पान:महाभारत.pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६९. नरहरिकृत [द्रोणपर्व वनमाळी! | माळीसुमाळीअंतका ! ॥ ३९ ॥ देवदेवेश ! सनातना! । विष्णु ! जिष्णु ! मधुसूदना ! । सारंगपाणी ! हरी ! कृष्णा ! । उरुविक्रमा ! त्रिमूर्ती! ॥ ४० ॥ अच्युता! अनंता ! रमाकांता ! । त्रिविक्रमा ! वामना ! कंसहंता ! । भक्तपाळका ! भगवंता ! । विज्ञापना परिसिजे. ॥ ४१ ॥ अर्जुने स्फुरिला प्रतिज्ञापण । तोतंव दुःसह महाकठिण । सेनेसह षडूथी घन । जीवोदार रक्षण. ॥ ४२ ॥ ऐसियाच्या करितां घाता । अवकाश नाहीं रमाकांता! । कौरवसमरी बुडालों आतां । आश्रयनौका हरी तू. ॥ ४३ ॥ हा काळवरी दुःख क्लेश । देखिला नाहीं सुखाचा लेश । आजी पातला काळदिवस । समाप्तीते न्यावया. ॥ ४४ ॥ यांहीमाजी भरंवसा जीवा । तूं सारथी आमुतें देवा ! । माघां अमित दुःखार्णवा । विलया नेला अच्युता ! ॥ १५ ॥ अनाथनाथ ब्रीदावळी । सत्य करावी वनमाळी ! । शत्रुजय मेळवोनी धुळी । फेडी काजळी चितांची.' ॥ १६ ॥ जळदप्राय निश्चित शब्दू । हांसोनी बोले मंदमंदू । म्हणे, ‘जाणत्या ! खेदविषद् । करणे तूतें अयोग्य. ॥ ४७ ॥ पा समान धनुर्धारी । नाहीं वीर अवनीवरी । ज्याचिया कुँद्धा त्रिपुरारी । तोषोनी अप पाशुपत. ॥ ४८ ॥ अस्त्रप्रभव सांडी कोटी । निवातकर्वच प्रेरिले हेटी । हर्षित सुरेंद्र होवोनी पोटीं । किरीट वोपी पार्थाते. ॥ १९ ॥ अस्त्र[कुशल], अमोघवीर्य । जितक्लमा, अचळधैर्य । तरुण, तरणिप्रतापवर्य । सिंह, दाक्षण्यतेजस्वी. ॥ ५० ॥ आणि मी सारथी त्रिजगत्पती । तृणप्राय कौरव भस्म क्षिती । पापकर्मा सौभद्रघाती । पडिलें शीस ऐकसी. ॥ ५१ ॥ प्रभिन्न तनु, व्यतिरेक शीस । गीधगोमायु भक्षिती मांस । पठीसी सूदतां दिवौकस । शिक्षा करणे तयांतें. ॥ ५२ ।। जयद्रथ गेला काळसदना ! निश्चय मानीं कुरुभूषणा ! । शोक त्यागुनी दुर्वासना । स्वस्थ राहें, श्रीमंता !' । ॥ ५३ ॥ श्रीकृष्णवाक्यामृतघन । कृपातुषारें वर्षती जीवैन । धार्मिक धर्म क्षिती जाण । निवांत राहे स्वस्थता. ॥ ५४ ॥ तंव तो प्रतापाचा राणा । जेणे खांडव वोपिलें दाना । आरोग्य करुनी हुताशना । सरंक्षी मयाते. ॥ ५५ ॥ ? " ए - ॥ ।

  • १. जंबुमाळीच्या घातका! २ जीवावर उदार, आपल्या प्राणाची पर्वा न करणारे.. ३. येथे किराताजुनीय कथानकावर कटाक्ष आहे. ४. निवातकवच नांवाचे तीन कोटी राक्षस होते, त्यांस अर्जुनाने मारिलें. (मुक्तेश्वर–वनपर्व-अध्याय १० ओंव्या ८६-९५ पहा). ५. आग्रही, नेटाने झुंजणारे. चिकाटीचे वीर, ६. बालसूर्याप्रमाणे. ७. गिधाडे व कोल्हे. ८. देवांनी पाठीशी घातला (आश्रय दिला ) तरी. ९. हा शब्द लिष्ट आहे. जीवन=(१) पाणी; (२) चेतना, उत्साह, १०. खांडववन, (मुक्तेश्वरकृत-आदिपर्व-अध्याय ४९ पहा). ११. अग्नीसः ।

। P