पान:महाभारत.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४ अध्याय] महाभारत. १११ त्वरित । विश्रामतां इंदिराकांत । पार्थप्रतिज्ञादुश्चितू. ॥ ४४ ॥ संतप्त मानस मुरारी । तर्क तक विविधा परी । रोपें प्रतापें मधुरोत्तरीं । दारुकातें अनुवादे. ॥ ४५ ॥ म्हणे, ‘फाल्गुने प्रतिज्ञापण । केला दुःसह महाकठिण । सिद्धी पावतां घोर दारुण । जो अवघड सुरेशा. ॥ ४६ ।। द्रोणे सैंधव घातला पाठी । महावीराची निबिड मिठी। काळही न सके पाहों दिठी । यक्ष, राक्षस, सुरही. ॥ ४७ ॥ तरी मी दारुका ! समरांगणीं । विगत करीन अकरा अक्षौहिणी । कर्णशल्यादि महामानी । दुर्योधना निवटीन. ॥ १८ ॥ अद्भुत विक्रम अति दारुण । उदईक पाहसी सूता ! जाण । भास्कर असतां वर्तमान । सैंधवशीस खंडीन.' ॥ ४९ ।। संतप्तमान सर्व गात्रे । दारुकातें बोले वक्रे । म्हणे, ‘माझीं जयस्वी शस्त्रे । वृथा कोण्हा करवितीं ? ॥ ५० ॥ अक्षयी रथ बालार्ककिरणी । खेवण्या जडल्या रत्नश्रेणी । पताका तळपती दामिनीमैनी । गरुडध्वज सुशोभा. ॥ ५१ ॥ जे जयाशेची सफळ खाणी । ऐश्वर्याची पूर्ण भरणी । शोभासदन रणांगणीं । सुखकारक स्वामीते. ॥ ५२ ॥ तो संजोगोनी दिव्यरथ । विश्वकर्यांचे वारु दत्त । जुतिजे जे का बळोनत । वेगें वातासारिखे. ॥ ५३॥ माझी कौमोदकी दिव्य गदा । रिपुमर्दना उदितं सदा । सुदर्शनचक्र असुरमदा । सोज्वळ करी सर्वदा ॥ ५४॥ सारंगधनु विशाळ शक्ती । शरयुक्त तूणीर काळघाती । सांभाळोनी घालिजे रथीं । आयुधठेवा सर्वही. ॥ ५५ ॥ अर्णवजनित पांचजन्यू । वृषभ शरें (१) स्फुरितां घनू । तुवां घेवोनी शीघ्र स्पंदनू । वातवेगें पाविजे. ॥ ५६ ॥ सूर्य असतां प्रगट व्योम । सैंधवशीस पाडीन भूमी । आड रिघतां षड्थी नामी । काळधामी वधीन. ॥ ५७ ॥ पार्थ माझा जिवलग प्राण । त्याविण अप्रीत सर्वही जण । रमा रमणी जगत्स्वामीण । नाहीं चाड तियेची. ॥ ५८ ॥ इष्टमैत्र, सुहृद, सुत, । धन, संपदा, ऐश्वर्यजति ।। अनावडी सर्व पदार्थ । सखा पार्थ मज प्रिय.' ।। ५९ ॥ दारुक म्हणे ‘जगनाथा! । कायसी सैंधवाची येथा । इच्छामात्र भुवनचलथा । सृजूनियां निवटिसी. ॥ ६० ॥ तूं परमात्मा, परमेश्वर, । मायानियंता, सर्वेश्वर, । अपार |१. कोंदणास. २. चकाकती, झळाळती. ३. वीजेप्रमाणे. ४. तयार करून, रथास घोडे जोडून. (संजोगणे=संयोगणें). ५. तयार, सिद्ध. ६. शस्त्रास्त्रांचे भांडार. ७. नामांकित, मोठे, ८. अप्रिय. ९. पर्वा, आवड. १०. नाना प्रकारचे ऐश्वर्य. ११. अप्रिय, न आवडणारे, १२. काळजी. येथे ‘कथा' असा पाठ असता, तर बरे झाले असते. १३. विधांच्या उतरंडी.