१५ अध्याय महाभारत. अक्षयी चाप, । फाल्गुना वोपित सकृप । घेवोनी शिरसा वंदिले. ॥ ११४ ।। स्तवनीं स्तवोनी वृषध्वजा । मस्तक न्यासिला पादांबुजा । आज्ञा मागोनी महाराजा । शिबिराप्रती पातले. ॥ ११५ ॥ दारुकेसी संवाद गोष्टी। करी तैसाची जगजेठी । विस्मयानंदें वीर किरीटी । जागृतीतें पावला. ॥ ११६ ॥ तंव मंत्रोच्चारआवृत्ती । पढतां बैसला सावधमती । फुललोचन हर्षचित्ती । म्हणे, ‘हे करणी कृष्णाची. ॥ ११७ ॥ तो विश्वात्मा, विश्वभर । विश्वाधीश, विनीतसुर, । विधिहर विदूषणे नेती पार । इंदीवरदळलोचना. ॥ ११८ ॥ नीरदश्याम राजिततनू । नित्य नूतन कीर्ति घनू । निःसंग अमळ भानू । भक्तप्रिय सुखदाता. ॥ ११९ ॥ ऐसा असतां माझिये पाठी । कायसी संग्रामाची गोष्टी ? । जयद्रथशिर पृथ्वीतटीं । असतां वी, पाडीन.' ।। १२०॥ प्राप्त जाहला प्रातःसमयो । स्वल्प नव्हे साच मॅमेयो । चित्तीं स्मरोनी कृष्णपायो । करी गायन सद्भक्ती. ॥ १२१ ॥ असो पुढां तेंची कथन । भीमराजकृपेकरून । नरहर मोरेश्वर जाण । निवेदीत श्रोतियां. १२२ ॥ अध्याय पंधरावा. संजय म्हणे, ‘ऐश्वर्यसिंधू ! । उदया येता खगेंद्रबंधू । हर्ष पावोनी करिती शब्दू । मयूरतीर उल्हासें ॥ १ ॥ तेणें चीयिरें जालें भ्रमरा । रजनीचरीं सोडिलें थारा । उँडुगणे मानोनी दरारा । आच्छादिती मुखाते. ॥ २ ॥ पुष्पवाटिकासह पद्मिणी । मंद अधर स्फुरिती गुणी । परागसंघ भरले गगनीं । साँउमा सूर्या आवडी. ॥ ३ ॥ पातला भास्कराचे ठाण । साँधकीं शंख वाहिले घन । दिशादेवी सोज्वळमान । सरे मागें तमवृद्धी. ॥ ४ ॥ विअंबक == १. येथे मूळांतील बराच भाग कवीने गाळिला आहे (अध्याय ८१ पहा). २. हा कृष्णाचा सारथी. ह्याचा मुलगा सुमती. हा प्रद्युम्नाचा सारथी होता (दारुकाचा पुत्र सुमती । प्रद्युम्नाचा तो सारथी । मुक्तेश्वर-वनपर्व अ० ३।२९). यावरून दारुकाचे वंशज यादवांकडे वंशपरंपरा सारथ्याचा धंदा करीत असत, असे दिसते. ३. पापें, अपराध. ४. कमलपत्रनेत्रा. ५. पवित्र. ६. सूर्यास्त होण्यापूर्वी. ७. ज्ञान, विषय. ८. ह्या अध्यायांत कवीने मूळांतील अध्याय ८२-८७ यांतील कथाभाग वर्णिला आहे. ९. अरुण. १०. तीर=एक जातीचा पक्षी. ११. चलनवलन, चांचरेपण, चेव. १२. नक्षत्रांनीं. १३. समोर, सन्मुख. १४. योग्यांनीं. १५. फुकिले, वाजविले. १६. जगताचा नेत्र (सूर्य). पृथ्वीवर होणारी बरीं वाईट कृत्ये सूर्य पाहतो, अशी समजूत आहे.
पान:महाभारत.pdf/132
Appearance