पान:महाभारत.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९२ नरहरिकृत (द्रोणपर्व तेजिष्ठ अर्क । पुत्रप्रसाद वोपितां देख । सुत जन्मला गुणाधिक । हेमवर्णी साजिरा. ॥ ५७ ।। सुवर्णष्ठीवी नाम तया । पिता ठेवी आदरें राया ! । मळत्याग करितां काया । रुक्म प्रसवे सर्वदा. ॥ ५८ ॥ तयाश्रयें गृहगोपुरें ।। भांड, भांडार, हेमांबरें । जिकडे तिकडे अळंकारें । प्रजा नृपती सारिखे. ॥ ५९ ।। भाग्यवंत सर्व नगरी । दैन्यचिंता पळाली दुरी । राजपुत्राते सदाचारी । देवतुल्य मानिती. ।। ६० ।। दुष्ट चोरी घालोनी घाला । वना नेवोनी वधिले बाळा । पुत्रशोकाच्या अग्निज्वाळा । दग्ध जाहला; नरेंद्रा ! ॥ ६१ ॥ तया दुःखाचिया पुढे । केवी धामका! तुझे कोडे ? । मृत्युलोकींचे कर्म कुडे ।। खेद टाकीं, जाणत्या ! ॥ ६२ ॥ नारद मुनी सृजयाप्रती । बोधितां, न धरी कांहीं चित्तीं । तेची अर्थी कथा निगुती । सांगतों राया ! ऐकिजे. ॥ ६३ ।। सुहोत्र राजा धरातळीं । सत्य, धार्मिक, विजयी, बळी । नवनीतमवाळ दीन दुर्बळीं । सद्वासना स्वधम. ।। ६४ ।। प्रजापाळणी जैसा धर्म । दातृत्वमानी मेघासम । सुहृद्भाव अचळ नेम । धरादेवीसारखा. ॥ ६५ ॥ स्वधर्मं वश्य केलें सुरां। वैरी जिंकिले शस्त्रधारा । सव भूतीं आप्तता सैरा। सुधावाक्ये रंजवी. ॥ ६६ ॥ ऐसियापरी पाळी वसुमती । पापद्रव्य न शिवे हातीं । तोष पावोनी जगत्पती । पर्जन्य पाडी हेमाचा. ॥ ६७ ॥ खर्व अखर्व धनाच्या राशी । गणना नोहे भांडारकोशीं । कुरुजांगलतापसऋषी । यज्ञ करी सर्वदा. ॥ ६८ ॥ अश्वमेध सहस्र एक । राजसूययज्ञ शताधिक । दक्षिणादानीं धनिक । कुबेर केलें ब्राह्मणां. ॥ ६९ ॥ गृहीं भरिल्या सुवर्णकोटी । प्रजा हर्षित तुष्टिपुष्टी । दुःखदारिद्य न मिळे सृष्टी । स्वप्नीं राष्ट्रीं तयाच्या. ॥ ७० ॥ ऐसी शासितां धर्मं धरणी । अकाळ काळे दंडपाणी । नेता जाहला मृत्युसदनीं । प्रजा लोकां आकांतू. ॥ ७१ ॥ प्रळयकाळ भाविला लोकीं । सर्व दिशा आहाळल्या शोकीं । नारद म्हणे, कॅळंकीं । लिप्त भुवने चौदाही.' ॥ ७२ ॥ हेंही असो आणिक चर्या । तूते सांगतों महाराया ! । पौरवराज विजयी बाह्या । भूप प्रसिद्ध जगत्त्रयीं. ॥ ७३ ॥ सहस्रशः श्व बारू । अश्वमेध करिती पृथ्वीवरू । पुण्यमार्गे लोकाचारू । अधर्म स्वप्न मिळेना. ॥ ७४ । वेदविद् ब्राह्मण निपुण । श्री मान्यविपुळा, आम्रच्छ देन । मनोरमकांता, प्रियदर्शन । आल्हादकारी सर्वदा. ॥ ७५ ॥ नटनर्तक | सान. २. राज्यांत इतकें सोनं झालें की प्रजा व राजा दोघंहीं सारखाच सपातमा हा इत्यर्थ. ३. मूळांतील अध्याय ५६ पहा. ४. कुरुक्षेत्रांतील तपी, जपा व यात: ६. पापामुळे, ७• वागण्याची रीति, चरित्र. ८. मूळांतील अध्याय ५७ पहा. चाच संपत्तिमान् झालीजपी व यति. ५. पोळल्या