पान:महाभारत.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२ अध्याय] महाभारत. ९५ रत्नाचळ या हेतू. ॥ ११२ ॥ स्वर्गप्राप्तीचे तीन घोष । स्वाध्याय, धनुष्यस्फुरणे रोपें । घडूसें ब्राह्मण तृप्त तोपें । दिवि प्राप्त घोषैत्रयें. ॥ ११३ ॥ धर्मे वेंचोनी आयुष्यधना । जाता जाहला स्वर्गभुवना । “आहा ! पुत्र ! रुदना । मूर्खजनासारिखा." ॥ ११४ ॥ ऐसें वदोनी नारद मुनी । सांगता जाहला अन्य करणी । ‘नहुषपुत्र ययाती गुणी । सोमवंशीं महीचंद्र. ॥ ११५ ॥ धर्मे परिपाळोनी धरा । करितां प्रसवे रत्नभारा । प्रजाजन आनंदकरा । धने राया वोगैळती. ॥ ११६ ॥ धार्मिक भूप सदाचारी । निरतयज्ञीं आस्ता पुरी । अश्वमेध सांग गंगातीरीं । शताधिक अर्चिले. ॥ ११७ ॥ राजसूययज्ञ शत एक । सहस्र एक पुंडरीक । वाजपेय विमळ चोख । दशक दहा संपादी. ॥ ११८ ॥ अतिरात्र शत एक । चातुर्मास नेमपूर्वक । अॅग्निष्टोमादि विविध मख । प्राजापत्य आचरे. ॥ ११९॥ नक्षत्रतंत्र नानादृष्टी । स्मार्ताग्निहोत्र तुष्टीपुष्टी । आचरोनी ऋषींच्या कोटी । तृप्त केल्या षड्सें. ॥ १२० ।। धरेवरी तिळयव जाण । तितुक्या कन्या गाईधन । ब्राह्मणां अर्पिल्या बहुमान । इच्छा पुरत पर्याप्ती. ॥ १२१ । मनोरम उभय कांता । प्रजा वर्धवी गुणसरिता । कुळदीप जन्मले राया ! धूर्ती । यदु कुरु प्रतापी. ॥ १२२ ॥ काम पूर्ण करुनी मना । राज्य स्थापोनी कुरुनंदना । प्रवेशोनी पुनितारण्य । देहं तप दंडिलें. ॥ १२३ ॥ भरतां आयुष्याचा माप । अॅपैता केला सुराधिप । मृत्युभयाचा न सोडी ताप । किमर्थ शोकें जल्पसी ? ॥ १२४ ॥ नाभाचा पुत्र अंबरीष । महाप्रतापी वीर सौरस । सहस्रशः रणीं धराधीश । जिंकोनी प्राण सोडिले. ॥ १२५ ॥ हरण करुनी संपदा सर्व । कोशीं भरलें वित्तविभव । पाचारोनी ऋषि गौरख । मख अनेक आचरे. ॥ १२६ ॥ यथाशास्त्र यज्ञपद्धती । त्यांहोनी विशेष आचरे भूपती । लक्षानुलक्ष ऋषींच्या १. वेदाध्ययन. २. स्वगत. ३. मूळांत ‘पांच शब्दांचे घोष' असे आहे:-पंचशब्दा न जीर्यले खटांगस्य निवेशने । स्वध्यायघोषो ज्याघोषः पिबताश्नीत खादत ॥'. ४. ययातिराजाच्या कथेपूर्वी मूळांत मांधाताराजाची कथा आहे. (अध्याय ६२ पहा), पर नरहरीने ती कथा पुढे ६९ व्या अध्यायांतील पृथुराजाची कथा सांगितल्यावर वाणली आहे. यावरून हा कवि आपल्यापुढे मूळ भारत ठेवून काव्यरचना करित नसावा, असे वाटते. तसेच दिलीपराजाच्या कथेबरोबरच मूलांत खट्टांगराजाच्या कथेचा उल्लेख आहे, त्यासही नरहरीने फांटा दिला आहे, यावरून आमच्या अनुमानास बळकटी येते. ५. प्राप्त होती ६. आस्था, काळजी. ७. यज्ञविशेष. ८. ‘देह' शब्द संस्कृतांत पुल्लिंगी व नपुंसकलिंगी आहे. ९. स्वाधीन, अंकित, ११ अध्याय ६४ पहा. ११. आपल्या खजिन्यांत,