पान:महाभारत.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२ अध्याय) महाभारत. मृत्यु वदे ‘लोक तडफडा । होता, मातें गांजिती. ॥ ३९ ॥ हांसोनी बोले पद्मयोनी । कर्मानुसारें जीवजंतुप्राणी । सुखदुःख भोगिती नानायोनी । तारी, मारी, कर्म त्यां. ॥ ४० ॥ ज्या ज्या युगीं आयुष्यरेखा । वेदें निर्मिली सकळिकां । चिरायु, मृत्यूचा धोका । नाहीं, ऐसे न बोले. ॥ ४१ ॥ दिसे तितुकें पावेल लय । श्रुतीचा ऐसा निज निश्चय । तूं कां त्यांचे धरिसी भय ? । कर्ता ईश्वर वेगळा. ॥ ४२ ॥ अहंकृतित्याग करितां देख । कर्म बाधक नव्हे चोख। मिथ्या अशंका, कल्पिसी शोक । तोही हरे मद्वाक्यें. ॥ ४३ ।। अष्टोत्तर रोग तूतें साह्या । देतों जया विजयी बाह्या । अनेक निमित्त विविधचर्या । तुझ्या पाणी अर्पितों. ॥ ४४ ॥ कर्माचरणे तयाचा वधू । होय तैसा करीं बाधू । तूतें निमित्याचा शब्दू । न ये नेमें वर्ततां.' ॥ ४५ ॥ येरें वंदोनियां चरणा । ‘अवश्य' म्हणे, ‘समर्थ आज्ञा.' । श्रेष्ठसंहर्तनीं प्रज्ञा । काळ जगा नागवी. ॥ ४६ ॥ अचुक मृत्यूची चपेटा । अमरादिकां न चुके स्पष्टा । जाणत असतां करिसी कष्टा । केवीं ? नृपा ! सुजाणा ! ॥ ४७ ।। संसारदुःखाच्या सागरीं । निमग्न होतां शोकलहरी । काळे ग्रासितां उँगळितां परी । नाहीं शब्द ऐकिला. ॥ ४८ ।। वाळू घाणा गाळितां वृथा । पाणी घुसळितां लोणी न ये हाता । वांज स्त्रियेच्या मैथुनी आस्था । प्रजोत्पत्ती लाहिजे ? ॥ ४९ ॥ तयापरी राजसत्तमा ! । खेद सांडुनी वर्धवीं धर्म । विहिताचारें आयुष्यनेमा । लोटोनी स्वर्गा पाविजे. ॥ ५० ॥ स्वस्थतां भूप अंतःकरणीं । अदृश्य जाला नारद मुनी, । व्यास वदे, ‘मृत्यूची करणी । ऐसी; नरेंद्रा. ! ॥ ५१ ॥ धर्म वदे, ‘बादरायणा !। राजपुत्रमृत्युकथन मना । आणि जेणे स्वस्थ वासना । वाढ होय सुखाते.' ।।५२॥व्यास वदे, ‘राजसत्तमा ! । शैब्यपुत्र झुंजयनामा। महाराज धार्मिक, धर्मा ! । धरा शासी स्वधर्मे. ॥ ५३ ॥ पोटी नाहीं तया पुत्र । तेणे राजा विकळगात्र । कन्या एक परम पवित्र । रूपें शारदा दुसरी. ॥ ५४ ॥ नारद, पर्वत, त्यांचे सखे । येतां त्यांतें पूजी हरिखें । कन्या पाहोनी लावण्य निकें । बोलते जाले, नरेंद्रा! ॥ ५५ ॥ ‘ऋषिवर्यासी कन्यादाना । अर्पिता, पावसी पुत्रनिधाना'. । “अवश्य म्हणोनी पाणिग्रहणा । कन्या ऋषीतं अपिली. ॥ ५६ ॥ महाप्रतापी | १. यद्दष्टं तन्नष्ठे' असे वचन आहे. २. भगवद्गीता-अध्याय १८, श्लोक ५९ पहा. ३. उ. =णे-ओकणे. ४. दोष. ५. ही शैब्यपुत्रसुजयकथा नरहरीने फारच थोडक्यांत बणली आहे. कदाचित् विषयांतराच्या भीतीमुळे कवीने असे केले असेल,