पान:महाभारत.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३ अध्याय महाभारत. १०७ घनघोजें. ॥ ९५ ॥ विश्वेश, ईश, विश्व सजता, । विश्वपाळण, विश्व हरिता, । विश्वभर, विश्व सरता, । म्हणे पार्था ही तो. ॥ ९६ ॥ “तुवां प्रतिज्ञा स्फुरिली नेमें । घाबिरा सैंधव तेणे कर्मे । दिशा लंधितां भयभ्रमें । द्रोणे पाठी सूदला. ॥ ९७ ॥ मुखें बोलिला पुरुषार्थ । व्यूह निर्मीन महासमर्थ । मध्यभागीं जयद्रथ । रक्षणा वीर चौफेरी. ॥ ९८ ॥ अग्री भूप महावरिष्ठ । कर्ण, भूरिश्रवा, कृप वरिष्ठ । द्रोण, वृषसेन, मद्र, श्रेष्ठ । जे काळाते अजिंक्य. ॥ ९९ ॥ एकएकासी जिंकितां युद्ध । षण्मासांची पुरे अवधी । त्वां तव प्रतिज्ञा स्फुरली संधी । असाध्य माते दिसताहे. ॥ १०० ॥ हांसोनी बोले धनंजय । “काय देवा ! घालिसी भय ? । हिरण्यपुरी दानववर्य । वासवाते अजिंक्य. ॥ १०१ ॥ एके रैथीं शस्त्रसंधानीं । निर्मूळ केल्या दैत्यश्रेणी । तोष पावोनी वज्रपाणी । मुगुट मातें वोपिले. ॥ १०२ ॥ शंभु तोषविला वनीं । अस्त्रराज लाधलें गुणी । तेथें कौरवांची अनीकिनी । कोण गणी ? स्वामिया ! ॥ १०३ ॥ तुझा मस्तकी अभयकर । असतां, धरेचा नृपवर । सुरांसहित सुरेश्वर । स्थिरचरा दिक्पंक्ती. ॥ १०४ ।। पायें चेपोनी भूपमूर्धी । सुरांदेखतां ब्रह्मास्त्रबाणीं । जयद्रथशिर पाडीन अवनी । रैवी असतां, प्रतापे, ॥ १०५ । तया रुधिराचे प्रवाहीं । भूषित करीन देवी मही । माझे बांधव आनंदगेहीं । वसते करीन सुखाने. ॥ १०६ ॥ दुःखसागरीं दुर्योधन । लोटोन, ऊर्ध्व कॅरीन मान । तरीच पृथेचा नंदन । दास अनुज धर्माचा. ॥ १०७ ॥ असो, ते निशी घोर काळी । काळ भाविला तये काळीं । नेणों पातली भद्रकाळी । क्षया सर्व न्यावया. ॥ १०८ ॥ घोर विघ्ने उदेली अवनी । रक्तस्राव जाहला गगनीं । जुझवातनाशकरणी । दृष्टी उघडों नेदिती. ॥ १०९ ॥ धूमांकित विवर्ण दिशा । कबंध नाचती अनेकशा । क्रव्यादपक्षी फोडिती घोषा । क्षयकारी जनाते. ॥ ११० ॥ गजाश्व रुदती, खळखळ । मूत्रमळ त्यागिती वेळोवेळ । दुश्चिन्हांचा पातला मेळ । सकंप सेना सर्वही. ॥ १११ ॥ दुःखशोकाचा पडिभार । सेना सुषुप्ती पावली घोर । निद्रा नये चटपटीवार । कृष्णार्जुना जागृती. ॥ ११२ ॥ जैसी जळावेगळी मासोळी । १. एकट्या वीराने. २. सैन्य. ३. सूर्यास्तापूर्वी. ४. वर डोके काढीन, यशस्वी होईन. ५. थोर, पराक्रमी व सज्जन पुरुषांस दुर्दशा प्राप्त व्हावयाची असल्यास आधीं सूचनार्थ दुश्चिन्हें घडतात, असे वर्णन संस्कृत, इंग्रजी व मराठी ग्रंथांत ठिकठिकाणी आढळते. ६. निद्रा ७. तळमळीनें. ८. अर्थसादृश्यः-चुकलीये माये । बाळ हुरूहुरू पाहे. ॥ जीवनावेगळी मासोळी । तैसा तुका तळमळी. ॥ Lh