पान:महाभारत.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११ अध्याय] महाभारत, वीरां । मारुनी धाडिलें कृतांतघरा । ब्रह्मवसाती नृपवरा । दाहा थियां मर्दिलें. ॥ १३४ ॥ कैकयराजे गदाघातीं । सात मर्दिले विख्यात कीर्ती । वीरांसहित प्रभिन हस्ती । दश एक मारिले. ॥ १३५ ॥ काळपुरुषाचिया पाडें । दौःशासनी पातला पुढे । जाणों गधघरा बद्धिकुंडे (?) । भीमसेन ज्यापरी; ॥ १३६ ॥ कीं तो रामचंद्र दशग्रीवा । वृत्रासुराते देव मघवा । कीं शंबरासुर कामदेवा । भावी अंतक अंतींचा; ॥ १३७ ॥ तयापरी दौःशासनी । येतां लोटला आर्जुनी । गदा वोपित यंदनीं । टाकी उडी बळिष्ठ. ॥ १३८ ॥ सहितसूतबाजी रथ । चूर्ण होउनी गेले त्वरित । जैसी वीज पडतां पादपांत । भ्रष्ट शाखा अष्ट दिशा. ॥ १३९ ॥ तयापरी विगत नृपें । गदा घेवोनी धांवला कोपें । उभय बंधु क्रोधप्रतापें । एकमेकां ताडिती. ॥ १४० ॥ गती, युक्ती, विचित्र कळा । दावितां झेलिती; धांवे तळा । येरयेरांची प्राणकळा । घेऊं क्रोधं वांच्छिती. ॥ १४१ ॥ रौद्रसंग्राम अतिदारुण । जैसा अंधकासुरा त्रिनयन । ना तो कैटभासी मधुसूदन । पूर्वी जेवीं वर्तला. ।। १४२ ॥ परस्परें ताडितां घाय । उभय तनू रक्तमय । माघां सरोनी जैसा वय । प्रहार करिती ज्यांपरी. ॥ १४३ ॥ गदाघात निष्ठुरपाणी । पडतां उभयतांचे मू । तैवा येउनी, पडिले धरणी । ताळफळासारिखे. ॥ १४४ ॥ ना तें, अंतकें वोढिले पाशा । शेषआयुषी निघे जैसा । दौःशासनी वीर। तैसा । सावध जाला क्षणार्धे. ॥ १४५ ॥ मूच्र्छ सांवरूनी आपदा । उठतां कर्णी वोपिली गदा । मस्तक होवोनी गेलें चेंदा । कूष्मांडफळासारिखें. ॥ १४६ ॥ धरे आतला नरेंद्रराज । जाणों खचला सुरेंद्रध्वज । ना तो सिंहासनीं इंद्रानुज । भूमी आला निद्रेतें. ॥ १४७ ॥ तयापरी पार्थकुमर । अचेष्टित मेदिनीवर । सवंग भरिलें पूर्ण रुधिर । धुळी तनू व्यापिली. ॥ १४८ ॥ मृत्युमंचकी करुनी शय्या। बुंथी सृजी प्रेतच्छाया । काळनिद्रे आथिली काया । अक्षयी शुभ्रता पातली. ।। १४९ ॥ जैसा मृगेंद्र शत्रघातीं। छिन्न होवोनी आतुडे क्षितीं । मक्षिकप्राय वीरपंक्ती । घोंगाणती सभोंवत्या, ॥ १५० ॥ कीं रत्न स्पर्शतां जैसे वन्ही । विरूप रूप पावे गुणीं । तैसा सौभद्र बीभत्सरणीं । धरेवरी पडियेला. ॥ १५१ । “अहा !'शब्द सर्व वदनीं । वीरां खळबळ अंतःकरणीं । म्हणती ‘सौभद्र प्रतापतरणी । अस्त १. जरासंध हा मागधदेशाचा राजा. ह्यास भीमाने मारले. (मुक्तेश्वर-सभापर्व-अ. ६।७ पहा.) २. झाडावर. ३. गवे, रानवृषभ. ४. घरी. ५. कोहळ्याप्रमाणे. ६. विष्णा । ७. चेतनारहित. ८. आच्छादन.