पान:महाभारत.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महाभारत. १२ अध्याय] ९७ ॥१४५॥ धन, धान्य, कलत्र, संपत्ती । पुत्र, पौत्र विभ्राजकांती । आल्हादयुक्त जनांच्या पंक्ती । अयोध्यावासीसारख्या. ॥ १४६ ॥ त्रेसष्ट योजनें लंब मही। रुक्ममय केले सर्व पाहीं । चोवीस गांवे रुंदीची नवाई । रत्नमंडपी साजिरी. ॥ १४७ ॥ हेमखचित स्तंभ सरळ । झलरी, तोरणे, मुक्ताफळ । लैलामें भरली भूमी सकळ । गंगावाळूसारखी. ॥ १४८ ॥ अनेक मख अश्वमेधादी । शत वर्षा, खंडली अवधी । षडूसे तृप्त ऋषींची मांदी । बसे हिँसारी अन्नाची. ॥ १४९ ॥ शेखी भूमी ऋषिब्राह्मणां । अपनी वोपिली वरदक्षिणा । आसने, शयने, पात्रे, नाना । गवांबरें दिधलीं. ॥ १५० ॥ गयामहाराजाची कीर्ती । ऐकतां विस्मय वाटे चित्तीं । गयाराजासारिखे क्षितीं । योग नाहीं ऐकिले. ॥ १५१ ॥ सहस्रावधी सुदोहा धेनू । शतानुशत वाजी प्रवीणू । नित्य अर्पितां न ये शीणू । हर्ष मानसीं अपार. ॥१५२ ॥ आनंदमय सहित प्रजा । धर्माचरणीं [वर्तती सहजा] । काळमृत्यूने आयुष्य पैजा । जिंकोन नेला स्वर्गाते. ।। १५३ ॥ तेथ तव पुत्राचा विक्रम । कोण कीर्ती ? आचरे धर्म । महीमंडळीं राजसत्तम ! । रंतिदेवं ऐकिजे. १५४ ॥ महाराज ऐश्वर्यनिधी । धर्माचरणीं अचळ बुद्धी । भांडारकोशी धनसमृद्धी । न्यून कुबेर त्यापुढे. ॥ १५५ ॥ दोनी सहस्र प्रतापी तनय । युद्धी सुरेंद्र मानी भय । प्रजा सर्व आनंदमय । धर्माचरणे वर्तती. ॥ १६६ ॥ पाककर्ते सप. शास्त्री । पक्वान्ने करिती अहोरात्री । लक्षानुलक्ष ब्राह्मण श्रोत्री । तृप्त होती नित्यशः. ॥ १५७ ॥ साग्निक सदृश संशितव्रती। अमित ऋषींच्या दिव्य पंक्ती। वस्त्राभरणीं गंधाक्षतीं । शोभायमान सर्वदा. ॥ १५८ ॥ चर्मण्वती पवित्र गंगा । यज्ञारंभीं राया सुभगा ! । यज्ञसामोशी भरली सीगा । मेरु ठेंगणा दिसे पैं. ॥ १५९ ॥ रत्नमंडपी ऋषींच्या श्रेणी । यागीं संतुष्ट साही अशी । प्रगट होवोनी देवता झणी । भाग स्वमुखें सेविती. ॥ १६० ॥ श्राद्धकाली पितृगण । कॅव्यान भक्षिती हर्षवर्धन । भूतसृष्टी तृप्ततापूर्ण । कुशळ राय वांछिती. ॥१६१॥ मखसमाप्तीचे काळीं । द्विजां अर्पिल्या निष्काळजी । त्यांवर भारसुवर्णपळी । एक एका अर्पिली. ॥१६२॥ ‘पुरे पुरे' म्हणतां वाणी । हाँसोनी वडक वोपी झणी । ग्रहदान विविधवणी । सत्वसंपदा आपल्या. ।। १६३ ।। देश दाने लक्षानुलक्ष। फळे सहित अर्पिले वृक्ष । तत्पर दानी सदा लक्ष । नित्य नित्य १. योजनें. योजन=चार कोस. २. नवल, अपूर्वपणा. ३. अलंकारांनीं. ४. वीट, तिरस्कार .. अध्याय ६७ पहा. ६. वेदशास्त्रसंपन्न. ७. पितरांप्रीत्यर्थ दिलेले अन्न. ८. नाण्यांच्या ओंजळी. ९. मागें ओंवी ८७ वरील टीप पहा, १४ न० हो