पान:महाभारत.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नरहरिकृत। १०० [द्रोणपर्व प्रतापें. ॥ २०० ॥ महायुद्ध घोरांदर । जालें, आटले सेनाभार । राम क्षोभला वैश्वानर । प्रळयकाळासारिखा. ॥ २०१ ॥ चौसष्टसहस्र महारथी । बाणी निवटिले काळघाती । अयुत सहस्रशः गणती । रथी वीर मर्दिले. ॥ २०२ ॥ चौदा सहस्र ब्रह्मद्वेषी । क्षत्री धाडिले यमराष्ट्रासी । मुसळे ताडुनियां शीशीं । सहस्र एक मारिले. ॥२ ०३॥ असिलतेचिया घायीं । सहस्रावधी पडिले ठाई । अमित क्षत्री फैरों पाहीं । तोडुनी काळा वोपिले. ॥ २०४ ॥ कुठारपाणी वृक्षशाखा । ठेसी, तैसी भुज खंडी देखा । सैन्य सकळत्रा सकळिका । कार्तवीर्या मर्दिलं. ॥ २०५॥ एकवीसवेळां धरत्री । निःपात केले सर्व क्षत्री । रुधिरहद धरापात्रीं । भरुनी तर्पणा सारिलें. २०६॥ वश्य करुनी सर्व धरणी । अनेक मख योजिले हवनीं । दक्षिणादानीं ऋषींच्या श्रेणी । तृप्त केल्या सर्वही. ॥ २०७॥ धनें रत्ने भरुनी धरा । कश्यप वोपिली, राजेंद्रा ! । ठाव मागोनी सरितावरा । महेंद्र पर्वती राहिला. ॥ २०८ ॥ देवऋषी म्हणे, ‘राजसत्तमा ! । तव पुत्राची कीर्ति गरिमा । कायसी ते भूपमहिमा ? । श्रवणीं राया ऐकिली ?' ॥ २०९ ॥ शांत सुंजय तूष्णीभूत । संततिहीन खेदाकुळित । ऋषी होवोन प्रसन्नचित्त । पुत्र जीववी प्रतापें. ॥ २१० ॥ चोरें मारिल्या लाधला कुमरा । भूषा आनंद न पुरे धरा । धनवस्त्रे मेरुभारा । भूरी ब्राम्हणा वांटिलीं. ॥ २११ ।। रत्नाभिषेक देव ऋषी । पूजोनी स्तवी महातोषीं । खंडला वंश लावोनी वृद्धीसी । जाता जाहला मुनींद्र. ॥ २१२ ॥ वेदव्यास म्हणे, ‘धर्मराया! । शोका वरपडी न करी काया । मृत्युलोकांच्या वितंडै माया । शाश्वत केवीं मानिजे ? ॥ २१३॥ ऐसे ऐसे पवित्र राजे । कीर्ती स्वर्गी पावले तेजें । तव नंदने वीरश्रीमानें ।। वश्य केलें दिवीतें. ॥ २१४ ॥ समरांगणी रौद्रप्रताप । करुनी उजळिला शूरत्वदीप । धर्मवर्तिया ! तयाचा ताप । करितां असाध्य सर्वथा. ॥ २१५ ॥ देही सांगतों तूतें राया! । देवीं अवतार धरिले कार्या । चंद्रासी प्रार्थितां, म्हणे, राया!। ‘व्याधी मातें पुत्राची. ॥२१६ ॥ त्याचा वियोग न साहे मला । तुमच्या आग्रहें भूमंडळा । येतो, परी माझिया कॅळा । तितुकीं वर्षे क्रमणे, ॥ २१७ ॥ ऐसें वदोनी शीतकर । पार्थकुक्षी वर्धला सुर । प्रतापें दिशा उजळोनी सैर । जाता जाहला स्वस्थाना. ॥ २१८ ।। पुराणांतरीचा सौरस । सौभद्र सहस्रार्जुना अंश । चक्रव्यूहकथन हृषीकेश । सुभद्रेते सांगता. १. डोक्यावर. २. तरवारेच्या. ३. परशूनें. ४. समुद्रापाशीं. ५. मौनव्रत, मुकाट्याने राहणारा, ६. पुष्कळ, ७. अघटित. ८. सोळा,