पान:महाभारत.pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११४ नरहरिकृत [द्रोणपर्व कार्य पावले सिद्धी । ऐसे मानिजे निश्चयबुद्धी । नरनारायण अवतारसंधी । देवकार्या मी जाणे. ॥ ९७ ॥ तुम्हां चितिल्या अर्थ घन । त्यासी आणीक करू शके कोण ? । इच्छित कार्य सांगिजे पूर्ण । सिद्ध करीन सर्वथा.' ।। ९८॥ शिवमुखींची ऐकोनी वाणी । नमन करोनी, जोडूनी पाणी । पार्थ स्तवी शूळपाणी । परमानंदेंकरूनी. ॥९९ ॥ ‘नमो भवाय, रुद्राय, । नमो वरदाय, शर्वाय, । महादेवाय, भीमाय, । त्र्यंबकाय, नमो नमो. ॥ १०० ॥ ईश्वराय, मखन्नाय, । पिनाकिने, नीलग्रीवाय, । लोहिताक्षाय, धूम्राय, । पशुपालाय, नमो नमो. ॥ १०१ ।। वृषभध्वजाय, पिंगाय, । ब्रह्मवक्राय, शिवाय । [स्मरपुरदहनाय, हराय]। अंबिकापतये, नमो नमो. ॥ १०२ ॥ नित्यनीलशिखंडाय, । तप्तमानापमुंडाय,। हिरण्यवर्णाय, उग्राय, । शांभवाय, नमो नमो.॥१०३॥ ऐसी । शतरुद्रनामावळीमाळा । स्तवितां तोषे जाश्वनीळा । हृदयीं धरुनी घनसांवळा । ‘पुरे पुरे' वदतसे. ॥ १०४ ॥ ‘तुज मज भेदाभेद पाहीं । स्वप्नांतरी नाढळे कांहीं । कार्याकारणे व्यतिरेकदेही । लीलाविग्रहा घेतस. ॥ १०५ ॥ तेथे उपचार आणि स्तवन । कोण्हा कोणास करिजे ? जाण । कौतुकें वाढविशी मान । मीतुंपण एकची. ॥ १०६ ॥ काय इच्छा ? करिजे आज्ञा' । श्रीहरी वदे वाक्यसंज्ञा । अर्जुने स्फुरिली प्रतिज्ञा । सिद्धी नेई दयाळा !' । ॥ १०७ ॥ हर्षयुक्त बोले पशुपती । त्याची म्यां योजिली पूर्वीच शांती । पाशुपत वोपीं पार्थाप्रती । धरणीभार हरावया. ॥ १०८॥ अस्त्रप्रभावें दैत्यश्रेणी । म्यां मर्दल्या समरांगणीं । सृष्टिसंहार प्रळयवन्ही । शमना अस्त्र असेना. ॥ १०९ ॥ अमोघ असतां, जागतां हृदयीं । जयाशा दूर न वचे कांहीं । अस्त्रराज सिद्ध प्रदेहीं । असतां चिंता कायसी ?? ॥ ११० ॥ ऐसे वदोनी पुराराती । पार्था उपदेशी पुनरावृत्ती । मस्तक स्पर्शानी वरद हस्तीं । ‘जिकिजे म्हणे ‘शत्रते.' ॥ १११ ॥ तव तेची काळी नवलाव । शतरुद्र पैं महादेव । भुजंगै जाहला अभिनव । तेजें दिशा लोपल्या. ॥ ११२ ॥ विषउल्बण अग्निज्वाळा । भेदोनी गेल्या दिग्मंडळा । विस्मित पार्थ, घनसांवळा,। स्तवोनी करी शांतता. ॥ ११३ ॥ प्रसनमान होवोनी रूप । दिव्य शर, १. स्वायंभुव मन्वंतरांत धर्मनामक ऋषीला मूर्तिनामक स्त्रीपासून दोन पुत्र झाले, त्यांची नांवें नर व नारायण अशी होती. हे दोघेही विष्णूच्या अंशाने जन्मले होते. पुढे हे नर व नारायण अनुक्रमें अर्जुन व कृष्ण ह्या रूपाने पृथ्वीवर अवतरले, अशी कथा आहे. २. अन्यथा. आणीक करणे=फिरविणे, नाहीसे करणे. ३. पाशुपतास्त्र मी अर्जुनास पूर्वीच दिले आहे. (मुक्तेश्वर–वनपर्व-अध्याय ४ पहा). ४. सप, साप. ५. विषपूरित. उल्बण=पुष्कळ,