१२२ नरहरिकृत [द्रोणपर्व पुढे कांबोजराजा । सेना बलिष्ठ फोडिली भुजा । तयानंतरें जळसंध ध्वजा । उभारोनी दबेंसी. ॥ १०५ ॥ दुर्योधन बंधुवर्गेसी । यांपुढे उभा दळभारेंसी। सतत युद्ध आयुधेसी । उँलाळती शूरत्वे. ॥ १०६ ॥ शकटद्वारीं द्रोणाचार्य। महाप्रतापी तेजिष्ठ सूर्य । सदृढदळीं भूपतिवर्य । युद्धालागीं तळपती. ॥१०७|| सेनासमुद्रीं वीरलहरी । उल्लाळती गगनोदरीं । चतुरंग सेना मत्स्यापरी । महाविक्रमें तळपती. ॥ १०८ ॥ वायें त्राहटोनी अनेक । सिंहरवें फोडिती हाक । तंव कपिध्वज ज्वलित अर्क । देखते जाहले सुशोभा. ॥ १०९ ॥ रौद्र संग्राम अतिदारुण । वीररसाचें सुधापान । श्रोते सज्जनीं अर्तमान । ग्रहण किजे आवडी. ॥ ११० ॥ श्रीगुरुभीमराजसुधाकर । कृपारश्मी करितां प्रसर ।। चातकनरहरमोरेश्वर । निवोनी निववी श्रोतयां. ॥ १११ ॥ अध्याय सोळावा. संजय वदे, “राजसत्तमा ! । अर्जुन पावता संग्रामा । जाणों अंतक पातला नेमा । ऐसें वीरीं मानले. ॥ १ ॥ गडबडोनी नृपमांदी । “घ्या, घ्या,' शब्द बोलती संधी । संनद्धबंधू लोटला युद्धी । दुर्मर्ष अग्रता. ॥ २॥ श्लाघा बंद प्रफुलवाणी । ‘सव्यसाची खिळीन बाणीं । प्रेतासनीं पहुडूनी रणीं । प्रेतमक्षिका घोंगवीं. ॥ ३॥ अत्यंत चोज वीरां सकळां । दावीन आजी रणमंडळा।। धनुष्यबाण तुकोनी, दळा । लोटता जाहला सन्मुख.. ॥ ४ ॥ तंव तो प्रतापमल्ल किरीटी । देवदत्त स्फुरिता जाहला होटीं । हर्ष पावोनियां जगजेठी ।। पांचजन्य वाहिला. ॥ ५ ॥ प्रभिन्न नादें व्यापिल्या दिशा । भयभीत सेना पावली त्रासा । भूतगणा थोर वळसा । मळमूत्र अश्वीं सारिलें. ॥ ६ ॥ क्षीण होवोनी वीरश्रीरंग । लक्षिती पळायाचा मार्ग । क्षात्रधर्म स्मरोनी सांग । उदित जाहले युद्धार्थी. ॥ ७ ॥ वाजंत्राची एक घाई । अनेक वाद्ये स्फुरिलीं तिहीं । क्रोधे लोटोनी रणमही । शस्त्रधारीं वर्षले. ॥ ८ ॥ गदा, १. हर्षयुक्त झाले, आनंदाने उडू लागले. २. शोभती, चकाकती. ह्या ओवीतील ‘रूपक' फार सुंदर आहे. असेच रूपक मुक्तेश्वराच्या कवितेतही आढळते. (आदिपर्व-अध्याय ४४ ओव्या ५३५४ पहा). ३. सुधाकर=चंद्र. ४. येथे वस्तुतः ‘चकोर' पाहिजे होते. (मागे पृष्ठ २७, टीप ३ पहा.) ५. ह्या अध्यायांत मूळांतील ८८-९३ अध्यायांचा सारांश ग्रथित केलेला आहे. ६. ज्याच बंधु युद्धाकरितां कंबर बांधून तयार आहेत असा. ७. धृतराष्ट्राच्या वातपुत्रांपैकी एक. ८. ओठी, ओठानें. ९. फुकिंकला. १०. संकट, ११. योद्धे.
पान:महाभारत.pdf/139
Appearance