पान:महाभारत.pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५ अध्याय महाभारत. १२१ शरदारुण । काळघाती हस्तकीं. ॥ ८७ ॥ पृथक् पृथक् राजभार । आचार्या नमी शूर । रजी दाटले अंबर । सेना दृष्टी कळेना. ॥ ८८ ॥ हृष्टमानसे आरद्वाज । जयद्रथासी वदे गुज । ‘तव अॅनीकिनी तेजःपुंज । वीर शूर संग्रामीं. ॥ ८९ ॥ तव रक्षणा आणीक सेनाभार । दाहा सहस्र दशक अश्वस्वार । साहा अयुत रथवर शूर । दंती चौदा सहस्र, ॥ ९० ॥ दोनी लक्ष वीस सहस्र । पताकी वीर त्यांमाजी मिश्र । युवतरस्वी मंडितशस्त्र । रत्नाभरणीं साजिरे. ॥ ९१ ।। याहीवेगळे षड्थी । वीर, शूर, प्रभिन्नशक्ती । सर्वास्त्रभेदी, कुशळगती । जे काळातें अजिंक्य. ॥ ९२ ॥ अश्वत्थामा, सोमदत्ती, कर्ण, । चौथा कृपाचार्य, वृषसेन, । “षष्ठेम' शल्य बळसंपन्न । रक्षणा तूतें वोपिले. ॥ ९३ ।। आकाश खचतां करिती स्थिर । समुद्र लोटतां सारती दूर । पार्थासमान एकवीर । धीर शूर प्रतापी. ॥ ९४ ॥ यांहीवेगळे सर्व पर्थिव । तुझ्या रक्षणीं उदित सर्व । व्यूह निर्मितों बहु अपूर्व । जो वासवा असाध्य'. ॥ ९५ ॥ ऐसा द्रोण बोलतां वाणी । सेनासज्ञ पातला शकुनी । सवें रथिवरांची भरणी । तिव्याहत्तर सहस्र. ॥ ९६ ॥ हैस्तिरोह प्रतापवान । शिक्षित गज प्रभिन्न घन । त्यांचा अर्धभाग दुर्मर्षण । घेवोनी सेना पातला. ॥ ९७ ॥ तया अग्री विपुल सेना । दुःशासन, विकर्ण, आले रणा । सैंधवरक्षणीं व्यूह निपुणा । द्रोणाचार्ये निर्मिले. ॥ ९८ ॥ सप्त योजनें पूर्ववाहिनी । वीस कोस रुंदीची भरणी । षट्कव्यूह सप्तावर्णी । सेना सकळी सजिली. ॥ ९९ ॥ माजी प्रभिन्न पद्मव्यूहू । पौळी तीन अवघड बहू। संधी निगूढ सूचिकाव्यूहू । संहस्राक्षा लक्षेना. ॥ १०० ॥ मध्यभागी अल्पायुषी । सैंधव ठेविला सेनाकोषीं । अंतकदूत पातला त्यासी । फिरवी ऐसे ऐकिजे. ॥ १०१ ॥ असो; रक्षणा संधोसंधी । ठेविले वीर निबिड मांदी। जे काळासही लोटती संधी । बाहुविक्रमें माघारे. ॥ १०२ ॥ तीन व्यह अवघड थोर । जाणे सौभद्र त्याचे नगर । कीं तें त्रिपुरासुराचे पुर । एक हरहरी भेदिता; ॥ १०३ ॥ तयापरी अनीकिनीदुर्ग । रक्षणा वोपिले वीर सुभग । सूचिकाग्रहारी ऐश्वर्यसीग । भोजराज कृतवर्मा. ॥ १०४ ॥ तया. । १. धुळीने. २. आकाश. ३. द्रोणाचार्य. ४. सैन्य. ५. एक लक्ष (१०,०००x१०=१,००.... ६. अयुत=दहा हजार. ७. हत्ती. मूळांतही हीच संख्या दिलेली आहे (अध्याय ८७श्लोक १२). दमाचे व आवेशी.९. वस्तुतः षष्ठ असे रूप पाहिजे होते. १०. राजे. ११. तयार, तत्पर. १२. हनी. वरील योद्धे. १३. तट, भिंती. १४० हजार डोळे ज्याला आहेत अशा इंद्रास सुद्धां, १५, कि काणीं. १६. प्रसंग ठेपल्यास. १७. सूचिका व्यूहाच्या तोंडच्या (पुढच्या) फळींत उभा । १८ न हो,