पान:महाभारत.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९८ नरहरिकृत [द्रोणपर्व उत्साहो. ॥ १६४ ।। ऐसिया संभ्रमें वर्ततां सदा । प्राप्त जाली मृत्यूची बाधा। अक्षयी पावोनी स्वर्गपदा । भोग भोगी शचीतें.' ॥ १६५ ॥ नारद वदे। उपहासित । ‘दुष्यंतपुत्र राजा भरत । महाप्रतापी बळसमर्थ । समान मारुती दुसरा. ॥ १६६ ॥ बाळपणीं अमोघ शक्ती । गंगा आणिली आश्रमाप्रती । व्याघ्र, सिंह, वृक, महिषे, हस्ती । चिरुनी सांडी हस्तकें.॥१६७||दमन करूनी सहित सर्प । मेंढ्या ऐसे चालवी कळप । ज्यांच्या बळाचा पावोनी ताप । दिशा राक्षस लंघिती. ॥ १६८ ॥ न्यायें शासोनी सर्व धरा । पूजा लावोनी विहिताचारा । संपदारूप हैरीची दारा । वसे गेही अचल ॥ १६९ ॥ शत अश्वमेध यमुनातीरीं । संपादिले विधियुक्त चान्ही । त्रिशत सरस्वतीच्या उदरीं । दक्षिणापूतों आचरे. ॥ १७० ॥ जान्हवीतीरीं शत । पुण्यक्षेत्री उर्वरित । सहस्र अश्वमेध गणित । ऋषिमुखें संपादी.॥१७१॥ राजसूययज्ञ शत एक । ज्योतिष्टोम शतदशक । अग्निष्टोमादि अनेक मख। जिले शास्वसंमती. ॥ १७२ ॥ धेनु, वाजी, स्पंदन, हस्ती, । सुवर्ण, रत्ने अनेकजाती । द्विजा वोपिली, नव्हे गणती । कन्यादान अमित. ॥ १७३ ॥ पुन्हा याचकां नव्हे आस्ता। ऐसी धरत्री केली तथा । अंतीं वरोनी सायुज्यता। कीर्ती जगीं ठेविली. ॥ १७४ ॥ तेथ तव पुत्राचा प्रताप । सूर्यपुढे लाविला दीप । हेही असो, विक्रमी पृथु नृप । वंश विष्णूचा. ॥ १७५ ॥ पृथुपासाव प्रगट पृथ्वी । ही तों मात सकळां ठावी । धनुष्य दंडुनी धरादेवी । समान केली पेराव्या. ॥ १७६ ॥ घालोनी गोटे पर्वत पाहीं । जेणें स्थापिले अभी मही । अधर्मे ग्रासितां बीजें तेहीं । क्षोणी रोपें दंडिली. ॥ १७७ ॥ धेनुरूपें । प्रगटोनी धरा । सर्व बीजें प्रसवली दुग्धधारा । जे ज्या वस्तू प्रियकरा । दुहोनी सर्वी घेतल्या. ॥ १७८ ॥ तयाश्रयें विपुळ धन धामीं । जन प्रवर्तती स्वधर्मकम । धरा पुरीत सर्व काम । हर्षानंदं जगत्रय. ॥ १७९ ॥ हिरवा मय सर्व धरणी । गृहगोपुरें रत्नमणी । दुःखशोका पडिलें पाणी । फिटली चिंता विश्वाची. ॥ १८० ॥ धर्माचरणीं पृथुराजा । विभव संसार करुनी वोजा । अश्वमेधीं दक्षिणा द्विजा । इच्छा पुरती वोपिली. ॥ १८१ ॥ सासष्ट सहस्र हस्ती गुणी । शृंगारोनी वस्त्राभरणीं । वर दक्षिणा भरुनी रत्नीं । ऋषिवर्यां अर्पिले. ॥ १८२ ॥ लक्षानुलक्ष सुदोहा धेनू । द्विजां अर्पिल्या सुरभीमान् । वसुवसने भूषणे भानू । लोपे ऐसी दिधली. ॥ १८३ ॥ १. आवडीनें, प्रीतीने. २. अध्याय ६८ पहा. ३. लक्ष्मी. ४. उरलेले, बाकीचे. ५. पराक्रमी, ६. अध्याय ६९ पहा. ७. गोष्ट, वर्तमान. ८. पेरण्यास, पे-यांसाठीं. ९. पृथ्वी,