पान:महाभारत.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०३ महाभारत. १३ अध्याय] सलंबा. ॥ २८ ॥ माताप्रियकर अत्यंतमान । सुभद्रेचा आवडता प्राण । द्रौपदीचे चित्तरंजन । हर्षउद्यान कुंतीचें. ॥ २९ ॥ प्राण नै वैचे देहापरता। तैसा मज न विसंबे सर्वथा । शेजीं असतां रिघोनी त्वरिती । सुखगोष्टी संवादे. ॥ ३० ॥ त्या अमृताहुनी मिष्टा । गोडी लागती कर्णपुटा । दृष्टी | पाहतां ऐश्वर्यपीठा। निवे काय सुखाब्धीं. ॥ ३१ ॥ मम प्रियकर राजहंस ।। | आनंदाचा पूर्ण कलश । सकळ सुखाचा मुक्तघोंस । कौरवमूषकी खंडिला. ॥ ३२ ॥ सन्निध असतां धरत्रीपाळ । युद्धा धाडिले माझे बाळ । भीमसे| नाची शक्ती सबळ । दग्ध जाहलें हुताशीं. ॥ ३३ ॥ दुष्ट शत्रूची मांदोडी । त्यांमाजी व्यूह रची परवडी । अभिमन्यु धाडिला बुद्धी कुडी । जे असाध्य | निर्जरा. ॥ ३४ ॥ जेणे स्वप्नींही अवदशा । देखिली नाहीं रुक्मिणीधीशा!। भूवरमंचकी रतिरंग तोषा । करी निद्रा विलासें. ॥ ३५ ॥ प्रातःसमय नृत्यांगणीं । चेवे आणिती गायक गुणी । बंदी मागध स्तवितां वाणी । ब्रीदावळी कीर्तीची. ॥ ३६॥ तेणें काळमंचकी शय्या । बुंथी सृजिली प्रेतच्छाया । काळनिद्रे आर्थिली काया । अक्षई शुभ्रता वावरे. ॥ ३७॥ चापलस्नेहे चर्चिले कुशळ । धुळीं लिंपिले असती कुंतळ । भूतश्वापदें फोडिती कीळ । बीभत्समान भोंवती. ॥ ३८ ॥ कौसल्या, देवकी, अदिती, । रेणुका, रुक्मिणी, तारामती, । यांचे पंक्ती पुत्रवती । सुभद्रा विकळ पैं जाली. ॥ ३९ ॥ ऍत्र संसारतरूची छाया । पुत्र सुखाची वाटिका, राया! । पुत्रे श्लाघ्यता लोकीं यया । मुक्त स्वर्गी कपाटें. ॥ ४० ॥ पुत्र मुख्य ऐश्वर्यनिधी । पुत्र मुख्य वंशवृद्धी । पुत्र मुख्य गयाश्राद्धी । वास्तव्य नाकी पूर्वजां. ॥ ११ ॥ पुत्रमुखें भार्या उत्तम । पुत्रमुखें पवित्र धाम । पुत्रमुखें अतिथिसंभ्रम । सर्व सौख्य पुत्रवें. ॥ ४२ ॥ ऐसें वदोनियां वचनीं । गडबडा लोळे होय धरणी। हें देखोनी चक्रपाणी । धांवोनी पार्थ धरियला. ॥ ४३ ॥ सांबरूनी विकळगावें ।मुख-]कमळ स्पर्शले करें । कबरीभार सांवरूनी, वक्र । पीतांबरें पुसिलें. ॥ ४४ ।। म्हणे, ‘पार्था ! विवेकमूर्ती !। इहलोकीची नश्वरवृत्ती । प्रारब्धयोगें १. न जाई. २. शेजारी, जवळ. ३. मुक्ताफळांचा घोंस (गुच्छ). ४. समुदाय. मांदी' ह्या शब्दाचे मांदोडी' असे रूप कवितेत कधी कधीं आढळते. सुक्तेश्वराच्या कवितेत ह्या शब्दाचे मांदोडा' असें पुलिंगी रूप आढळते:-रलवृक्षाचे मांदोडे । प्रवाळवल्लींचे जुवाडे । वैडूर्यखाणी ५. जागृति. ६. दिली. देकडे । भानुतेजें झळकती. ॥' (सभापर्व, अध्याय ४।१०५). अर्पण केली. ७. ओंव्या ४०-४२ ह्यांस मूळांत आधार नाही. ह्या नरहरीने आपल्या प्रतिभाकौशल्यानेच निर्माण केल्या आहेत. ८. पुत्रप्राप्तीमुळे. ९. तोंड.