पान:महाभारत.pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४ अध्याय] महाभारत, १०९ लासाचा अक्षयी सेतू । दुष्ट कौरव भंगिला. ॥ १२ ॥ आनंदाचे शोभायतन । उल्हासाचे वसे स्थान । माधुर्याचे पीयूषपान । मंगोनी गेलें एकदा. ॥ १३ ॥ मज सोडोनी राजहंस । उडोनी गेला आकाशास । मानससरोवर उद्वस । दुःख कोण्हा निवेदूं ? ॥ १४ ॥ आड रिघोनी बोसंगैा । पयःपान करी लगबगा। तो उत्साह महाभागा । शची देवी अप्राप्त. ॥ १५ ॥ रूप लावण्य विराजमान । गुणगांभीर्य विक्रमी घन । समरांगणीं भूपशमन । दुजा अर्जुन आभासे. ॥ १६ ॥ कुळवर्य पुत्र फाल्गुनाचा । त्रिजगदीशा ! तुझा भाचा । प्राणपढियंता द्रौपदीचा । पितृव्यांतें सुखकारी. ॥ १७ ॥ नाना उँपयोग करी निद्रा । जे अप्राप्य सुरेंद्रा । तो अजी प्रतापरुद्रा । भूमी लोळे निर्जनीं. ॥ १८ ॥ मी पापीण दैवहीन । केवीं लाहीन सुपुत्ररत्न ? । जेवीं राहु प्राशितां सुधाकण । चक्र कंठीं शिरकलें. ॥ १९ ॥ आतां कृष्णा ! करूं काय ? । कोणा मोकळं दीर्घ धाय ? । पुत्रसुखाची बुडाली सोय ! । दुःखें पाठी पुरवली !! ॥ २० ॥ ऐसें वदोनियां वचनीं । लोळे शोकें गडबडां धरणी । प्रमदावक्राची शंखध्वनी । भेदोनी गेली अंबरा. ॥ २१ ॥ जगन्मोहन, जगन्नाथू । जगनिवास, जगा असक्तू । जगदीश, जगन्माताकांतू। बुजावी भगिनी सुवाक्यें. ॥ २२ ॥ म्हणे, ‘माये ! सभाग्यखाणी ! । काळ ग्रासी लोक तीन्ही । बुद्दप्राय जंतुजीवनीं । शाश्वत केवीं मानिजे ? ॥ २३ ॥ अकीर्ति पुरुष जीतची मेला । कीर्तिमान ईहपरत्र भला । सर्व लोक स्तविती त्याला । धन्य जननी पवित्रा. ॥ २४ ॥ तव कुमार शिरोरत्न । पितृतुल्य विक्रमी घन । वीरसागर डहुळोनी पूर्ण । अमित भूप मर्दिले. ॥ २५ ॥ क्षत्री पडतां समरांगणीं । त्यांसी श्लाध्यता कोटिगुणी । रविमंडळ भेदुनी झणी । अक्षयी पदा विराजे. ॥ २६ ॥ तैसा स्वधर्म आचरतां । तुवां किमर्थ करणे चिंता है। दुःख | १. सौंदर्यधाम. २. येथे ‘मानस' शब्द लिष्ट आहे. ३. उत्संगा, मांडीवर. ह्या वर्णनाचे मर्म समजावयास सहृदय माताच पाहिजे. ४. प्राणप्रिय, प्राणासारखा आवडता. ५. चुलत्यांस, काकांस. ६. सरंजामाने. ७. लक्ष्मीकांत. ८. समजावी. ९. ह्या लोकीं व परलोकीं. १०. मोठेपणा, कीर्ति. ११. रणांत पाठ न दाखवितां शत्रुसंमुख उभे राहून जे वीर धारातीर्थी प्राण देतात, ते सूर्यमंडळास भेदून ब्रह्मलोकास जातात असे शास्त्रांत सांगितले आहे. अशा प्रकारचे वर्णन संस्कृतांत ठिकठिकाणी आढळते.-(१) विपक्षशस्त्रक्षपणेः पुनः पुनः क्षताखिलग्रंथि निजास्थिपं. जरम् । चकार चंडद्युतिमंडलोदरे सुखप्रवेशार्थमिवापरो भटः ॥ (२) द्वाविमौ पुरुषव्याघ्र सूर्य, डलभेदिनौ । परिव्राडू योगयुक्तश्च रणे चाभिमुखो हतः ।।