पान:महाभारत.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९९ १२ अध्याय महाभारत. याचक याचे करिजे पुन्हा । ऐसी वासना न उरे कोण्हा । आनंद करूनी सर्वजना । जाता जाहला स्वर्गातें.' ॥ १८४ ॥ नारद वदे, ‘ऐकें नृपती । तव पुत्राची कायसी कीर्ती ? । युवनाश्वपुत्र अमोघशक्ती । मांधाता महिमान्य. ॥ १८५ ॥ युवनाश्वासी नव्हता सुत । तेणें क्षीण तंव अशक्त । ऋषी होवोनी कृपावंत । पुत्रइष्टी करविली. ॥ १८६॥ सांगोपांग यज्ञसमाप्तीसी । मंत्रोनी उदक ठेविलें कलशीं । तृषाक्रांत नृपती निशीं । प्राशन करी न कळतां. ॥ १८७ ॥ प्रातःकाळीं पुरोडाशभाग। पत्नीसी अर्पिता, उदक व्यंग । पुसतां, राजा म्हणे, ‘गांग । चुकोनी रात्रीं सेविलें.' ॥ १८८ ॥ विस्मित होवोनी ऋषिवर्य । म्हणती, ‘नासले महत्कार्य । मंत्रसिद्धी प्रतापसूर्य । वृथा नोहे कल्पांतीं.' ॥ १८९ ॥ गर्भ वर्धला राजजठरीं । निर्गमा मार्ग नव्हे द्वारीं । दक्षिण कुक्ष फोडुनी बाहेरी । गर्भ निघे प्रतापें. ॥ १९० ॥ प्रेतत्व होवोनी पडिला राजा । शोकारूढ संबंधी प्रजा । ब्राह्मणी प्राथुनी वैद्यराजा । अश्विनौदेवा आणिलें. ॥ १९१ ॥ उपचारूनियां नृपती । सजीव केला न लगतां पातीं । आनंदोनी ऋषी म्हणती । 'बाळ जीवे कैसेनी ? ॥ १९२ ॥ सुरेंद्र बोले कृपाराशी । मी वांचवीन बाळकासी । करांगुळी सुधावोरसी । घालितां मुखीं तृप्तता. ॥ १९३ ॥ उदय अंतपर्यंत रवी । धर्मे शासिली धरादेवी । हिरण्यमय भाग्यविभवीं । जगीं सर्वां आल्हादू. ॥ १९४ ॥ अश्वमेधादि अनेक मख । राजसूययज्ञ शत एक । संपादोनी नृपनायक । तृप्त करी द्विजांतें. ॥ १९५।। हिरण्य, रत्न, भूषणे, पात्रे । हेममय अर्पिलीं दिव्यवस्खें । “पुरे पुरे' बोलती वक्रे । न यो आतां याचिते. ॥ १९६ ॥ शोकदारिद्य तया राज्यीं । [लेशही न प्रजा गांजी] । पावतां कृतांताच्या पांजीं । जाता जाहला स्वर्गाते'. ॥ १९७ ॥ नारद म्हणे, शोकावर्ती । न पड़े राया! धरीं शांती । भार्गवरामप्रतापकीर्ती । वेद पुराणीं गाइजे. ॥ १९८ ॥ कार्तवीर्य सहस्रबाहो । उपद्रविता रेणुकानाहो । स्वर्गी ऐकोनी मात्र टाहो । धांवोनी आला भूतळा. ॥ १९९ ॥ अन्यायकर्म जाणोनी चित्तीं । रोपें पिटिलें महर्सिती । सहस्रार्जुन तगटला युद्धार्थी । अमित दळीं १. याचना, मागणे. २. पृथुराजाची कथा मूळांत ३२ श्लोकांत वर्णिलेली आहे. परंतु प्रस्तुत कवीने ती फारच संक्षिप्त रीतीनें वर्णिलेली आहे. ३. अध्याय ६२ पहा, ४. पुत्रप्राप्यर्थ यश. ५. गंगाजल. ६. बाहेर पडण्यास.७. अमृताचा पान्हा जीस आहे अशी. ८. पंजांत. मांधाताकथासुद्धां कवीने फारच थोडक्यांत आटोपली आहे. ९. अध्याय ७० पहा. १०. उपद्रव देणारा. ११. रेणुका+नाथ (नाहो)=जमदग्नि. १२. रेणुकेनें,