पान:महाभारत.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८८ नरहरिकृत [द्रोणपर्व जाला विक्रमी. ।। १५२ ।। रुद्रतुल्य प्रताप याचा । होय पुत्र धनंजयाचा ।। कीर्तिघोष वर्णितां याचा । भ्रम मानसे होतसे. ॥ १५३ ॥ कौरवसेना काळ विखारी । मर्दिली येणे गरुडासरी । दाहा सहस्र भूप समरीं । यमसदना धाडिले. ॥ १५४ ॥ पृतना एक अक्षौहिणी । निपातिली रणमेदिनी । शवें भरली पूर्ण अवनी । भयंकर बीभत्स. ॥ १५५ ।। गिरिप्रमाण गुणाढ्य हस्ती । खंडविखंड पाडिले क्षिती । अश्वरत्न प्रदीप्तकांती । छिन्न क्षतें पडियेले. ॥ १५६ ॥ ध्वजा, पताका, छत्र, चामरें । रत्नाभरणे, तगटांबरें, । वीर वदने शोभा रुचिर । धरादेवी ढेसँळली. ॥ १५७ ॥ ऐसी वदतां वीरवाणी । पंश्चिम आक्रमी देव तैरणी । धैमीळ दिशा पाहोनी नयनीं । माघारला गुरुवर्य. ॥ १५८ ॥ तृतीय युद्धाची समाप्ती । हर्षामर्ष वीरांचे चित्तीं । निघते जाहले शिबिराप्रती । विकळमानस सर्वही. ॥ १५९ ॥ पुढां धर्माचा प्रलाप । वाग्देवीतें नुमाणे माप । पुत्रनिधन वार्तासर्प । पार्था हृदी आतुडे. ॥ १६० ॥ शोकांमाजी करुणारस । सज्जनीं सेविजे सावकाश । जो ऐकतां संसारत्रास । निमोनी, भजें अच्युता. ॥ १६१ ॥ श्रीभीमराज वरदहस्तीं । मौळी स्पर्शतां, हरिगुणी रती । नरहर मोरेश्वर रमापती । भारतवर्णनीं पुंढारे. ॥ १६२ ॥ अध्याय बारावा. संजय म्हणे, ‘राजसत्तमा ! । माघारतां अनीकिनी धामा । सौभद्रक्षय प्रतापगरिमा । वर्णितां मातें स्फुरली. ॥ १ ॥ कीं निधनवार्ता काळविखारी ।। उसळोनी धर्माच्या कर्णद्वारीं । रिघोनियां अभ्यंतरीं । हर्घकाळजा खंडिलें. ॥ २ ॥ दुःखविणें अंतली काया । शोकलहरी झोंके हृदया । 'मोहोचेंडू । कंठालया । शब्दमार्ग विरोधी. ।। ३ ॥ गोड संपत्ती कडुवट । देहवासना कडू ते मीट । बुद्धि झापडी निद्रालोट । मायाभरें जोकळे. ॥ ४ ॥ कीं तो। वीरयंत्रशब्दगोळा । भेदला धर्महृदयीं सरळा । इंद्रियें होवोनियां गोळा ।। उलंडला भूमिके. ॥ ५॥ चंडवातें कर्पूरर्जननी । पडे उन्मळोनी मेदिनी ।। १. कृष्णसर्पसारखी. २. पृथ्वी. ३. पूर्णपणे भरली. ४. सूर्याने पश्चिमेचा रस्ता धरला संध्याकाळ झाली-हा इत्यर्थ. ५. धूसर, अस्पष्ट. ६. येथे मूळांतील पन्नासावा अध्याय संपत ७. सेना. ८. हर्षरूपी मर्मस्थानास. ९. मुच्छरूपी झड़. झेंडू हा रोग गुरांच्या गळ्यास हा १०. जाकळणे=कळवळणे, मोह पावणे. ११. वीररूपी तोफेचा शब्दरूपी गोळा. अर्थसादृश्य •सा द्रौपदीमुखयंत्रांचा । यंत्रगोळा उसळला साचा । करुणातेजें सुतेजाचा । बाळभानु (मुक्तेश्वर–सभापर्व, अ० १५।१६३) १२. केळ, बाळभानु ज्यापरी ।।