पान:महाभारत.pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११० नरहरिकृत [द्रोणपर्व शोक सांडूनी परता । भजे कांता सद्भक्ती. ॥ २७ ॥ दुष्ट सैंधव पापकर्मा । मृत्युलोकीं पावेल सीमा । पश्चिम आक्रमितां सूर्य, नेमा । छेदिलें शीसे ऐकसी. ॥ २८ ॥ पार्थप्रतापाची करणी । विदित असे तुझ्या कर्णी । शोक सांडूनी अंतःकरणीं । सुखानुभवीं सभाग्य. ॥ २९॥ भगवंती उत्तरा देवी । पुत्र जन्मेल प्रतापरवी । सांगों विसरला व्यास कवी । परी म्यां स्मरण दिधलें॥ ३० ॥ महाभागवत जगा नौका । पार भवाब्धी करी लोकां । वंशीं लावोनी पताका । उद्धरील कुळ विश्वाचे'. ॥ ३१ ॥ असो, संबोखोनी भगिनी । शांतविली याज्ञसेनी । आज्ञा घेवोनी चक्रपाणी । पार्थाप्रती पातला. ॥ ३२ ॥ जैसा दीप अंतगृहीं । प्रकाश करुनी लवलाहीं । द्वारदेशीं लावोनि तेही । करी सोज्वळ तैमातें. ॥ ३३ ॥ तयापरी श्रीअनंतें । शांतवोनी पांडवांतें । निद्रे धाडुनी समस्तांतें । जिष्णु सेना ऊठवी. ॥ ३४ ॥ रमाकुचाग्री जे का वाणी ।। स्पर्शतां निवे जगत्स्वामिणी । तया करीं श्रीचक्रपाणी । पाँणी धरी पार्थाचा. ॥ ३५ ॥ भक्तजनाची आवडी भारी । सांडणे करी तनूचे वरी । दासचरणा दखलहरी । स्पशों नेदी सर्वथा. ॥ ३६॥ कपुरदीपिका अग्रभागीं । शय्यासना पातला वेगीं । परिचारिका कोमलांगी । उपभोगीं दाटल्या.॥३७॥ अत्यंत यीक शय्यासदन । जाणों धनिकाचे कामभुवन । सुगंध द्रव्य, पराग घन । दिश अवंतू धांवती. ॥ ३८ ॥ मंडल घालोनी शुभलक्षण । केलें कुशास्तरण समसमान । लाह्या, रत्न, गंधे, सुमनें । शेजे थाट दाटलीं. ॥ ३९॥ कनककुंभ प जीवनीं । त्रिंबेकबळी विधानीं । संपादिले वेदोक्त. ॥ ४० ॥ स्वहस्त अळंकार, चंदन, । फाल्गुना वोपी मधुसूदन । उपहार दिव्य मिष्टान्न । कैरी तांबूला निवेदी. ॥ ४१ ॥ शयनीं पहुडूनियां पार्था । द्वारीं रक्षण ठेविलें दता । बंदोबस्त करुनी भोंवता । निघे सद्मासी श्रीकृष्ण, ॥ ४२ ॥ दारुक भक्तराज सांगातें । जैसे सूर्यासवें किरण भासतें । वेगळीक पुष्प परिमळालें । नोहे, ऐक्यता ज्यापरी. ॥ ४३ ॥ तयापरी भक्तभगवंत । शय्यासना पातला १. शेवट, अंत. २. शिर, डोकं. ३. ओव्या ३०-३१ यांस मूळांत आधार नाहीं. 'उत्तरेचे म) असे कृष्णाने द्रौपदीस सांगितले–असे वर्णन मूळांत आहे. (अध्याय ७८।३९ पहा) कवि सांगण्यास विसरले, ते आपण सांगितले आहे,असे उद्गार नरहरीप्रमाणे मक्तेश्वराही एकदोन ठिकाणी काढलेले आहेत. ४. संसारसागरापलीकडे, ५. अंधकारास. ६. हात. ७. त्याग, ओवाळून टाकणे. ८. बोलावू. ९. त्र्यंबकनामक बलीची पूजा करून, तो बळी कृष्णानें अर्जुनास उपाहारार्थ दिला (अध्याय ७९।४) १०. हातांत. ११. निजवून, निजावयास सांगून. १२. कृष्णाचा सारथि, १३. निराळेपणा, विभक्तत्व. १४. मागें पृ० १७, टी० ९ पहा,