पान:महाभारत.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२ अध्याय महाभारत. कीं फळ चवोनी वृक्षाहुनी । जेवीं पडे तळाते. ॥ ६ ॥ तेवीं तो पांडुकुमर । अचेष्टित धरणीवर । पडतां, सर्वही हाहाकार । करिते जाहले आक्रोशें. ॥ ७॥ पांडव पिटिती वक्षःस्थळ । भीम पाषाणी मेळवी मौळे । नृपासहित माद्रीबाळ । पांचजन्य फुरिती. ॥ ८ ॥ सकळिकांचे अंबेकीं अंबू । मोहें स्रवते जाहले उष्ण बिंदू । मोहें वाढला दुःखकदंबू । चुंबित गेला व्योमाते. ॥ ९ ॥ मूच्छ सांवरुनी नृपवर । श्वास घाली महाथोर । हृदय पिटोनी वारंवार । दीर्घशब्दें आक्रंदे. ॥ १० ॥ म्हणे, ‘माझी वंशवल्ली । बाहाळी पुष्पी फळीं । संग्रामवारण काळवेळीं । शत्रुमशकी खंडिली. ॥ ११ ॥ वंशाभरण विजयकेतू । खचोनी पडिला आनंदासँहितू । दिशा उद्वस, राज्यहेतूं। हरुषचंद्र मावळला. ॥ १२ ॥ आतां जिर्णयाचा काय पाड ? । पार्थासी केवी दावणे तोंड ? । असतां वीरांचे जुबाड । बाळ काला वोपिला.' ॥ १३ ॥ ऐसा शोकसागरीं । निमग्न होतां दुःखलहरी । तंव व्यास भगवान् अवसरीं । येता जाहला त्या संधी. ॥१४॥ धांवोनी घातला दंडवत । वरासनीं पूजिलें त्वरित । धार्मिक धर्म शोकाकुळित । देखोनी बोले मृदुत्वे. ॥ १५ ॥ ‘धर्मालया ! धर्ममूर्ती ! । कमल काय धरिलें चित्तीं ? । नैश्वर्य देह मृत्यपंथीं । शाश्वत केवीं मानिजे १ ॥ १६ ॥ एक पुढे, एक मागे, पाहीं । सांडुनी संपदा सर्व मही । मृत्युमुखी पडती तेही । कीर्ति अकीर्ति ठेउनी. ॥१७॥ तुझिया पुत्राहुनी। शतावधी । गुणी प्रतापी समान उदधी । राजपुत्र षोडश विक्रमनिधी । वश्य जाहले अंतका.' ॥ १८ ॥ धर्म वदे, “जनकजनका ! । ऐश्वर्यसिद्ध ज्ञानदीपका ! । मृत्युभयदारुणशिखा । बाधी अमरा विश्वाते. ॥ १९॥ मृत्यु कोण ? काय ? कैसा ? । राजपुत्रा केवीं वळसा ? । निवेदीं मातें ईश्वरपुरुषा! । ऐकों इच्छों; दयाळा !' ॥ २० ॥ ऋषी वदे, “राजया ! गुणी !। पूर्वी अकंपन राज्यासनीं । धरा शासितां धर्माचरणीं । पुत्र तया जन्मला. ॥ २१ ॥ हरी सकळकळा-। धनुर्विद्येचा मरगळा । बळप्रतापें अग्निज्वाळा । १. चवणे=च्यवणे, गळणे, पडणे. २. चेतनारहित, बेशुद्ध. ३. भीमाने दगडावर डोके आपटून घेतलें-हा इत्यर्थ. ४. नकुळसहदेव शंख करिते झाले–हा इत्यर्थ. ६. . ६. पाणी (अश्र). ७. प्रफुल्लित, टवटवीत. ८. येथे सहोक्ति' नामक अलंकार र नामक अलकार आहे, ९. ज्याच्याकरिता राज्य मिळवावयाचे तो (अभिमन्यु), १०. जिण्याचा, जगण्याची. १ १ - मूच्छा. १२. आजोबा (वासा). १३. उपद्रव, अडचण, १३ न० द्रो०