पान:महाभारत.pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५ अध्याय) महाभारत. ११७ कोण करी गणणी । बैसैकातें वोपोनी झणी । अर्घ्यपायें पूजिले. ॥ २२ ॥ खैक्, चंदन, धूप, दीप, । मधु, सैप, फळे अमूप । अर्पण करुनियां नृप । घाली दंडवत समस्तां. ॥ २३ ॥ दोहा, कपिला, सगुण, धेनू । ब्राह्मणा अप कुरुनंदनू । वस्त्रे, पात्रे, जळकुंभ, घनू । वोपी द्विजां आवडी. ॥ २४ ॥ भूरिदक्षिणा एकएका । सुवर्ण निष्क पृथक् पृथक । देवोनियां कुरुनायक । कॅरी भोजन स्वपंक्ती. ॥ २५ ॥ विडे देवोनी समस्तांसी । वस्त्रे स्वीकारी । महातोषी । भूषणे भूषित तेजोराशी । मुक्तमाळा स्वकंठीं. ॥ २६ ॥ भृत्यजनांचा भोंवता पाळा । चामरें ढळती सोमँकीळा । मागध वर्णिती वंशमाळा । पातला मेळा सभेते. ॥ २७ ॥ मृदु अस्तरणे इंद्रगोपेवर्णी । रुक्मसिंहासने रत्नवर्णी । जे अर्पिलीं प्रीतीकरुनी । विर्श्वकर्मा आवडी. ॥ २८ ॥ तया सिंहासनीं विराजमान । बैसला राजा कुरुनंदन । शिरीं छत्र हिमकरमान । मुक्तझक्लरी सतेजें. ॥ २९ ॥ उभयभागीं वीरश्रेणी । शस्त्राभरणीं प्रदीप्त किरणीं । पुढे विनयें वेत्रपाणी । रुक्मदंडी साजिरे. ॥ ३० ॥ मागध वर्णिती ब्रीदावळी। गुणिजन आलाप वाद्यमेळीं । जाणों अमृताची साउली । निवे सदा हृत्पद्मीं. ॥ ३१ ॥ नाकपृष्ठीं ऐश्वर्यबीज । तैसा शोभला धर्मराज । तंव सेना होवोनियां सज्ज । दर्शना नृपा पातले. ॥ ३२ ॥ गजकिंकाट वाद्यध्वनी । नेमीगर्जना त्यामाजी दुणी । अश्वघोष, खुरघोष, मेदिनी । कंपायमान थरारी.॥३३॥ पृथक् पृथक् सेनाभार । सन्नद्धबद्ध प्रतापवीर । येतां नमना नामोच्चार । वेत्रपाणी जाणविती. ॥ ३४ ॥ सँधैररवें गौरवमान । समस्तां तोषी कुरुनंदन । तंव विराट, द्रुपद, धृष्टद्युम्न । भीमसेन प्रतापी; ॥ ३५॥ धृष्टकेतु, शिखंडी, चेदिप, । माद्रीतनुज वन्हिरूप, । चेकितान, केकयनृप । द्रौपदीपुत्रादि पातले. ॥ ३६॥ सन्मानूनियां युधिष्ठिरें । आसनीं बैसविलें आदरें । ऐसियामाजी यादवेश्वरें । येणें केलें सभेते. ॥३७॥ परमानंद धर्मराजा । स्वागत करुनी अधोक्षजा । वैरीसन अर्पोनियां वोज । केली पूजा विध्युक्त.॥३८॥ विनयें जोडुनी कृतांजळी । स्तविता जाहला वाक्यकमळीं । ‘हरी ! मुकुंदा ! | १. बैठकांना, आसनांना. २. फुलांची माळ. ३. तूप. ४. पुष्कळ दूध देणा-या. ५. विपुल दक्षणा. ६. करवी' असा पाठ अर्थानुरोधाने असावयास पाहिजे. ७. चंद्रप्रभेची. चांदण्यासारखी शुभ्र. ८. आंथरलेल्या गाद्या वगैरे. ९. इंद्रगोप नामक किड्याच्या रंगाप्रमाणे लालभडक. १०. विश्वकर्याने. ११. चंद्रासारखे शुभ्र, तेजस्वी व वाटोळे. १२. छडीदार. १३. रथचक्रांचा गडगडाट. १४. भालदार. १५. गोड शब्दांनीं. १६. श्रेष्ठासन, सिंहासन, १७. काळजीपूर्वक. १८. अध्याय ८२ पहा.