पान:महाभारत.pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२० नरहरिकृत (द्रोणपर्व लागल्या हारी। बंदी मागध नामोच्चारीं । ब्रीदवळी स्फुरती. ॥ ७३ ॥ मेरुशिखरी रविउदय । शोभला तैसा धनंजय । कराग्री प्रभिन्न चापवर्य । इंद्रधनुष्यासारिखें. ॥ ७४ ॥ हेरिरश्मी डोलतां हरी । हरी वेगें लोटला समरीं । रथारूढ युयुधान चापकरी । पार्थासन्निध जातसे. ॥ ७५ ॥ जाणों बुध, शुक्र, एके स्थानीं । कीं चंद्र आणि देवै तरणी। ना ते श्रीराम, सौमित्र, गुणी । तेवीं उभय शोभले. ॥ ७६ ॥ शंकुनलाभ सुचिला पंथीं । वायु अनुकूळ मंदगती । हर्षनिर्भर सुभद्रापती । कृत कार्य मानिले. ॥ ७७ ॥ तोषोनी सुरेंद्र रिपुकदन । यदुवर्यरमणीस्वसारमण । कुतिभोजनंदिनीनंदन । बोले वाक्य सात्यकी. ॥ ७८ ।। म्हणे, ‘बापा ! शिनिपुंगवा !। समान विक्रम तुझा मघवा । धनुर्विद्येचा पूर्ण ठेवा । दुजा प्रद्युम्न जाण पां. ॥ ७९ ॥ अपराजित सर्व मंही । अवक्र प्रेमा आमुचे ठायीं। धर्मी व्यतिरेक न वचे कांहीं । रक्षीं धार्मिक जगदात्मा. ॥ ८० ॥ द्रोणाचार्य प्रतापउदधी । धर्मग्रहण पाहे संधी । समरांगणीं निगूढ बुद्धी । सांभाळिजे, नरवर्या ! ॥ ८१ ॥ तुझा भरवसा दृढ चित्तीं । मी जात कदनाप्रती । जाहली जयद्रथाची शांती । मनी निश्चिती, यादवा ! ॥ ८२ ॥ ऐसें वदोनियां वचनीं । दिधली आज्ञा गौरवमानीं । ये हर्ष पावोनियां मनीं । धर्मनिकटीं पाँतला. ॥ ८३ ॥ येरीकडे कौरवमेळीं । स्वकर्म सारुनियां सकळीं । वीरश्रीची धरोनी फळी । संग्रामाते निघाले. ॥ ८४ ॥ कडकडाट सेनाभार । लोटले जैसे नदीचे पूर । शस्त्रअस्त्रे तुकिती सैर । सिंहनाद फोडुनी. ॥ ८५ ॥ पुढे उभा द्रोणाचार्य । जाणों वसंतीं प्रदीप्त सूर्य । तप्तेहाटकस्यंदनवर्य । शोभायमान पताकीं. ॥ ८६ ॥ वेदी, कृष्णाजिन, ध्वजिचिन्ह; । सेनेश, बळिष्ठ, महाप्रवीण् । प्रभिन चाप, १. कीर्ति वर्णन करिती. २. हरी (श्रीकृष्णाने) हरिरश्मी (घोड्याची लगाम) डोलतां (हालवून इशारा करितांच) हरि (रथाचा घोडा) वेगें (मोठ्या वेगाने) समरी (युद्धांत) लोटला (बुसला)–असा सार्यान्वय. ३. सूर्य. ४. ह्या प्रसंगी शुभ शकुन झाले, असे मूळांतही आहे (अध्याय ८४ श्लोक २४।२५ पहा). ५. कुंतिभोजराजाच्या कन्येचा (कुंतीचा) पुत्र (अर्जुन), ६. शिनिकुलश्रेष्ठा ! (सात्यकी). मूळांतही हाच शब्द आहे (श्लोक २८). ७. पृथ्वीमध्ये पराभव न पावलेला. ८. निष्कपट प्रेम. ९. अपवाद, उणेपणा. १०. धर्मराजास धरण्यासाठीं. ११. मान, समज. १२. सात्यकी. १३. येथे मूळांतील प्रतिज्ञापर्व संपून जयद्रथवधपर्वास आरंभ होतो. १४. येथे मूळांतील ८७ व्या अध्यायास आरंभ होतो. मूळांतील अध्याय ८५ व ८६ यांतील कथाभाग विशेष महत्वाचा नसल्यामुळे कवीनें तो गाळिला आहे: १५. तप्तसुवर्णासारिखा (झळकणारा) उत्तम रथ.