पान:महाभारत.pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०४ नरहरिकृत | [द्रोणपर्व दैवगती । लाभालाभ तद्योग. ॥ ४५ ॥ सुखदुःखाचें आभाळ सारें । अंगा। लागे कर्मानुसारें । विवेकज्ञानी महाचतुर । त्यांतें दृष्टी नाणिती. ॥ ४६ ॥ विचारें निरीक्षितां मैं तेथें । देह तंव जाइजे सत्य । पचविषयीं गुणमिश्रित ।। तंव सम्यक् जीवव्यक्ती. ॥ ४७ ॥ ईश्वरमायेचा बडिवार । मिथ्या दावी साचोकार । जैसे स्वप्नींचे वेव्हार । चेइँल्या दृष्टी नातुडे. ॥ ४८ ॥ ना लें। रोहिणीचे उदक । कीं शुक्तिकी रजतन्याय देख । नाना गंधैर्वनगरींचे चोख । मिथ्या भास; सर्वज्ञा ! ॥ ४९ ॥ असो, येथींचे विवरणे । गांगेयसमरीं तुज म्यां जाणे । निरोपिलें, ते अंत:करणें । विवरूनियां वर्तणे. ॥ ५० ॥ आतां सोडुनी दुःखबुद्धी । करीं शोकाग्नीची शांती । वळंघोनियां विजयरथीं । वीरविक्रमा दावणे.' ।। ५१ ॥ ऐसा बोधोनी महावीर । शांत करी इंदिरावर ।। जैसा महानदीचा पूर । बोसरं पंवे ज्यापरी. ॥ ५२ ॥ श्वास घालोनी फणिप्राय । धर्माप्रती बोले विनय । ‘युद्धवृत्तांताची सोय । समूळ माते निवेदीं.' ॥ ५३ ।। शोकाकुळित धर्मराजा । बोलता जाहला भीमानुजा । म्हणे, काय सांगों ? कपिध्वजा! । दुःखें उभड येतसे. ॥ ५४ ॥ दानवयुद्धा जातां तुज । द्रोणे घातली माजी पैज । व्यूह निर्मोनी विगततेज । भूप सर्व त्रासिले. ॥ ५५ ॥ कोण्हा न करवे उठावणी । म्यां सौभद्र प्रेरिला रणीं । नेणों काळ शिरकला बाणीं । क्षया न्याया पुत्रातें. ॥ ५६ ॥ तो अभिमन्यु । वीरराजू । महाप्रतापी अरुणानुजू । वीरसागरी डहुळोनी भुजू । क्षीण । केलें क्षत्रियां. ॥ ५७ ॥ पाठी साह्य जात आह्मां । क्षुद्र जयद्रथ पापकर्मा । शिववरदे बाहुविक्रमा । वीरां सर्वं रोधिलें. ॥ ५८ ॥ भीमादिकांचे प्रतापबळ । निर्फळ करुनी टाकिलें फोल । एकटें बाळ विक्रमकीळ । वन्हिप्राय सुसाटे. ॥ ५९॥ पंथी होवोनी एकत्र । वीरसामग्री छेदिल्या शस्त्रे । दुःशासनाचिया पुत्रं । गदाघातें मारिला. ॥ ६० ॥ विपरीत मुंगीनें ग्रासिला मेरू । टिवटिवी शोषिला जळधरू । तमें लोपिला सहस्र १. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध-ह्या पंचविषयांनी युक्त. २. सत्व, रज व तम-ह्या त्रिगुणांनी मिश्रित. ३. खरोखर. ४. चेतना प्राप्त झाल्यावर, जागृतावस्थेत. ५. आकाशांतील ढगांत नगरांसारखी आकृति दिसते व थोड्या वेळाने दिसेनाशी होते, तीस गंधर्वनगर असे म्हणतात. ६. भीष्माबरोबर लढतांना. ७. येथे भगवद्गीतेवर कटाक्ष आहे. ८. उतरे, कमी होई. ९. उमासा, उमाळा, गहीवर. १०. तुज जातां=तं गेल्यावर. हा प्रयोग चिंतनीय आहे. ११. गरुड. १२. ९ प्रयोग ५५ व्या ओवीतील 'तुज जातां' या प्रयोगाप्रमाणेच आहे. १३. द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण, अश्वत्थामा, कोसल व कृतवर्मा-हे सहाजण..(अध्याय ७३।१० पहा). १४. टिटवानः