पान:महाभारत.pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६ अध्याय महाभारत. १२३ पैरिघ, तोमर, मुसळे, । लेहुडी, चक्र, शरांची जाळे, । शूळ, पट्टे, सांग भाले, । भिडिमाळा मोकलिल्या. ॥ ९ ॥ हस्तैिपी मौळे ताडोनी तोचें । गज, पेलोनी फेकिती शस्त्रे । अश्वारोहे वेगव★ । उसळोनी शस्त्रा हाणिती. ॥ १० ॥ रथी लोटोनी स्पंदनाते । शैरीरीं बुजिलें धनंजयातें । जाणों पर्वतीं घनाचे भरते । शस्त्रधारा रिचवती. ॥ ११ ॥ पार्थ प्रतापाचा राणा । बोलता जाहला ‘मधुसूदना ! । माधवा ! मुकुंदा! नारायणा ! । सामराजा ! नरहरी ! ॥१२॥ पतितोद्धरणा ! दीनबंधू! । पतितपावना ! कृपासिंधू ! । पतितमारणा ! अक्षयानंदू ! । अघटित माया मैं तुझी. ॥ १३ ॥ काळवश पुरतां अवधी । मुंगी सपक्ष निघतासंधी । दुःसह वन्हीची तेजवृद्धी । पतंगें उड्या घालिती; ॥ १४ ॥ तयापरी जगन्नाथा ! । वीर वैरवाळले माझिया [वरिता] । तरी यंदन भिडवी आतां । दुर्मर्षणासन्मुख.' ॥ १५ ॥ ऐकतक्षणीं वातवेगें । रथ लोटितां रमारंगें । सुसाटवात सारोनी मागें । सेनेमाजी शिरकले. ॥ १६ ॥ निवातकवचअंतक रोखें । गांडीव स्फुरोनी महाघोपें । शर वर्षांनी रौद्र कर्कश । निवारिलें शस्त्रातें. ॥ १७ ॥ मेघपडळ निबिडथाटी । वात | भंगी न लगतां त्रुटी । की शिशिरऋतु पातल्या पाठी । पर्ण वृक्षा न थारे. ॥ १८ ॥ तयापरी सर्वही शस्त्रे । विगत केली पांडुपुत्रे । शर सोडिले जपोनी मंत्रे । विद्यातेजें व्यापिले. ॥ १९ ॥ सरसराट अग्निज्वाळा । तैशा विखुरल्या शरौघमाळा । तटतटां खंडुनी वीरमौळा । रुंडे धरा पिटिती. ॥२०॥ मुगुटकुंडलें रुचिर मौलें । उसळोनी अवनी पडती 'सेलें । जाणों श्रीमंतीं | भूलिंगा कमळे । लक्षावधी अर्पिलीं. ॥ २१ ॥ शस्त्रासहित खंडती कर । | पादरहित कित्येक वीर । खंडविखंड शरीरें सैर । भूमी इतस्ततः जाहली. | ॥ २२ ॥ अश्वगजांची चाकोरी । बैसविल्या देहुड पाहारीं । जाणो खचोनी महागिरी । शय्या केल्या भूमिकें. ॥ २३ ॥ कंबंधे उठोनी शस्त्रासहित । धावोनी परातें करिती सँत । भूतगणांचे संघ बहुत । हर्षमान नाचती. ॥२४॥ ऐसा सेनेचा निःपात । जाला राया ! अति अद्भुत । जेवीं उदयो करितां आदित्य । तमाचा नाश ज्यापरी; ॥ २५ ॥ तयापरी विकळ सेना । पार्थक्रोधाची नव्हे गणना । जाणों मध्यान्हीं तेजराणा । तपे सूर्य ज्यापरी. ॥ २६॥ अर्जुनाकडे १. लोखंडी जाड काठी. २. सोंटे. ३. गोफणी. ४. माहुतांनीं. ५. अंकुशांनीं. ६. तोलांत धरून, सांवरून. ७. आच्छादित केले. ८. माझ्यावर हल्ला करून आले. ९. अर्जुन. १०. चिपडी, चुटकी. ११. जमिनीवर. १२. वेगाने. १३. मस्तक तुटून गेलें असतांही चलनवलनयुक्त जे घड तें. १४. जखम,