ ३५ ॥ विभ्राजमान कांचनरथीं । जाणों उदयाचळीं गभस्ती । तैसिया तेजें सोज्वळकांती । द्रोणाचार्य देखिला. ॥ ३६॥ श्रीकृष्णमतें करुनी नमन । जोडुनी अंजळी बोले वचन । ‘पांडु, धर्मराज, श्रीकृष्ण, । तेवीं तूं मज गुरुवर्या ! ॥ ३७ ॥ कल्याण चितिजे मातें, जनका! । युद्धसागरीं होवोनी नौका । तव प्रसादें कीर्ती लोका । वाढ जाली, स्वामिया ! ॥ ३८ ॥ दारुण पण न्यावया सिद्धी । मी तव उदित शौर्यबुद्धी । सिद्धी नेइजे कृपानिधी ! । मागणे हेची, गुरुवर्या ! ।। ३९॥ अश्वत्थामाहोनी विशेष ! । मज देखता पावसी तोष । तुझिया प्रतापे माझे यश । जगीं मिरवे, स्वामिया । ॥ ४० ॥ त्याचे लालन करिसी प्रीती । तैसेची मज रक्षी कृपामूर्ती । तुझिया अभये सेनेप्रती । रिघोनी सैंधवा मारीन. ॥ ४१ ॥ दुष्प्राप्य नेम अतिदारुण ? तव प्रसादें सिद्धी नेणे.' । द्रोण व स्मितवदने । ‘हें कैसेनी घडे पां ? । ॥ ४२ ॥ मॅज असतां वर्तमान । कैसे घडे सैंधवहनन ? । माझे आश्च ठेवोनी प्राण । उदित युद्धा सर्वही.' ॥ ४३ ॥ ऐसें वदोनी शैरासन । सज्जोनी तीव्र सोडिले बाण । सुत,स्पंदन, श्वेतवाहन । बुजोनी बाणी काढिला. ॥ ४४॥ अर्जुन सरसावोनी धनू । शर सोडिले प्रदीप्त भानू । सुसाटें उतरुनी धरे १. दाणादाण करून. २. हत्तींच्या समुदायांत. ३. वावटळीनें. ४• पूर्णपणे भरली. हाच शब्द पुढे ८१ व्या ओवीत आला आहे. ५. द्रोणाचार्यांच्या सैन्यासमोर. ६. देदीप्यमान, तेजस्वी, ७. मी जिवंत असतां. ८. जयद्रथवध. ९. धनुष्य,