पान:महाभारत.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०८ नरहरिकृत [द्रोणपर्व की बाळाविरहित माउली । कृपण धन मिळतां धुळी । तेवीं तळमळ पार्थाते. ॥ ११३ । क्षणक्षणा वावरे शोक । जीवीं चिंता, विवर्ण मुख । स्वप्नांतरीं न दिसे सुख । दिशा दुःख व्यापिल्या. ॥ ११४ ॥ असो; पुढां तेची कथन ।। सजनी पान किजे श्रवण । भीमराजसेवक जाण । नरहर मोरबर कथी पैं. ॥ ११५ ॥ अध्याय चौदावा. संजय वदे, अवनीपती ! । अर्जुन निमग्न शोकावर्ती । अश्रुपूर्ण विमनस्कमती । वदे ग्लानी हरीतें. ॥ १ ॥ ‘पद्मनाभा ! पद्मजजनका ! । पद्मावल्लभा । पद्मधारका ! । पद्मपाणी! . पद्मलेखा ! । गणितां गुण अमोल्य. ॥ २ ॥ कुंदरदना ! कुंभिनीधेरा ! । कुँब्जाकुब्जीदिव्यकरा! । कुमतिहरणा ! कुशळ सुरा! । तवाश्रयें सुखाब्धी. ॥ ३ ॥ विनती तूतें सारंगपाणी । प्रवेशान राजभुवनीं । शांतवीं सुभद्रा याज्ञसेनी । सह वैराटी समस्त.' ॥ ४ ॥ विगत मानसे यदुनंदन । प्रवेशोनी भगिनीसदन । देखतांक्षणीं शोकंकृशान् । ६:खआज्ये धडकला. ॥ ५ ।। मिठी घालोनियां गळां धनू । हुंबाडा फोड। जैसी धेनू । विवर्ण वर्ण, विकल तनू । अंबुधारा अंबेकीं. ॥ ६ ॥ सूटोनी गेली वीरैगुंठी । कैच वावरे मुखसंपुटीं । छिन्नाभरणे सुरंग होटीं । बीभत्सता पातली. ॥ ७॥ वदनचंद्र विराजमान । शोक चतुर्दशीलहरीमान । लावण्यतेची प्रभा घन । अमाकाळीने ग्रासिली. ॥ ८ ॥ हृदयीं पेटला शोकवन्ही ।। रुदितरवशिखा गगनीं । मनमयूर ऑहाळुनी । दुःखार्णवीं पडियेले. ॥ ९ ॥ *अहा ! करुनी, 'केटाकटा । म्हणे, ‘कर्मा रे! बळकटा !। पुत्रशोकाचां देशवटा । प्राप्त जाहला ये काळीं. ॥ १० ॥ आजी जगडोल जाहला प्राप्त । सृष्टी बुडाली आनंदासहित । दिशा उद्वस, संपेंदाजात । शोकसागरीं बुडाल्या. ॥ ११ ॥ अभिमन्यु संतोषाचा केतू । सौख्यव्रताचा सरितीकांतू । हर्षवि ह्याचा येथे मूळांतील प्रतिज्ञापर्व' नामक पोटपर्व संपते. २. ह्या अध्यायांत मूळांतील ७८-८१ ह्या चार अध्यायांतील कथाभाग आला आहे. ३.(वराहावतारी)पृथ्वी पेलून धरणा-या. ४. कुबड्या कुबूजेला दिव्यदेहधारी करणा-या. ५. शार्ङ्गपाणि. ६. शोकाग्नि. ७. दुःखरूपी घृताच्या योगाने. ८० घट्ट. ९. हंबरडा. १०. अश्रुधारा. अंबु=पाणी. ११. डोळ्यांत. १२. केसांचा आंबाडा, बुचडा. १३. कच=केंस. १४. चतुर्दशीच्या लाटांप्रमाणे. १५. अमावास्येने. १६. पोळून. १७. हायहाय. १८. देशान्तर, स्वदेशत्याग, १९. भूकंप. २०. वैभवमात्र, सर्व प्रकारची वैभवे. २१. समुद्र