पान:महाभारत.pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३ अध्याय महाभारत. १०५ करू । काळ वृकें फाटिला. ।। ६१ ॥ वणवा विझविला दर्भकणीं । वृश्चिकविषं जाळिला अशनी । निर्झरोदकें अगस्ती मुनी । वाहोनी गेला सागरा. ॥ ६२ ॥ तयापरी तैसी गती । सौभद्रासी जाहली प्राप्ती । सहस्रशः मारिल्या वीरपंक्ती । नराश्वगज प्रतापें. ॥ ६३ ॥ आठ सहस्र नव शत । नवदशक रथी बळसमर्थ । दोन सहस्र राजपुत्रांते । स्वर्गधामा वोपिलें. ॥ ६४ ॥ बृहद्वळा आणि लक्ष्मणा । प्रतापें धाडिलें यमसदना । वीरमंडळी डोलवी माना । जाता जाहला स्वर्गाते. ॥ ६५ ।। : पार्थ गहिवरोनी बोले वाणी । ‘उदईक अस्ता न पावतां तरणी । जयद्रथ पाठवीन कृतांतसदनीं । सत्य, सत्य त्रिवाचा. ॥ ६६ ॥ कर्णद्रोप्रादि शूरवर । आड रिघतां करीन स्थिर । निश्चयें मारीन सैंधव वीर । शेषापाठीं रिघतां. ॥ ६७ । नेमिल्या नेम जयद्रथा। न मारिता, पाप बैसे माथा । केला उपकार नाठवी चित्ता । लोक माते हो प्राप्त. ॥ ६८ ॥ ब्रह्मन्न, पशुन्न, भ्रूणहत्यारी, । गुरुतल्पग, मद्यपी, व्यभिचारी, । साधुनिंदक, द्रव्यापहारी, । वास्तव्य घडो मृत्युलोकीं. ॥ ६९॥ मातृद्रोही, जनकद्रोही । विषदाई, विपिनदाही, । पापसंगती, विश्रामदेही । घडो, न मारीं सैंधवा. ॥ ७० ॥ हें कार्य न पावतां सिद्धी । प्रवेश करीन अग्निसंधी । मम नेमाची अलोट विधी । भंगों न शके विधाता. ॥ ७१ ॥ व्राकृत कवीची वाग्वल्ली । सौभद्र पडिल्या भूमीवरी । लत्ताप्रहार मस्तकावरी । केला सैंधवें संतोपें. ।। ७२ ॥ सौभद्रे प्राण धरिला कंठीं । होतां धनंजयाची भेटी । गुज सांगतां, क्रोधे किरीटी । प्रतिज्ञा करी प्रतापे. ।। ७३ ॥ असो, पार्थप्रतिज्ञोत्तर । सर्वी ऐकिलें अतिदुस्तर । मान तुकोनी यादवेश्वर । पांचजन्य स्फुरिला. ॥ ७४ ॥ देवदत्त वीर अर्जुन। वाजवितां, नादें भरिलें गगन । वाजंत्रादि वाद्य घन । सिंहबाद वीरांचे. ॥ ७५ ॥ नाद ऐकोनी वीरीं । चक। मानिला बहु अंतरीं । गुप्त चार प्रगट हेरी । मात कर्णी फांकली. ॥ ७६ ॥ ऐकतेक्षणीं हर्षमुद्रा । वोहँढोनी मिनली समुद्रा । प्राणांत गमला नरेंद्रा ! । सैंधवाते ते काळीं. ॥ ७७ ॥ म्हणे, ‘पार्थाची अचळ प्रतिज्ञा । अन्यथा नोहे राया ! सुज्ञा ! । मी जाईन राजिया ! प्राज्ञा! । मृत्य टाळावया ॥ ७८ ॥ १. सिंधुदेशाचा राजा (जयद्रथ), २. गुरुपत्नीशीं गमन करणारा. ३. नरहरीने त्याच्या पव होऊन गेलेल्या मराठी कवींची महाभारतें वाचिली होती, असे यावरून वाटते ओव्या ७२।७३ ह्यांस मूळांत आधार नाही. त्या त्याने वाचलेल्या मराठी महाभारतमंथाच्या आधाराने रचिल्या असाव्या. ४. भय, धाक. ५. गुप्तपणाने फिरणारे दूत. ६. ओढ्या, प्रमाणे वाहून. ७. तुमचा (कौरवांचा) पक्ष सोडून घरीं जाईन. (अध्याय ७५।१६ पहा). | १६ न० द्रो०