पान:महाभारत.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३ अध्याय) महाभारते. १०१ ॥ २१९॥ निद्राभरें व्यापितां ते । गर्भे हुंकार दिधली तेथे । चमत्कारुनी रुक्मिणीकांतें । कथाभाग आवरला. ॥ २२० ॥ चक्र कवळोनी पाणी । मागता अप चक्रपाणी । सहस्र भुजा छेटुनी झणी । दोन ठेवी जगदात्मा. ॥ २२१ ॥ असो. भारती ऋषिवाणी । बैदली नाहीं नायकों कर्णी. । व्यास वदे, ‘राजया ! गुणी ! । खेद सांडीं पैरौता. ॥ २२२ ॥ तूं जाणता सर्वनिपुण । मायामळीं न लिंपीं मन । ईश्वरइच्छा प्रमाण जाण । ठेवी तैसें वर्तणे. ॥ २२३ ॥ शोका उपशम ने राजा धर्म । अदृश्य जाहला ऋषिसत्तम । पुढे पार्थाचा खेदश्रम । पान सज्जनीं करावें. ॥ २२४ ।। षोडश राजयाचे कथन । ऐकतां पावन होती जन । नरहर रंक दीन । प्रार्थी संतसज्जनां ॥ २२५ ॥ । अध्याय तेरावा. । संजय म्हणे, ‘नरमंडणा! । सोमवंशाभरणा ! । सर्व धर्म विदित श्रवणा ।। पार्थवत्तांत ऐकिजे. ॥ १ ॥ समरी भिडतां संशप्तक । सेनेसहवर्तमान देख । निर्दाळोनी पितृलोकं । देता जाहला प्रतापें. ॥ २ ॥ जैशा मत्त वारणांच्या थाटी । भग्न होती शार्दूळदृष्टी । कीं नाना वनस्पती व्यवाटीं । भस्म होती तात्काळ. ॥ ३ ॥ ना ते, ग्रीष्मींचा दिनमणी । शोषिता होय जेवीं पाणी । तेवीं शत्रुसैन्य विभांडुनी रणीं । जयदुंदुभी ठोकिल्या. ॥ ४ ।। मैंगिध वती बीदावळी । हर्षयुक्त सेना सकळी । तंव अस्तमान पातला हेळी । संध्यामार्जन सारिलें. ॥ ५ ।। उपविष्ट होवोनियां रथीं। मार्गे परतला शिविराप्रती । जयउत्साहहर्ष चित्तीं । ब्रह्मांडघटीं न समाय. ॥ ६ ॥ तंव , अकस्मात एकाएकी । कंठ दाटला शोकतवकीं । शुष्क जिव्हा. कोर वेदांबु गात्रीं वरिलें. ॥ ७ ॥ विकळ गात्रे सर्व संढील । काळजी डळमळी, करी कळ । दिशा उद्वस भासती सकळ । हर्षानंद मावळे. ॥ ८ ॥ तंव दिवाभीतांचे शब्द । देते जाहले भय विविध । शिव येवोनी सन्निध । अनर्थ सूचिती. ॥९॥ ध्वज किलकिलती शैकुनी । भयभीत तेणें सैन्यश्रेणी । कंपवात गात्रस्थानीं । अनर्थ पार्था सूचवी. ॥ १० ॥ अर्जुन म्हणे, ‘या- दवेश्वरा ।। करुणाकरा ! दामोदरा! । दानवारी ! गदाधरा ! । रमावरा ! | १. ओंव्या २१६-११ ह्यांस मूळांत आधार नाहीं. २. दूर, पलीकडे. ३. ह्या अध्यायांत मूळांतील ७२-७७ अध्यायांतील कथाभागाचा समावेश होला । पितरांचे स्थान, यमलोक, मरण. ५. समुदाय, कळप. ६. विस्तवांत. ७. भाट, स्तुतिपाठक, ८. सूर्य. ९. घाम. १०. शिथिल, लुलीं. ११. घुबडांचे. १२, भालू, १३. गिधाडे इत्यादि पी. १५ न० द्रो० भागाचा समावेश झाला आहे. ४. मृत