पान:महाभारत.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[द्रोणपर्व ९० नरहरिकृत वीर्य हॅरी पैं. ॥ २२ ॥ सहस्रशः मिळोनी वीरीं । भूप मारिला रणगव्हरीं । पुत्रशोकाच्या वैश्वानरीं । दग्ध पिता रात्रीदिन. ॥ २३॥ तया शांतविण्या नारद मुनी । पातला, बोधी नानावचनीं । ‘मृत्यु ग्रासीत चारी खाणी । काळ सर्वां। अजिंत. ॥ २४ ॥ ‘ऐक त्याच्या वाग्विलासा' । प्रश्न केला तुजची ऐसा ।। तो सांगतों नराधीशा ! । सादर श्रोतीं सेविजे. ॥ २५ ॥ सृष्टीआरंभाचिये काळीं । प्रजा वर्धल्या विपुळ तळीं । भारें डळमळी धरा बाळी । दुःख सांगे धातया. ॥ २६ ॥ गजबजोनी पद्मयोनी । रोपें संतप्त अंतःकरणीं । उपाय योजतां, क्रोधअयनीं । ब्रह्मांड कढ लागले. ॥ २७ ॥ रोषे भुकुटीपासाव। एक । केन्या जन्मली प्रदीप्त अंर्क । नम्रत्वें जोडूनी हस्तक । “आज्ञा केवीं ?' विचारी. ॥ २८ ॥ ब्रह्मा वदे क्रोधवाचा । ‘संहार करीं स्थिरचरांचा' । येरी विनवी म्लान वाचा । ‘घात मातें न करवे.' ॥२९॥ स्तब्ध पाहतां परमेष्ठी ।। मृत्यु निघाला गिरिकपाट । आचरे तपाचे तीव्रकोटी । ठाई ठाई पुण्य तीर्थी. ॥ ३० ॥ बहुकाळवरी तपश्चर्या । नेमें दंडिली व्रतें काया । सोज्वळमति वरुणालया । विरचीते वंदिलें. ॥ ३१ ॥ विनयें जोडुनी उभय पाणी । म्हणे, ‘काय आज्ञा ? बंदीन मूर्ती.' । धाता वदे, ‘प्राणहरणीं । उदित होई विश्वाच्या.' ॥ ३२ ।। गजवजोनी बोले वाचा । “कोण भोग प्राक्तनाचा ? ।। माझेन कृत्य हे नव्हे, साचा । आन आज्ञा आज्ञापां.' ॥ ३३ ॥ क्रोधे संतप्त प्रजापती । तेथ पावला पशुपती । विनयवृत्ती शांतवी प्रीती । विश्वजनका सुवाणी. ॥ ३४ ॥ ‘विश्वनिधनी किमर्थ चिंता है। आदिनारायणे येची अर्था । त्रिमूर्ती निर्मल्या गुणासक्ता । निजकर्मी तत्पर, ॥ ३५ ॥ यांहीमाजी तुमचा अर्थे । सकळ कोप हा न करवे व्यथू.' । मृत्यूसी वदे, ‘भयासक्तू । किमर्थ होसी ? धर्मिष्ठा ! ॥ ३६ ॥ अधर्माचरणी ब्रह्मवाणी । सहसा न, मनीं सत्य मानीं । त्रिविधर्माची सिराणी। देवत्रय चालविती. ॥ ३७॥ उत्पत्तीकारण चतुर्वदन । विश्वपालनीं मधुसूदन । संहारक त्रिनयन । जाण क्रिया मज हस्तीं. ॥ ३८ ॥ निमित्तमात्र तूते पुढा । केलें, न मोडी शब्द येवढा.' ।


| १. मूळांतही असेच आहे:-‘तस्य पुत्र हरिनम नारायणसमो बले.' (अध्याय ५२ पहा २. जरायुज, अंडज, स्वेदज व उद्भिज ह्या चार खाणी. ३. भूतळावर. ४. हीच मृत्यूची देवर ५. सूर्य. ६. वरी=पर्यंत. वरी' या शब्दाचा उपयोग सध्या प्रौढ भाषेत फारसा होत नाह बायकांच्या बोलण्यांत मात्र हा शब्द बराच येतो. हा शब्द मुक्तेश्वराच्या कवितेतही आढळे “पाडली शोकाझीच जोहरीं । जन्मवरी रे ! संजया ! ।। (सभापर्व, अध्याय १७।५२), ७• हातून. ८. उत्पन्न करणे, पोषण करणे व लयास नेणे हीं तीन कमैं. ९. आवड, प्रीति. । १७५२). ७. माझे