पान:महाभारत.pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५ अध्याय महाभारत, ११९ तो ऐश्वर्याचा पूर्ण पुतळा । जयश्रीचा वोतींव गोळा । सुहृद नृपाचा सर्वे मेळा । येता जाहला सभेते. ॥ ५६ ॥ अर्जुन देखोनियां नयनीं । समस्त आल्हाद थोर मनीं । अभ्युत्थानी नृपाच्या श्रेणी । सत्व धार्मिक कुरुवर्य. ॥ ५७ ।। प्रसन्न मानसें कपिध्वजें । वंदिलें अंग्रजपादांबुजें । स्नेहें आलंगोनी धर्मराजे । अवघ्राणिलें मौळाते. ॥ ५८ ॥ बैसवोनी आसनानिकटीं । करी हर्षसंवादगोष्टी । म्हणे, ‘बापा ! प्रतापजेठी । प्रसनमुखी विराजें. ॥ ५९॥ येरू वदे, ‘श्रीकृष्णच्छाया । महदाश्चर्य देखिलें राया ! । शत्रवृत्तांत निवेदिली पायां । विस्मयतोषं सवते. ॥६० ॥ हर्ष पावोनी धर्मराज । म्हणे, ‘साहाकारी अधोक्षज । भक्तपाळक, [अरितरुगज] । करुणाकर, दीनबंधू. ॥ ६१ ॥ अनाथनाथ, अब्जपाणी । अनिवार सर्वी आनंददानीं । अभयदाता, ऐश्वर्यखाणी । कर्ता काय नव्हे पां? ॥ ६२ ॥ कार्य, कारण, कर्तव्यता। विदित सर्व रमाकांता । प्रसन्न करुनी कैलासनाथा । यश पार्था वोपिलें. ॥ ६३ ॥ ‘साधु! साधु !' हा या शब्द। पार्था प्रशंसी बीरमांदी । हर्षयुक्त वीरश्री संधी । उठते जाहले संग्रामा. ॥ ६४ ॥ फाल्गुने प्रणम्य धर्मचरणा । करुनी निघतां, दाटली सेना । देवाधिदेव वैकुंठराणा । सेयँ विधिभवाते; ॥ ६५ ॥ योगी, मुनी, सनकादिकां । ध्यातां ध्यानीं नातुडे जो का । नानाविलासी जगअंबिका । रंजवी प्रीतीसी कौतुकें; ॥ ६६ ।। ऐसा समर्थ सर्वेश्वर । भक्तकाजीं वावरे सैर । आवडी उठोनियां सत्वर । सज्जी रथ पार्थाचा. ॥ ६७ ॥ विराजित तेजें बालार्ककिरणीं । तप्तकांचनी रत्नाभरणीं । पताका तळपती मत्स्यमानी । ध्वज कपींद्र विराजे. ॥ ६८ ॥ वाजी जंतोनियां अभंग । शस्त्रास्त्रमांदी भरले सीगें । धुरे बैसोनी रमारंग। पार्थासन्निध पातला. ॥ ६९ ॥ सूर्यसारथी चतुर अरुण । कीं सुरेंद्र येतां मातली प्रवीण । तेवीं सूतराज इंदिरारमण । करी सारथ्य पार्थाचे. ॥ ७० ॥ सव्यसाची हर्षवर्धन । ब्रह्मवृंदासी करी नमन । येरें जयमंत्र वदोनी पूर्ण । ‘जिकी' म्हणती ‘शत्रूतें. ॥ ७१ ॥ करोनी स्पंदना प्रदक्षिण । हृदयीं स्मरुनी श्रीकृष्णचरण । ‘जय जय' शब्दें नामस्मरण ॥ करुनी, रथ आरूढे. ॥ ७२ ॥ भेरी, गोमुख, वाजंतरीं । अनेक वाद्यां १. धर्मराजाच्या पदकमळांस. २. हुंगिलें. डोके हुंगणे-हे प्रेमाचे व वात्सल्याचे चिः आहे. मौळ=शिर, डोके. ३. स्वप्नांत झालेले शंकराचे दर्शन व त्यापासून झालेला अस्त्रलाभ इत्यादि वर्तमान. ४. साह्यकर्ता. ५. वीरसमुदाय. ६. सेवा करण्यास योग्य. ७. प्राप्त होत नाहीं. ८. जगन्माता (लक्ष्मी), ९. परिपूर्ण. १०. रथास,