पान:महाभारत.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४ अध्याय) महाभारत.. ११३ चित्र खाणी । वोप देती शृंगारवनीं । यक्षगंधर्वकिन्नरगानीं । नृत्यांगना नर्तती. ॥ ८० ॥ रत्नसरोवरें रुक्मकमळीं । झंकारसुस्वर अळिकुळीं । देवतटिनी तुंबळ जळीं । प्रवाह वाहे खळखळा. ॥ ८१ ।। त्वरमाण जातां उभय कृष्ण । जाणों लक्ष्मीनें केलें पेणें । [ की तेथ ये दर्शनाकारणे ] । शिवसखा ह्मणोनी. ॥ ८२ ॥ तेथोनी पुढां गिरि कैलास । देखिला निर्मळ स्वप्रकाश । नाना हिरियांचा वोतिला रस । किंवा राशी रजताची; ॥ ८३ ॥ ना तो सहस्र इंदूंचा मेळा । घोळुनी एकत्र केले गोळा । कीं क्षीरासिंधु मथोनी सगळा । ठेविला भेला लोण्याचा. ॥ ८४॥ शोभायमान प्रकाशरासी। उणे त्रिभुवन तुळितां त्यासी। देवाधिदेव व्योमकेशी। वसे जेथे विश्वात्मा. ॥ ८५ ॥ मध्यभागी रम्य शिखरीं । आसनारूढ शूळधारी । सहस्र सूर्याची तेजें थोरी । उणी दिसे त्यांपुढे. ॥ ८६ ॥ सुंदर तनू कर्पूरगौर । भाळीं विराजे रजनीश्वर । जटाजूट महारुचिर । वसे गंगा ते ठांई. ॥ ८७ ।। पंचवक्र, दश भुजा, । वाम मिरवे शैलात्मजा । भस्मधूलित, रुद्राक्ष वोजा । माळा कंठीं विराजे. ॥ ८८ ॥ गजचर्म, व्याघ्रांबर । आयुधे युक्त राजित कर । योगासनीं सर्वेश्वर । प्रसन्नमान बैसला. ॥ ८९ ॥ भोंवते ऋषिसिद्धांचे पाळे । जैसे रवीसवें किरणमेळे । गीतवाद्यआलापकीळे । गंधर्व गुणी रंजिती. ॥ ९० ॥ साठ सहस्र गणपाळ । पुढे उभे प्रदीप्तकीळ । करांबुजी लोहाच्या अर्गळ । विद्युत्प्राय झमकती. ॥ ९१ ॥ बाण, रावण, चंडीश, शौर्य, । नंदी, भुंगी, जटालय, । गणां मुख्य गणपती वर्य । सेवे बिनयें तिष्ठती. ॥९२॥ नवनिधी, अष्टमहासिद्धी,। जोडुनी पाणी उभ्या संनिधी। धनाध्यक्ष ऐश्वर्यसिद्धी । पुढे उभ्या नम्रत्वे. ॥९३॥ ऐसिया विभवें कपर्दी,। शंभु, पिनाकी, अचळवृद्धी । मृड, महेश, सोज्वळबुद्धी । पुराराति देखिला. ॥९४॥ प्रणम्य करुनी उभयतां । पुढे उभे जोडुनी हस्तां । हर्षानंद पार्वतीकांता । उचंबळे मानसीं. ॥ ९५ ॥ प्रसन्न मानसे मधुरोक्ती । स्वागत केलें उभयांप्रती । वदे, ‘दर्शनें निवालों चित्तीं । कार्य अंगमना निवेद. ॥ ९६ ॥ तें १. तेज, शोभा. २. भ्रमरसमुदायांत. ३. मुक्काम. ४. मोठा गोळा, ढेप. ५. चंद्र. ६. विराजित, शोभायमान. ७. समुदाय. ८. महापद्मश्च पद्मश्च शंखो मेकरकच्छपौ । मुकुंदकुंदनीलाश्च खर्वश्च निधयो नव'-हे कुबेराचे नऊ निधी (खजिने). ९. अणिमा लघिमा प्राप्तिः प्राकाम्य महिमा तथा । ईशित्वं च वशित्वं च तथा कायावसायिता ॥' ह्या अष्टमहासिद्धी, १०. जवळ, ११. त्रिपुरांतक. १२. येण्याचे कारण सांगा. १७ न० द्रो० ।