पान:महाभारत.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९६ नरहरिकृत [द्रोणपर्व पंक्ती । तेजोराशीसारख्या. ॥ १२७ ॥ यांहीवेगळे प्रयुत दाहा। साग्निक प्रख्यात नेमी महा । याचेनी मंत्रे सप्तर्जिव्हा । प्रगट वोपी वरातें. ॥ १२८ ॥ शर्करायुक्त पक्वान्न जाण । घृतपचित अनेक वर्ण । मेरूसमान राशी घन । अन्नशाळे समृद्धी. ॥ १२९ ॥ अपूप, फेण्या, गुळवरिया, । धीवर, जिलब्या, षष्कुलिया, । घान्या, माट, कचो-या, लुचया, । अनेक खायें अपारें. ॥ १३०॥ दधि, दुग्ध, मधु, आम्ररस, । केळी, फणस, द्राक्ष सुरस, । अनेक शिखरणी, फळांचे घोंस, । तृप्ती ब्राह्मणां अर्पिले. ॥ १३१ ॥ ‘पुरे पुरे हाची शब्द । ऐकिला तेथे द्वादशाब्द । दक्षिणादानीं ब्राह्मण स्तब्ध । म्हणती वोझीं न जाती. ॥ १३२ ।। सरतां आयुष्याची गुंथी । पावता जाहला स्वर्गाप्रती । तव पुत्राची कायसी कीर्ती ? । शोकें पुत्रा पावसी ? ॥ १३३ ॥ नारद म्हणे. ‘महाराजा ! । शशिबिंदु नामें भूप वोजा । धरातळीं याचिया तेजा । साम्य नाहीं; नरेंद्रा! ।। १३४ ॥ सहस्र• भार्या गुणैकराशी । रूपें कुरूप उर्वशी त्यांसी । सहस्र पुत्र एकेकीसी । गुणगांभीर्य जन्मले. ॥ १३५ ॥ सर्व वेदविद्यापारंगत । शस्त्रसाधनीं महाधूर्त । वस्त्राभरणीं अलंकृत । प्रयुत वाजी एकेका.॥ १३६ ॥ चतुःसमुद्र शासोनी धरा । द्रव्य आणिलें मेरुभारा । अश्वमेध ब्राह्मणद्वारा । विधियुक्त संपादी. ॥ १३७ ॥ शत शत रथ जंपोनी हस्ती। भरूनी सुवर्ण पर्याप्ती । एकेक ऋषीते अप भक्ती । हेममाळा भषण. ॥ १३८ ॥ अमित कन्या समपद्मिणी । नृपा वोपिल्या पाणिग्रहणीं । आंदणे, वोपिल्या प्रीतीकरुनी । गणित श्रोत्रीं ऐकिजे. ॥ १३९॥ एकेक कन्येस शत हत्ती । गजासी शत रथ प्रदीप्तकांती । शतेक वाजी स्पंदनाप्रती ।। हेममाळा साजिन्या. ॥ १४० ।। अश्वअश्वासी सहस्र गाई । धेनूप्रती पांचशत अंवी । मुरवांटिले तेणे मही । भरूनी, भाग्य निघाली. ॥ १४१ ॥ यावत् देहें पुण्यकोटी । करुनी पावे नॉकपृष्ठीं । मृत्यूसी वश्य सकळ सृष्टी । खेद किमर्थ ? नरेंद्रा !' ।। १४२ ॥ नारद वदे सृजयाप्रती । ‘यराज । प्रख्यातकीर्ती । वर्षा शतयज्ञसमाप्ती । करी, कीर्ती ऐकिजे. ॥ १४३ ॥ सदा तपस्वी व्रतें नेमी । अग्निशुश्रूषा मनोधर्मी । “स्वाहास्वधा'कार शब्द धामीं । सर्वकाळ ऋषींच्या. ॥ १४४ ॥ दर्श अंमा 'ईष्टिपूर्वक । चातुर्मासादि मख अनेक । नाना इष्टी ऋषी अनेक । सांगती, तैशा संपादी. १. अग्निहोत्री. २. अग्नि. ३. तुपांत तळलेले. ४. अनरसे. ५. करंज्या. ६. चोखण्याचे पदार्थ. ७. अध्याय ६५ पहा. ८. असेच वर्णन मागे ओंव्या ७७-८१ यांत आहे. ९. मेंढ्या. १०. स्वगत. ११. अध्याय ६६ पहा. १२. अमावास्या. १३. यज्ञासह,